Submitted by सायो on 15 March, 2012 - 12:53
पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरभी रेस्टॉरन्ट मधे पाव भाजी
सुरभी रेस्टॉरन्ट मधे पाव भाजी नॉर्मल ' बन्स ' ऐवजी 'मसाला पाव' बरोबरोर सर्व्ह करायचे :).
जरा जास्तच स्पायसी लागतं हे काँबो पण कधीतरी खायला झकास.. तिखट लागल्यावर मस्तानी प्यायची
सुरभी ? JM रोड वरच का?
सुरभी ? JM रोड वरच का?
हो, तेच.
हो, तेच.
हे बघा, मागे अंजलीने दिली
हे बघा, मागे अंजलीने दिली होती बहुतेक
http://m.youtube.com/watch?v=Pye6pnZpjfs
अजुन एक हट के
अजुन एक हट के प्रेझेंटेशनः
माझी ची मैत्रीण' सीया' हिने बनवलेली भाजी आणि तिनेच काढलेला फोटो
पाव भाजी सर्व्हड इन ब्रेड बोल :).
मस्त आयडिया.
मस्त आयडिया.
सही. ब्रेड बोलमध्ये रगडा/छोले
सही.
ब्रेड बोलमध्ये रगडा/छोले घालून पण मस्त लागतील.
माझी रेसिपी : लसूण + लाल तिखट
माझी रेसिपी :
लसूण + लाल तिखट + जिर्याची पावडर एकत्र वाटून घेते.
बटाटे, फ्लॉवर (किंचित हळद घालून - त्याने वास जातो), वाटाणे, हिरवी आणि लाल ढबू मिरची, (मी गाजर आणि लाल भोपळाही लोटला आहे वेळप्रसंगी), टोमॅटो (हे सर्वात वरच्या डब्यात - अजिबात पाणी न घालता), यांना कुकरला दोन शिट्ट्या काढून घेते.
बटर गरम करून त्यावर आधी ते वाटण घालते, थोडा बादशाह पावभाजी मसाला (बटरवर घातला की रंग मस्त येतो) घालते. थोडा रजवाडी गरम मसालाही घालते. हा सीक्रेट इन्ग्रेडियन्ट.
मग कांदा घालून परतते. त्याला तेल सुटलं की क्रमाने बाकी उकडलेल्या भाज्या मॅश करून.
चवीनुसार मीठ. चव बघून लागला तर आणखी पावभाजी मसाला. जशी कन्सिस्टन्सी आवडत असेल त्यानुसार पाणी. (हे भाज्या शिजवलेलंच पाणी घालते.) चवीनुसार लिंबूरस.
गॅस बंद केला की कोथिंबीर.
टिप्स म्हणजे वर उल्लेख केलेले दोन मसाले आणि भाजी पूर्ण (आणि अंमळ सढळहस्ते घातलेल्या) बटरमधेच करणे याच.
----
डिज्जे, भारी आयडिया! लेकाला आवडेल अगदी!
सही आयडिया आहे.
सही आयडिया आहे.
पावभाजी मसालाचे एवढे सारे
पावभाजी मसालाचे एवढे सारे ब्रॅन्ड्स आहेत? सगळ्यात चांगला कुठला?
मी आधी एवरेस्ट वापरायचे, पण इतक्यात दररोजच्या भाज्यांमधे ( पनीर बुर्जी, आलु मटर, बटाटा-टोमॅटो, मश्रुम मटर, बटाटा रस्सा या सगळ्याच भाज्यांमधे) पावभाजी मसाला वापरायला लागल्यामुळे, आता पावभाजी स्पेशल वाटणारच नाही अशी काळजी वाटते आहे. दररोज तोच मसाला खाल्ल्यामुळे पावभाजीचं कौतुक कसं वाटेल? त्यामुळे वेगळा मसाला (ब्रॅन्ड) हवा आहे.
हा विडिओ पहा
हा विडिओ पहा http://www.youtube.com/watch?v=Pye6pnZpjfs एकदम तोंपासु
अशीच मी एकदा - दोनदा घरी पण केली होती एकदम चौपाटी वर असते तशी चव आली होती
दिपांजली सही
मसाला पाव--आधी साध्या पावाला बटर लावुन भाजायचं, थोडा ब्राउन झाला की त्याला कांदा-लसुण मसाला (वडा-पाव सोबत असते ती चटणी) किंवा पाभा मसाला लावायचा आणि परत थोड्यावर भाजायचा (बटर वर!!!) ..आ हा हा !!
माधुरी, वर हाच विडिओ दिलाय बघ
माधुरी, वर हाच विडिओ दिलाय बघ
अरे हाच विडिओ बहुतेक सायो ने
अरे हाच विडिओ बहुतेक सायो ने वरती दिला आहे
दिपांजली, हटके प्रेसेंटेशन मस्तच.
मागे पार्ल्यात ही टिप दिली
मागे पार्ल्यात ही टिप दिली होती ( प्रज्ञा९ किंवा बिल्वा बहुतेक )
मेधा, एक सुचवू का?
मी जेव्हा पावभाजी करते तेव्हा कांदा अमूल बटरमधे परतून घेते, त्यात १ टीस्पून गरम मसाला घालते, आणि १ टीस्पून (एकत्र) धने पावडर + चाट मसाला. थोडा पाभा मसाला आणि लाल तिखट कांद्याबरोबर परतते, बाकीचं भाज्या घातल्यावर.
मी बादशाहचा पाभा मसाला वापरते. एव्हरेस्ट वापरून धने वगैरे घातले तर कसं लागेल अजून करून बघितलं नाहिये. हे प्रमाण २ जणांसाठी करताना घालते, पण चव बघून मग वाढवता येइल. बर्यापैकी होते स्टॉलवाल्यांसारखी. स्मित
मी लाल मिरची पावडर मध्ये थोड
मी लाल मिरची पावडर मध्ये थोड पाणी घालते आणि मग ती पेस्ट पावभाजीत घालते. अगदी सुरेख रेड कलर येतो.
वरच्या टिप्स आत्ता वाचल्या. मी पण रजवाडी गरम मसाला थोडासा घालते. संजीव कपुर वर टिप बघितलेली.
अलिकडे सुहानाचा मसाला वापरत आहे. बेस्ट आहे.
डिजे , क्लास आयडिया आहे ती. भयंकर आवडली.
दिपांजली सही आयडिया आहे. माझे
दिपांजली सही आयडिया आहे.
माझे दोन पैसे
कांदा बटरमधे परतल्यावर त्यात कुटलेली हि. मिरची, आलं, लसुण वाटण व्यवस्थित परतुन घेणे. हि.मिरचीने चव खुपच छान येते. हे सगळं परतुन झाल्यावर पावभाजी मसाला (बादशाहा) टाकुन, सुगंध घरभर दरबळेपर्यंत सगळं परतावं, मग शिजविलेल्या भाज्या टाकाव्या.
पाव जर क्रिस्पी आवडत असतिल तर पाव कापल्यावर त्यावर बटर स्प्रे मारावा आणि ओव्हन ब्राईलवर सेट करुन पाव भाजयला ठेवावेत, १मि क्रिस्पी पाव तयार. १०-१५ लोक असले तरी पाव भाजत न बसता हे सोपे पडते.
काय भारी टिप्स आहेत सगळ्या.
काय भारी टिप्स आहेत सगळ्या. डीजे, तुझ्या मैत्रिणीची आयडिया फारच मस्त आहे.
माझी १ मैत्रिण आणि १ मित्र पाभा मसाल्याबरोबरच थोडा कांदा लसूण मसाला पण घालतात. त्यांची पा भा जबरी होते.
मे आता नेक्स्ट टायमाला रजवाडी गम घालून बघणार(आणि खाणार)
हे अॅड करतेच , ज्या
हे अॅड करतेच , ज्या मैत्रीणीची आयडिआ आहे तिचं स्वतःच च असं म्हणणं आहे कि चवीला नेहेमीचा पाव भाजी ब्रेड च जास्तं छान लागतो, हे असच कधी तरी हटके म्हणून :).
रजवाडी गम >>> ते घातल्यावर
रजवाडी गम >>> ते घातल्यावर दात सांभाळा म्हणजे झालं
हिरवी मिरची घालावी असं मला पण नेहमी वाटतं पण आमच्याकडे पाभा करायची म्हटलं की मिष्टर मला स्वैपाकघरात फिरकू सुद्धा देत नाहीत. कोतबो
अरेरे बिल्वा ऊगी ऊगी
अरेरे बिल्वा ऊगी ऊगी
मी पण नेहमी एवरेस्ट किंवा
मी पण नेहमी एवरेस्ट किंवा बादशाह चाच पावभाजी मसाला वापरते..मध्ये 'केप्र' चा पावभाजी मसाला वापरला होता..छान आहे तो पण मसाला..
डीजे : फोटो बघून मला बोस्टन मधला 'chowda ' हा प्रकार आठवला..:)..तसाच देतात इकडे तो..
हो तेच >>> माझी सगळ्यात
हो तेच
>>>
माझी सगळ्यात फेवरेट पावभाजी आहे तिथे मिळणारी
आमचा कट्टा होता सुरभी
लैच मिसते मी सुरभीला आणि तुझ्यामुळे आठवण आली मला
आता उद्याच जाउन खाते
रंगाकरता: १. पावभाजी मसाला
रंगाकरता:
१. पावभाजी मसाला आणि तांबड तिखट निम्मं तेल, निम्मं बटर (गरम तेल) ह्यामधे घालून मग त्यात पावभाजी करणे, रंग कमी वाटला तर नंतर वरुन घालूनही चालते ही फक्त तेल मसला आणि तिखटाची फोडणी..
माझ्या एका मैत्रिणीने
माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेल्या टीप्स -
१. टोमॅटो वाटून / प्युरे वेगळ्या भांड्यात खूप बटरवर परतून घ्यायची मग इकडे कांदा परतून झाला की त्यात मिक्स करुन परत ते एकत्र परतून घ्यायचं.
२. सगळ्या भाज्या घातल्यावर एक वाफ आल्यावर परत त्यात मधोमध एक छोटा खड्डा टाईप तयार करुन त्यात गरम तेल घालून त्यात पाभा मसाला घालायचा. मी हे कधी केले नाही अजून पण ती करायची ते आवडायचे.
आमच्याकडचा कुक बेल पेपर्स आणि सिमला मिर्ची कांदा टोमॅटॉ नंतर अगदी बारीक चिरुन परतून घ्यायचा, शिजवायचा नाही. ती चव छान लागायची थोडी क्रंची.
खा रे खा ची पाव भाजी:
खा रे खा ची पाव भाजी: http://kha-re-kha.blogspot.com/2011/02/blog-post.html
मवा, ह्या रेसिपीत पण भो मि परतली आहे, शिजवलेली नाही.
मला पण परतूनच आवडते. तो कुक
मला पण परतूनच आवडते.
तो कुक मटारदाणे पण वेगळे थोडे पाण्यात शिजवून ते वरुन पेरायचा, छान दिसायचे. फक्त त्याचा गोल शेप अन रंग तसाच राहीला पाहीजे, कुकरमधे वाफवले की रंगच बदलतो.
डिज्जे एवढा मोठा बोल तोंडात
डिज्जे एवढा मोठा बोल तोंडात कोंबणार कसा ?
कोथरूड मध्ये 'शीतल' ची
कोथरूड मध्ये 'शीतल' ची पावभाजी पण एकदम मस्त!
औंध मध्ये शिवसागर' ची पण!
चीज पावभाजी चालणार असेल तर मस्त मोझोरोला चीज किसून घालायचे!
आणि लाल रंग येण्यासाठी थोडेसे बीट उकडून, कुस्करून घालायचे.
डिज्जे एवढा मोठा बोल तोंडात कोंबणार कसा ? >> बोल तोडनेका और कोंबनेका !
शिवसागरमधे डोसा पावभाजी असते,
शिवसागरमधे डोसा पावभाजी असते, तोहि एक जबरदस्त प्रकार आहे. डोसा थोडा आंबूस असेल तर पावभाजीबरोबर अधिकच भन्नट लागतो.
अरे सहीच! पाभा म्हणजे अगदी
अरे सहीच! पाभा म्हणजे अगदी जी की प्रा
सुरभी, शीवसागर ... आई ग्ग्ग्ग्ग्ग्ग.......... कित्ती दिवसात नाही खल्ली पाभा...
इथे बादशहा मसाला कधी कधी मिळत नाही... पण मंगल नावाच्या ब्रँडचा पाभा मसाला देखिल चांगला आहे. मला एव्हरेस्ट पेक्षा मंगल जास्त आवडला.
डीजे आयडिआ भारीच.
'बन-फुल्ल' सारखेच
Pages