वेज बर्गर्/अलू टिक्कि बरगर(फोटो सहित)

Submitted by गोपिका on 3 February, 2014 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रतिसादामध्येच फोटो टाकते आहे.फोटो कसे आहेत हे हि जरूर सांगा Happy
१. २ मोठे बटाटे - उकडलेले
२. हिरवे मटार - १/२ कप
३. कोणताहि गरम मसाला - २ टे. स्पू.
४. मीठ - चविनुसार
५. क्रश्ड पुदिना किव्वा ताझा बारिक चिरलेला अगर ठेचुन घेतलेला - १ टे.स्पू
५. टोमॅटो केचप किवा प्युरी - २ टे.स्पू.
६.मैदा - अन्दाजाने घ्याव, टिक्कि ला दोनि बाजुने लावायचा आहे
७. लोणि - १/४ कप (पातळ करुन घेतल्यास उतम)

क्रमवार पाककृती: 

१. ऊकडलेल्या बटात्यात मटार्,गरम मसाला,केचप्,पुदिना,मीठ घालुन चांगले मॅश करुन घ्यावे
२. बटाट्याचा टिक्कि किवा पॅटीस बनवून घ्यावे.
३.दोन्हि बाजुने हल्क्या हाताने मैदा लाउन घ्याव, जेणे करुन शालो फ्राय करतान सोपे जाइल
४.तवा गरम कर्रोन, लोणि पसरुन घ्यावे व हे पॅटीज शलो फ्राय कररण्यासाठि थेवावे.
५.एक बाजु खरपूस भाजुन झालि कि,दुसरि बाजु भाजुन घ्यावि,लागेल तसे लोणि घालुन.
६.आपल्याला हवे ते वज्जीस व चीस सोबत हे पॅटीज बर्गर ब्रेड मध्ये घालुन सर्व्ह करावे

वाढणी/प्रमाण: 
५ टिक्कि बनतात
अधिक टिपा: 

१.वाटल्यास, मैदा हि बटाट्यात मळुन घेता येतो
२.लोणिच वापरा, चव छान येते
३.बच्चे कंपनि ध्यानात घेउन आजिबात तिखट नाहि वापरले.पण अव्वडिनुसार तिखट हि बनवता येइल
४.वाटल्यास गाझर्,बीट इत्यादि किसुन घालता येइल बटाट्या मध्ये.

माहितीचा स्रोत: 
प्रयोग करुन पाहिला
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users