मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< घरात शिरायला त्या घराच्या मालकानेच स्वतः किल्ली दिली असे त्या म्हणाल्या >>
माझ्यामते तरीसुद्धा हे चूकच आहे. हाच नियम घरमालकाने भाडेकरूंच्या घराची किल्ली देऊन किंवा हॉटेल मालकाने खोलीची किल्ली देऊन पाळत ठेवायला लावली तर? घर कोणाच्या मालकीचे आहे हा मुद्दा गैर आहे. एखादे निवासस्थान हि खाजगी जागा असते व त्या वेळी तिथे राहणाऱ्या लोकांचा खाजगीपणा जपला जावा असे मला वाटते.

>>मुलाखतीत सगळीच उत्तरं प्रामाणिक असतील याची काय खात्री?
सहमत. एकंदरीत आम्हाला सतत मॅनिप्युलेट करावच लागतं, खूप खोटं बोलावं लागतं हे त्याच स्वतः अनेकवेळा म्हणत असल्यामुळे एकंदरीत मुलाख तीतल्या उत्तरे/केसेस तरी कितपत खर्‍या असाव्यात, असं वाटत होतं.

प्रिया काकडे यांची मुलाखत पाहिली. नंतर सहज गुगल केलं तर त्यांचं लिंक्डइन प्रोफाईल आहे आणि त्यावर फोटोही आहे. मग या मुलाखतीत का लपवला देव जाणे.

एक गोष्ट खटकली. शुगर मॉम्सच्या केस मध्ये 'या बायका अशा असतात' वगैरे बोललं गेलं पण शुगर डॅड्सच्या बाबतीत पुन्हा त्या लहान वयातल्या मुलींवरच ठपका ठेवला. मुली छोट्या शहरांतून येतात, पैशाचा लोभ असतो टाईप. दोन्ही केसेस मध्ये स्त्रीच दोषी.

शुगर मॉम्सच्या संदर्भातही इतकं वय झालं तरीही यांना फिजिकल नीडस असतात वगैरे अगदीच naive and judgmental विधानं केली गेली. कदाचित पुरुषांना फिजिकल नीड्स असतात तश्या स्त्रियांनाही (कोणत्याही वयात) असू शकतात हे अजून स्विकारलं जात नाहीये.

मामींशी सहमत.

कॉन्सलर, सायकॉलॉजिस्टस आणि डिटेक्टिव्ह यांनी जजमेंटल असू नये. आपले व्यकतीगत मत बाजूला ठेऊन केस हाताळावी पण ह्या प्रिया काकडे पर्सनल मत आणि प्रोफेशनल काम मिक्स करत होत्या असं वाटलं

खटकण्यासारखंच आहे मामी. मला नुसतं वाचून सुद्धा खटकलं. As a woman I feel like people expect us to adjust, not to talk about our needs, judge other women as needed, tame down to fit the society's expectations and dumb down for people to like us. स्त्रियांनी आपण आपलं kick-ass व्हावं झालं. किती एनर्जी जाते यात पण. त्यात मी सवर्ण, ममव आणि प्रोटेक्टेड वातावरणात राहीलेली आहे, जे या सामाजिक गटात येत नाहीत त्या स्त्रियांचं आयुष्य तर किती असुरक्षित असेल. असे विचार मला अधुनमधून येतात, तुमच्या पोस्टींनं निमित्त मिळालं. Happy

>> प्रिया काकडे यांची मुलाखत पाहिली. नंतर सहज गुगल केलं तर त्यांचं लिंक्डइन प्रोफाईल आहे आणि त्यावर फोटोही आहे. मग या मुलाखतीत का लपवला देव जाणे.>> हो तेच कळलं नाही.

खऱ्या हाडाच्या detective असाव्यात. आता फोटो दिसत नाहीये. इथली चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचली सुद्धा.

बघा नाहीतर मा बो सदस्य असायच्या. सगळ्यांची हिस्टरी जियोग्रॉफी असायची त्यांच्या कडे Lol

दिल के करीब वर डबिंगच्या क्षेत्रात काम करणारे श्री. प्रसाद फणसे यांची मुलाखत बघितली. डबिंग देणे म्हणजे आवाज देणे एवढेच जुजबी माहित होते. या मुलाखतीमुळे छान माहिती मिळाली.

>>मामींशी सहमत.

कॉन्सलर, सायकॉलॉजिस्टस आणि डिटेक्टिव्ह यांनी जजमेंटल असू नये. >> +१

Secularism, Constitution और British Raj की J Sai Deepak ने क्या 'गलतियां' गिनाईं? Kitabwala : https://www.youtube.com/watch?v=-tluGfbGKJ0&t=2141s

लल्लनटॉपच्या सौरभने घेतलेली साई दिपक यांची ही मुलाखत वजा साई दिपकच्या पुस्तकाची चर्चा. माहितीपूर्ण वाटली म्हणून इथे शेअर करत आहे. अनेक मुद्दे आहेत कारण विषयच मोठा आहे आणि या चर्चेत पुस्तकात जे जे मांडलंय त्या विविध मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे.

अरेच्च्या! मामी, मीही लल्लनटॉपवर सौरभ द्विवेदीने घेतलेली प्रशांत किशोरची मुलाखत शेअर करायला आले होते. पीकेने निवडणूक सल्लागार म्हणून नाव कमावलेल आहे. पण त्याचा नवीन प्रयत्न जास्त इंटरेस्टींग वाटतो आहे.
https://youtu.be/TlvKX41DFEM?feature=shared

मुलाखत पाहिलेली नाही पण साई दिपकच्या एक दोन मुलाखती पाहिलेल्या आहेत. मला तो फॅनॅटिक वाटतो म्हणून बघवत नाही विशेष.

साई दीपक म्हणजे आपण दिवाळीत फटाके लावतो कारण पक्ष पंधरवड्यात पृथ्वी वर आलेल्या आत्म्यांना परत स्वर्गात जायची वाट सापडावी म्हणून असे म्हणणारा ! .

२०२४मधील सर्वाधिक बहुचर्चित / वादग्रस्त ठरण्याची १०१% शक्यता असलेली टकर कार्लसनद्वारा रशियन प्रेसिडंट व्लादिमीर पुतीन यांची मुलाखत

https://x.com/TuckerCarlson/status/1755734526678925682?s=20

विवादास्पद यासाठी की युक्रेन युद्ध सुरू झाले नी ऑलमोस्ट सर्व चॅनल्सनी रशियन साईड दाखवणे बंद केले. इव्हन आरटी चॅनलचे प्रक्षेपण भारतातही काही दिवस बंद होते.
आत्ताही मुलाखत प्रक्षेपित व्हायच्या आधीच गोंधळ सुरू झाला आहे. व ‘एक्स’ शिवाय इतर सोशल मिडीआवर कदाचित ही मुलाखत दाखवली जाणार नाही म्हणून हा प्रपंच.

अजून पूर्ण मुलाखत ऐकली नाही परंतु जेवढे ऐकले आहे त्यात इंटरेस्टींग वाटली ती ‘युक्रेन हा वेगळा एथनिक ग्रुप नाही. साम्राज्याच्या सीमेवर राहणारे/ सीमा सुऱक्षेसाठी काम करणारे लोक म्हणजे युक्रेनिअन’ ही रशियन संज्ञा.

अजून एक उत्तम गोष्ट या मुलाखतीमधून कन्फर्म झाली कि पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (क्रयशक्ती?) मध्ये भारत ही जगातील ३ नंबरची इकॉनॉमी झाली आहे. सरकार व विरोधक वेगवेगळे दावे करत असतात. परंतु एका त्रयस्थ सुपरपॉवरकडून हे ऐकणे आनंदाची गोष्ट आहे. मुलाखतीचा रोख भारतावर नसताना आणि जगातील इकॉनॉमीज डिस्कस करताना बोलण्याच्या ओघात समजलेली गोष्ट असल्याने याला प्रपोगंडा म्हणता येणार नाही.

मित्र म्हणे वर अमृता सुभाषची मुलाखत आली आहे. जितकी पाहिली तितकी आवडली आहे. अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष आवडतातच. त्यांच्याबद्दल जास्त जाणून घ्यायला आवडलं.

https://youtu.be/JrnER453skc?si=sKsxq_nJuOfKhScc
Naseeruddin shah on #Be a man Yaar

नसीरुद्दीन शाहची ही मुलाखत रविवारी बघितली. फार सखोल किंवा तपशीलवार नसली तरी हिवाळ्याच्या निवांत सकाळी बघायला उबदार वाटली. पोपटी शर्ट आणि गर्द निळ्या जॅकेट मधे ग्रेसफुल वाटला एकदम. आपल्या लहानपणीच्या आठवणी, मामा लोकांचा toxic male ego, आईचा शांत समजदार स्वभाव, बाबांचा थंड दुरावा, भावंडांमध्ये रूढार्थाने अपयशी असणं, शिक्षणाची तीव्र नावड आणि क्रिकेटची आवड व त्याचं आणि मुलांचं आणि त्याचं आणि रत्नाचं नातं या वैयक्तिक गोष्टींवर गप्पा आहेत. RRR आणि पुष्पा सिनेमे असह्य झाले हेही सांगितले आहे. Alpha Male हा चुकीचा ट्रेंड पुरुषी अहंभाव आणि असुरक्षितपणा यातून आला आहे अशी टिप्पणी केली आहे. मोकळेपणाने बोलला आहे. मुलाखत घेणारा लाजत विचारत होता का in awe of a legend होता काय माहिती. खुलून बोलला नाही. मुलाखत आवडली.

Think bank वरती बऱ्याच छान मुलाखती आहेत असे वाटते.
रघुनाथ माशेलकर ह्यांची मुलाखत ऐकली होती.

Youtube वर
कथा सईची म्हणून सिरीज आहे ती पण खूप आवडली... सगळे भाग नाही बघून झाले अजून ..

रघुनाथ माशेलकरांची थिंक बँकवरची मुलाखत पाहिली. ते आमच्या इथे दरवर्षी एकदातरी येतात, त्यामुळे आतापर्यंत किमान तीनदा त्यांचं व्याख्यान ऐकलं आहे आणि एकदा त्यांच्या हपिसात जाऊन भेटायचं धाडसही केलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल अतीव आदर आहे (हे आधी म्हटल्यामुळे पुढे मी काहीतरी नावडतं सांगणार आहे हे एस्टॅब्लिश होतं). पण ते सर्व व्याख्यान आणि मुलाखतींत तेच तेच सांगतात. दर वेळी व्याख्यानाचं शीर्षक वेगळं असतं, पण आत विषय तेच असतात आणि बर्‍याच स्लाईड्सही त्याच, तीच उदाहरणं आणि अनेकदा (इथे तरी) प्रेक्षकही बरेचसे तेच!

त्यांचे मुद्दे पूर्णपणे चुकीचे नाही म्हणता येत, पण तरी का पटत नाहीत हे नीट सांगता येत नाही. एक म्हणजे ते नेहमी जे मोबाईल - कॉलकॉस्टचं उदाहरण देतात, ते काही गरीबांना परवडावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झालं असेल असं वाटत नाही. अ‍ॅफोर्डेबल तंत्रज्ञान असावं या बाबतीत दुमत नाही, पण त्याची कर्मर्शियली यशस्वी उदाहरणं दिसत नाहीत. जी दिसतात, आणि ते सांगतात, ती कंपन्यांना मास अपील बनवून त्यातून मोठा फायदा दिसला म्हणून आहेत. शिवाय त्यात फारशी जीवनोपयोगी/ अत्यावश्यक गोष्टींची नाहीत. ते स्वतः त्यांच्या फाउंडेशन मार्फत असं तंत्रज्ञान शोधणार्‍यांना आधार देतात (आणि हे ते आवर्जून दर ठिकाणी सांगतात), हे स्तुत्य आहेच, पण त्यातूनही काही मोठ्या प्रमाणावर गरीबांना उपयोग झाल्याचं उदाहरण नाही - कारण कंपन्या तसं ते होऊ देणार नाहीत.

त्यांच्या तेच तेच सांगण्यामागे 'हा महत्त्वाचा विषय वेगवेगळ्या देशातील लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगावा, म्हणजे काही फरक पडेल' असा उद्देश असण्याची शक्यता आहे. शिवाय इतकं मोठं कार्य (संशोधन, आयपी - हळद, बासमती वागिरे प्रसिद्ध आहेच, त्यासाठी जागतिक मोठ्या धेंडांशी दोन हात) करणार्‍या माणसापुढे छिद्रान्वेष करायला मी कोण लागून गेलो? त्यामुळे मी गप्प बसतो झालं.

माझेमन, का आवरली आहे इच्छा....लिही सरळ. आम्हालाही काही तरी नवीन वाचायला मिळेल. Happy

आधी म्हटल्यामुळे पुढे मी काहीतरी नावडतं सांगणार आहे हे एस्टॅब्लिश होतं>>>> ह्याला 'सॅन्डविच पोस्ट' म्हणतात. म्हणजे आधी कौतुक करायचे आणि शेवटी पुन्हा थोडी स्तुती करायची आणि मधे रोखठोक सांगायचे. Happy
तुम्ही लिहिलेलं मला कळलं. एखाद्या माणसाची भरपूर व्याख्याने बघितली की तो काहीच नवीन सांगत नाही हे लक्षात येतं. शिवाय जरा त्या माणसाचा 'ऑरा' बाजूला केला की सत्य बऱ्यापैकी स्पष्ट होतं.

बऱ्याचदा तर त्या माणसाची प्रसिद्धी व वलय बाजूला केलं की ती व्यक्ती माणूस म्हणून काहीच इंट्रेस्टींग उरत नाही. हा माझा अनुभव आहे.

अच्छा. या पॅटर्नला सँडविच पोस्ट असं नावही आहे होय!

त्या माणसाचा 'ऑरा' बाजूला केला की >> त्याचे 'ऑरी' बरोबरचे फोटो सापडतात

मला एक पॅटर्न लक्षात आला आहे. एक व्यक्ती एका पॉडकास्टमध्ये दिसली की सगळ्या लोकांच्या पॉडकास्टमध्ये दिसते आणि अर्थातच तोच तोच कंटेंट. अगदी आत्ता लक्षात आलेलं नाव म्हणजे स्मिता ठाकरे.

हो सायो, मग सगळीकडे ते तेच-ते बोलतात. त्यामुळे ती मुलाखत नसून पावसाळ्यात जागोजागी आलेल्या कुत्र्याच्या छत्रीसारखे 'सेल्फ प्रमोशन' वाटते.

ऑरी, अगदी. Famous for being famous Lol

अगदी थोड्या कालावधीत घेतलेल्या मुलाखती असतील तर कंतही माणूस तेच बोलणार ना... प्रत्येक मुलाखती साठी तो वेगळं content कुठून आणणार...? कारण ती काय रोज नवीन गोष्ट रचून सांगायची नसते.
एखाद्या माणसाच्या ३-४ मुलाखती आल्या तर आपण एखादी बघावी... म्हणजे आपला पण वेळ वाचतो.

माशेलकरां सारख्या व्यक्तीची तीनेक वर्षा पूर्वीची मुलाखत बघावी, परत काही वर्षा नंतर ची बघावी.. नक्कीच वेगळा content मिळेल.

मी पहिल्यांदाच बघितल्या मुळे मला आवडली.. काही नवीन माहिती मिळाली. उपक्रम स्तुत्य वाटले.

स्वस्त मोबाईल आणि data उपलब्ध झाल्यामुळे ते बऱ्याच लोकांपर्यंत किंवा गावागावात पोहचले.... आणि ते मोबाईल network/ infrastructure तयार झाल्यामुळे किंवा झाल्यावर मग UPI येवढ्या व्यापक स्तरावर वापरात येऊ शकले..

हरचंद, माशेलकरांची ही मुलाखत बघितलेली नाही. पण पूर्वी जे काही वाचलेलं/ ऐकलेलं आहे त्यावरुन त्या माणसाबद्दल माझं फारसं चांगलं मत नाही. स्पष्ट सांगायचं तर बोल बच्चन पोकळ वासा असावा असा माझा ग्रह आहे. खखोदेजा.
नासिरची मुलाखत बघतो.

Pages