Submitted by लालू on 12 December, 2009 - 10:57
हल्ली बाजारात सगळीकडे बरेच नवीन तयार खाद्यपदार्थ येतात. जसे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कॉर्न चिप्स, कुरकुरे, चिवडे, वड्या, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट्स इ. याबद्दल इथे माहिती लिहिणे अपेक्षित आहे. 'स्नॅक्स' किंवा थोडक्यात चहाबरोबर आणि (कधीतरी) येताजाता तोंडात टाकायचे पदार्थ.
लिहा तर मग, लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला आवडलेल्या खाऊची माहिती. प्रकार, ब्रॅन्ड, कुठे मिळेल इ. लिहावे. भारतातील आणि परदेशातीलही पदार्थ लिहिले तरी चालेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपयोगी बाफ! (अमेरिकेत
उपयोगी बाफ!
(अमेरिकेत मिळणारे). Cascadian Farm कंपनीचे dark chocolate almond chewy granola bars मस्त आहेत. त्यांचे प्रेट्झेल, व्हॅनिला चॉकलेट घातलेले बार्स पण आहेत. पण हे बेस्ट वाटले. True North कंपनीचे pecan almond peanut clusters तर अफलातून! चिक्कीसारखे, पण त्याहून जास्त आवडले. (दाताला चिकटत नाहीत.)
Stacys चे सगळ्या प्रकारचे पीटा चिप्स मस्त आहेत. तसच Miss Vicky चे हालापिन्यो फ्लेवरचे पोटॅटो चिप्स!!!
Greenwise ब्रँडचे सगळ्या प्रकारचे थंड दुधाबरोबर खायचे सिरियल्स इतके चवदार आहेत की नुस्ते स्नॅक म्हणून वाटीत घेऊन खायला पण छान लागतात. ( Greenwise हा ब्रँड Publix कंपनीचा in house brand असल्यामुळे सगळीकडे उपलब्ध आहे की नाही माहिती नाही.)
छान आहे बाफ. मला पण खूप दिवस
छान आहे बाफ. मला पण खूप दिवस मुलांना दुपारी़ घरी आल्यावर खायला हेल्थी स्नॅक्स काय द्यावे (विकतचे) हा प्रश्न पडला होता. त्यांना शाळेतून आल्यावर चिवडा, लाडू असलं काही आवडत नाही. डिनरला रोज भारतिय जेवणच असतं. त्यामुळे स्नॅक्ससाठी त्यांना ग्रोसरी स्टोअरमधलंच आवडतं.
रीत्झचे Handy Snacks ह्यात क्रॅकर्स आणि चीज असतं, Krudos चे Milk chocolate granola bars मस्त असतात.
आणखी लिहा. उपयुक्त बाफ!
Miss Vicky चे हालापिन्यो
Miss Vicky चे हालापिन्यो फ्लेवरचे पोटॅटो चिप्स!!!
>> येस! एकदम टेस्टी आहेत चविला, याचा पार्टी pack आणायला हवा.
काय खावु आणि काय नको अस झालय
काय खावु आणि काय नको अस झालय मला हा बाफ वाचुन.
नट्स चालत असतील तर व्होल फुड मध्ये एनर्जी चंक्स मिळतात. पीनटबटर ई मिळत ना तिथे. दोन प्रकारचे मिळतात. स्पिरुलिना घातलेलले आणि दुसरे बहुदा almond घातलेले.
अधन मधन ,एनर्जी टिकवण्यासाठी अतिशय चांगला आणि टेस्टी प्रकार आहे.क्रोगर मध्ये पण मिळतो. चव वेगळी आहे खर.
..............................
मी तो पदार्थ घरी करायचा प्रयत्न केला (व्होल फुड खुप लांब आहे आमच्या घरापासुन) पण जमल नाही.
भारतात मिळणारे चिप्स चे
भारतात मिळणारे चिप्स चे प्रकार देण्यापेक्षा तिन्ही त्रिकाळ पोळी भाजी परवडली.. पण माझ्या आणि ( नशिबाने ) मुलाच्याही आवडीच म्हणजे राजगिरा लाडू आणि चिक्की... आणि येता जाता तोंडात टाकायला भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे...
चिप्स प्रकरण आमच्याकडे येत
चिप्स प्रकरण आमच्याकडे येत नाही फारसं. मला अधेमधे तोंडात टाकयची सवयच नाही. नी मुलांकरता यावेळी आणलेले स्नॅक्स पुढच्या वेळी चालतील ह्याची गॅरंटी नाही. पण म्हणून घरात स्नॅक्स नसून चालतच नाही.
नेचर व्हॅलीचे ओटस आणि हनी चे बार्स किंवा ट्रेल मिक्सचे फ्रूट आणि नटस बार्स. क्वचित चुई चॉकलेट चिप कुकीज.
चहाबरोबर, दुधाबरोबर देसी दुकानातली बिस्कीटं ही चालतात.
खा माझी हाडं
खा माझी हाडं
बटाटा चिप्स ऐवजी आम्ही हल्ली
बटाटा चिप्स ऐवजी आम्ही हल्ली सनचिप्स चे मल्टीग्रेन चिप्स आणतो. हेल्दी तर असतातच पण चवीला अत्यंत छान. कुरकुरीत आणि खुसखुशीत. त्यातले दुसरे फ्लेवर्स ट्राय नाही केले. ओरिजिनलच खूप आवडून गेलाय. त्याबरोबर खायला हमस मस्त लागते किंवा मग गार्डन व्हेजी क्रीम चीज
केटल कंपनीच्या Spicy Thai
केटल कंपनीच्या Spicy Thai या चवीच्या बटाटा चिप्स !
http://www.kettlefoods.com/our-all-natural-products/chips
एकदा खायला लागले की थांबवत नाहीत. भारतीय पाहुण्यांना हमखास आवडतात. किंचीत आंबटगोड आणि झणझणीत तिखट. आणि तिखट असे की लगेच लागत नाही. घास गिळला की मग घशातून गंमत येते !
मात्र कॅलरीकडे पाहू नका.
Stacys चे सगळ्या प्रकारचे
Stacys चे सगळ्या प्रकारचे पीटा चिप्स मस्त आहेत.>> अगदी. मी Stacy's चे Multigrain Pita Chips रेडीमेड हमस बरोबर खाते कधी कधी चहाच्या वेळेला स्नॅक म्हणून. Baked असल्याने फार तेलकटही नसतात. Nature Valley चे Cereal Bars ही चांगले आहेत.
मृण्मयी, Greenwise चे कुठल्या फ्लेवरचे सिरीयल आणतेस तू? माझी सगळी ग्रोसरी Publix मधून येते पण मी Greenwise चे cereal नाही आणले कधी. तू एखादा फ्लेवर्/टाईप recommend केलास तर लग्गेच ट्राय करते
हनी ओट्स, nutella ब्रेड
हनी ओट्स, nutella ब्रेड स्प्रेड , डोरिटोस चिप्स , चिप्स विथ साल्सा किंवा आर्टिचोक, हल्दीरामचे बनाना चिप्स छान लागतात.
स्वीटीस् (छोट्या छोट्या संत्र्या, कॉस्को मधे मिळतात), विंडमील फार्म मधे तर आपल्या चकल्या,तोंडुळे शेव इ. अमेरीकन स्टाइल(विथ चिझ) मधे मिळते,
मदर्स च्या कुकीज मस्त असतात, बाकी चॉक्लेट मधे किसेस् च पाकिट आणलं कि महिनाभर पुरत.
वरचं केटल कंपनीचं स्पायसी थाय
वरचं केटल कंपनीचं स्पायसी थाय चिप्सचं पॅकेट आजचं संपलंय. मस्त झणझणीत आहेत चवीला.
स्टेसी पिटा चिप्स छानच असतात.
स्टेसी पिटा चिप्स छानच असतात. आता या मिस विकी मिळतात का पहायला हवे. केटलचे स्पायसी थाई आणून पहाणार नक्की.
'टेरा' (TERRA) च्या चिप्स चांगल्या असतात. त्याच्या इथल्या 'एग्झॉटिक व्हेजिटेबल्स' मस्त असतात. बटाटा, रताळे, युका इ.
http://www.terrachips.com/products/Original-TERRA-Chips.php
'प्रॉडक्ट्स' वर क्लिक केल्यावर अजून प्रकार दिसतील.
सनचिप्सही मस्त. Grandma UTZ च्या हँडकुक्ड प्लेन, हनी बार्बेक्यू सॅन्डविचबरोबर बर्या वाटतात कधीतरी.
भारतीय पदार्थांपैकी कुरेकुरेही मस्त. त्यांचा एक लाल पॅकमधला फ्लेवर मला आवडला नव्हता.
http://en.wikipedia.org/wiki/Kurkure
आणि बन्सी चा पातळ पोह्यांचा चिवडा चांगला असतो.
पॉपचिप्स हा एक माझा आवडता
पॉपचिप्स हा एक माझा आवडता प्रकार - http://www.popchips.com/
sour creme and vinegar flavor प्रचंड अंबट असतो म्हणुन तो टाळते बाकीचे मस्त असतात.
तसेच http://www.taquitos.net/snacks.php?snack_code=2446 ह्या animal cookies मस्त लागतात.
हल्दिरामचे मसाला फुटाणे मिळतात तो प्रकार अप्रतीम लागतो.
केटल चे चिली आणि इंडियन मसाला
केटल चे चिली आणि इंडियन मसाला पण मस्तच.
पण खाताना जाम अपराधीपणा वाटतो कॅलरीज चा विचार करुन.
हो त्या टेराच्या व्हेजीटेबल
हो त्या टेराच्या व्हेजीटेबल चिप्स मला खूप आवडतात.
लिहिताना विचार करु नको
लिहिताना विचार करु नको भाग्यश्री.
हे घे बेक्ड - http://www.newyorkstyle.com/newyorkstylebagelcrisps.php
न्यूयॉर्क स्टाईल बेगल चिप्स. क्रीम चीजबरोबर छान लागता.
केटल चिप्स, सन चिप्स, फ्रिटोज
केटल चिप्स, सन चिप्स, फ्रिटोज कॉर्न चिप्स, कॉस्टको मधल्या वेजी स्ट्रॉज (क्रीम चीजबरोबर भारी), बेगल चिप्स, टेराच्या व्हेजीटेबल चिप्स हे सगळे आवडते प्रकार. डिवाइन, पेपरिज फार्मच्या कूकीज अधुन मधुन. कॅरेमल फ्लेवर्ड पॉप कॉर्न्स. काशीचे चुइ ग्रॅनोला बार्स मला सगळ्यात आवडले. साखरेचे प्रमाण कमी आहे आणि इतर मिनरल्सचे जास्त. चवीला पण चांगलेत. लहान मुलांसाठी अर्थज बेस्ट प्रॉडक्ट्सचे अॅपल बार्स, अॅपल सिनॅमन ओट कूकीज, कॅरट व्हील्स, एल्मो कूकीज, चीज पफ्स, फ्रूटी पफ्स.
पेपरिज फार्मचे गार्लिक ब्रेड्स मस्त आहेत. ७-८ मिन. मधे मस्त क्रिस्पी ब्रेड तयार होतात. अधिक उत्साह असेल तर पेपरिज फार्मचे पेस्ट्री शीट्स वापरुन पेस्ट्री. हे सगळे स्टॉप अन शॉप, होल फूड्स मधे मिळते.
देसी दुकानातले बिस्किट्स, अम्मा बनाना चिप्स, फणसाचे चिप्स, मसाला दाणे, मूग डाळ, स्वादचा पोह्याचा चिवडा हे काही आणखी. हल्दिरामची भेळ. अधुन मधुन भारतातुन आलेल्या बाकरवड्या, आंबावडी, शेव, चिवडा
मी दुपारी लिहिणार होते अजय तुमच्या स्पायसी थाइ चिप्सविषयी हे चिप्स पण मस्त आहेत.
त्या कुरकुर्यांविषयी भारतात फार कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मी आणत नाही आता. पण मला सगळेच फ्लेवर आवडायचे.
बन्सीच्या पातळ चिवड्याबद्दल
बन्सीच्या पातळ चिवड्याबद्दल शर्मिलाला अनुमोदन. अगदी घ्रच्या चिवड्यासारखी चव आहे.
गरवी गुहरातच्या कचोर्या, आणखीन १,२ स्न्कॅक्स चांगले आहेत पण सगळेच जास्त तिखट आहेत. मुलांना चालतील असं नाही.
.
.
NABISCO SOCIAL TEA BISCUITS
NABISCO SOCIAL TEA BISCUITS पण चहात बुडवून खायला फाऽर मस्त लागतात. पण रोज ४ जरी खाल्ली तरी आठवडाभरात १-२ किलो वजन वाढतं.
Kashi चे multi grain crackers (त्यात सन्ड्राइड टोमॅटो वगरे आहेत्.)आणि Sesmark चे cheddar चीज घातलेले sesame-rice thin crackers (किंवा चीज नसलेले) ताज्या कोथिंबीर हमसशी झकास लागतात.
इथे आपलं देशी फरसाण आणि गुजराथी स्नॅक्स सही दिस्ताहेत.
केटल कुक्ड चिप्स नेहमीच
केटल कुक्ड चिप्स नेहमीच जास्ती कुरकुरीत लागतात. मला टेरा बरोअबर्च केप कॉडचे आवडतात.
एकदा टारगेटमधे प्रचंड भूक लागली म्हणून आर्चर फार्मचा हलोपिनो चेडर वाला चिप्स चा पॅक घेतला होता तो एका सिटींगमधे संपला.
बिस्कीट भाकरी काय प्रकार आहे?
बिस्कीट भाकरी काय प्रकार आहे? पाककृती की ब्रॅन्डेड /मार्केट डिश?
मिर्च मसाला brand चा
मिर्च मसाला brand चा भेल-मिक्स खुप मस्त आहे,हल्दिरामचे चाय्-पुरी नावाचा एक तिखट पुरीचा प्रकार चांगला झणझणित आणि चवदार आहे.
बिस्कीट भाकरी काय प्रकार आहे?
बिस्कीट भाकरी काय प्रकार आहे? पाककृती की ब्रॅन्डेड /मार्केट डिश?
>> गुजराती पाकक्रुति प्रकार आहे.
.
.
नास्टाला उखरी हा प्रकार अतिशय
नास्टाला उखरी हा प्रकार अतिशय उतम आहे. पोळीचे पीट कमी पान्यात भिजवा.पुरिपेक्शा थोडे मोटे लाटा.भाकरिपेक्शा थोडे जाड. चाळ्णीवर किवा oven bake करा.वर तुप बरोबर लसुन चटणि
लहान मुलाना वेफर्स ,कुरकुरे
लहान मुलाना वेफर्स ,कुरकुरे अस पँकफुड सतत दिल्याने त्यांच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त मीठ जात
त्याचे दुश्परीणाम कायम्स्वरूपी असतात याची जाणीव असावी .
नेटवर बिस्कीट भाकरी शोधले तर
नेटवर बिस्कीट भाकरी शोधले तर ही http://www.chiangkrua.com/2009/06/biscut-bhakri.html रेसिपी मिळाली. हीच का ती बिस्किट भाकरी?
स्पेशल के च चॉकोलेट सिरियल (
स्पेशल के च चॉकोलेट सिरियल ( कोको ची हिंट असलेल आणि डार्क चॉकोलेट चे तुकडे असलेल ) आणि सिनॅमन पिकॅन सिरियल आवडतं. सि.पिकॅन तर दुधात छान भिजवून खाल्लं तर पुरणपोळी खाल्ल्यासारख वाटतं.
इंडियन स्टोअरमध्ये मिळणारा केक रस्क्,खाकरा आणि कुठल्यातरी परदेशी ब्रँडची लाल पॅकिंगमधली डायजेस्टीव्ह बिस्किट्स मस्त असतात.
Pages