रव्याचे कटलेट्स.

Submitted by आरती on 14 July, 2016 - 15:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेल, रवा
तिळ, हळ्द, हिंग, मिठ
कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं
गाजर, बटाटा (ऐच्छीक भाज्या)

क्रमवार पाककृती: 

कढईत चमचाभर तेल घेउन रवा थोडासा भाजुन घ्या. मग त्यात पाणी घालुन एक वाफ आणा. छान गोळा तयार होई पर्यन्त हलवत रहा. रव्याचा गोळा ताटात काढुन ठेवा.
गाजर - बटाटा - आलं किसुन घ्या. भाज्यांचा किस, तेल, मिठ, तिळ, हळद, हिंग, कोथिंबीर, मिरची सगळे एकत्र करुन रव्याचा गोळा मळुन घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करुन हाताने दाबुन आकार थोडे चपटे करुन घ्या. थोडे तेल टाकुन तव्यावर दोन्ही बाजुने खरपुस परतुन घ्या. किंवा बेक करुन घ्या.
.
cutlet.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

१. फेसबुकवर एक व्हिडीओ बघितला होता. पण रव्याचा गोळा करण्या पर्यंतच बघितला होता. पुढचे सगळे अन्दाजे केले आहे.
२. मोजुन मापुन न केल्याने प्रमाण नक्की लिहु शकले नाही.
३. रवा फुलत असल्याने इतर काही कोटींगची गरज नाही.

माहितीचा स्रोत: 
फेसबुक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो, मस्त! आत्तापर्यंत रवा हा कोटिंगपुरताच वापरल्याने हे डोक्यात आले नव्हते कधी. आता करुन बघीतले पाहीजे. छान कुरकुरीत दिसतायत.:स्मित:

थोडक्यात उपमा करून त्याची कटलेट्स करायची Wink
छान दिसत आहेत कटलेट्स. ती वळायच्या किंवा भाजायच्या आधीचा एखादा फोटो असला तर देशील का? म्हणजे रव्यात पाणी किती घालायचं त्याचा अंदाज येईल.

मस्त! सोपा प्रकार आहे. करून बघणारच. भाज्या वापरायच्या नसतील तर किसलेले सुके खोबरेही वापरता येईल.
मंजूडीच्या आयडियेप्रमाणे गोळा होत आलेल्या रव्यातच बाकीचे घटक पदार्थ घालून एक वाफ आणली तर सगळे पदार्थ मस्त एकजीव होतीलसे वाटते. उपमा, सांजा हे नेहमीच्या करण्यातले पदार्थ असल्यामुळे ही कटलेट्स लगेच जमतील असे वाटते. Happy

मंजूडी,
उपम्यापेक्षा ओलसर हवे. छान कणके सारखा गोळा मिळुन येतो लगेच. गोळ्याचा फोटो नाही पण कच्चे कट्लेट आहेत. टाकते. Happy

अकु, मस्त आहे कल्पना, अजुन थोडे झट्पट होतील.

हो. बीट घालता येईल. इतरही आवडीच्या भाज्या घालता येतील.

एकूणात चवी बद्दल साशंक आहे! >> डीपफ्राय करा उत्तमच लागतील :p

सगळ्यांना धन्यवाद. Happy

कल्याणी,
रवा पुर्ण भाजलेला नाहिये आणि पाणी जास्त घातले की आपोआपच गोळा तयार होतो. जसा उपम्यात पाणी जास्त पडल्यावर होतो तसाच Happy