मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारती टीव्ही वर भारती सिंग ने घेतलेली जीतू भैय्या (कोटा फॅक्टरी, पंचायत सचिवजी fame) ची मुलाखत पाहिली. छान वाटली. तो actor आवडतोच मुळात. सरळ साधा आपल्या तूपल्यातला वाटतो. त्यामुळे मुलाखत आवडली. अजून खूप होत त्याच्याकडे सांगायला पण मुलाखत घेणाऱ्या भारती आणि हर्ष चाच अभ्यास कमी पडला असं वाटलं प्रश्न विचारताना.

मित्र म्हणेवरची फक्त अतुल परचुरेची मुलाखत बघितली आणि आवडली आहे. नंतर तोचतोचपणा आलेला दिसतोय असं वरचे प्रतिसाद वाचून वाटलं. अमुक तमुकवरची डॉ. भूषण शुक्लांची मुलाखत आवडली होती, पण बाकी बहुतेक नाही कुठली बघितली.
अमृता सुभाष मलाही आवडत नाही. ज्योती सुभाष आवडते, पण अभिनय टिपिकल झालाय हेही मान्य.
एकंदरीत मराठी मुलाखतींचं पेव फुटलेलं दिसतंय Lol

मित्र म्हणे ज्यांनी अजून पाहिलं नाहीये, त्यांच्यासाठी एक झलक -
समजा मित्र अमृता सु ची मुलाखत घेतोय.
मित्र - आता कोणता नवीन प्रोजेक्ट करते आहेस?
अमृता - अमुक अमुक प्रोजेक्ट मध्ये तमुक तमुक बरोबर काम करतेय.
मित्र - हो?
अमृता - ( डोळे मोठे करुन ) अरे हो. आपला तो हा डायरेक्ट करतोय.
मित्र - कॉय सांगतेस!

साधारण अशा प्रकारचे संवाद असतात. फक्त एकच, मित्र व्यवस्थित कपडे घालून येतो व खुर्चीत दोन्ही पाय खाली ठेवूनच बसतो.

Lol Proud आयला हो काय सांगतो / सांगते??
कसं कसं आपल्या प्रेक्षकांना नीट सांगा ना Proud
आई शप्पथ. असं पण असत? हे म्हणजे नवीन आहे मला.. >> मित्र म्हणे

अनघा_पुणे >> परफेक्ट! आणि शेवटचं कपडे व्यवस्थित आणि पाय खाली सोडून - हा अमुक तमुकला टोमणा पण भारी.

लंपन >> Happy

वरच्या बऱ्याच posts ना अनुमोदन
अनघा , लंपन Lol
मला व्हायफ़ळ पण नाहीय आवडत आणि मुलाखत घेणारा व त्याची frd/बायको जी कोणी आहे (प्राची बहुतेक तिचं नाव ) ती दिसत नाही कॅमेरा मध्ये व ती either अमराठी आहे किंवा मराठी असून जन्मल्यापासून english चा चमचा तोंडात घेऊन आली आहे.

मित्र म्हणे ..सौमित्र पोटे सध्या तरी आवडतोय पण तो हायला हो ? असं असतं? हा जो "मला माहीतच नाही" या क्षेत्रात असून हा जो आव आणतो तो फसतोय त्याचा मात्र त्याने प्रार्थना बेहेरे ला फार कोलले ती पण बिचारी अडकली त्यात व मी आळशी आहे वगैरे काहीही उत्तरे दिली आहेत

सुळसुळाट तर झालाच आहे -- abp माझा (कि असेच कुठेतरी ) ते श्रेयस तळपदे व त्याची बायको येऊन गेले तर लगेच ते मित्र म्हणे वर पण आले सगळे same कसा हार्ट अटॅक आला नि कसे सगळे झाले.. जे झाले ते वाईट व त्यातून ते बाहेर आले हे छान झाले पण सतत तेच तेच विचारले तर trauma जाईल का ? असो..

>> abp माझा (कि असेच कुठेतरी ) ते श्रेयस तळपदे व त्याची बायको येऊन गेले तर लगेच ते मित्र म्हणे वर पण आले सगळे same कसा हार्ट अटॅक आला नि कसे सगळे झाले.. जे झाले ते वाईट व त्यातून ते बाहेर आले हे छान झाले पण सतत तेच तेच विचारले तर trauma जाईल का ? >> अरे देवा!!! काय वैताग आहे एकच व्यक्ती सतत इथे तिथे दिसत राहण्याचा.

व्हायफळची बायको गुज्जू आहे. तिला मराठी नीट येत नाही पण ती कॅमेर्‍यामागे बोलते त्यामुळे ‘आता ही कुठून आली मधेच‘ असं होतं.

हहा (हा छोटा हुंदका समजा), (लाजत आणि हळू आवाजात) आई बाबांचं नाव नाही समजलं/ नावं काय आई बाबांचं? आणि तुम्ही किती भावंडं गं?
(चावट पणे लाजत) बर आता सगळ झालं आता आम्हाला, म्हणजे मला खात्री आहे प्रेक्षकांना पण खूप्प उत्सुकता आहे, तुम्ही कसे कधी आणि कुठे भेटलात ग?? (उत्तर ऐकल्यावर) तोंडाचा चंबू करून ' ऑ Ssss ' 'अय्या कित्ती गोSssड' ..
तुम्ही कित्ती गोड दिसायचा तेंव्हा म्हणजे आत्ता पण दिसता पण तेंव्हा म्हणजे मी अशी बघतच राहिले नाही खरच मी तुमच्या प्रेमातच पडले होते.. तुमचं दिसण, छान छान साड्या, अन् रुबाब आणि यू नो तो एक aura सगळ व्यक्तिमत्वच Proud
तुम्ही इथे आलात खरच खू Ssssssप धन्यवाद खूप छान वाटल तुमच्याशी गप्पा मारून. >> तर ओळखा पाहू मी कोण??? आणि हो प्रत्येक खूप हा खूप वेगळा आहे : P

गिफ्टचा भाग मी फॉरवर्ड करते. एकदा मीना खाडिलकर आल्या होत्या त्यांना गिफ्टचं काय करायचं कळत नव्हतं. आधीचे हातातच ठेवून पुढचं गिफ्ट घेऊ लागल्या. काहीच सुधरत नव्हतं त्यांना. वयोमानानुसार मंद मंद हालचाली करत होत्या, नीट आभारही मानले नाहीत. 'कधी संपणार गिफ्टागिफ्टी , कशाला इतका पसारा' टाईप कंटाळलेला चेहरा वाटला.

सुटकेस प्रकार तर अती झाला. स्वानंदी टिकेकर खूपच गोड आणि मोकळी मुलगी आहे. तिने फार छान आभार मानले. गिरीश कुलकर्णीने तर सुलेखालाच गिफ्ट आणले तेही छान वाटले.

Pages