मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मित्र म्हणे' वर डॉ केतकी कसबेकर यांची सौमित्र पोटे यांनी घेतलेली मुलखात पाहिली. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या समस्या हा विषय होता . मुलाखतकार साधारणपणे आपल्या विषयाचा अभ्यास करून येतो अशी अपेक्षा असते. आता कॉर्पोरेट क्षेत्रातले टीपीकल शब्द जसे की ग्लास सिलिंग, पॉश ऍक्ट, प्रोमोडोरो पद्धत कदाचित सर्वच प्रेक्षकांना माहिती नसतील म्हणून पण ते कदाचित पाहुण्यांना विचारात असतील . पण पोटे डिव्हर्सिटी inclusion, गॅस लायटिंग (एकदा तर गॅस लायटनिंग म्हणाले ) , स्टिरीओटाइप म्हणजे काय असे विचारत होते. हे शब्द आजकाल त्यांनी ऐकलेही नसतील हे जरा विचित्र वाटले. म्हणजे आता मीही कॉर्पोरेट क्षेत्रात नाही पण मी यावर वाचले / ऐकले आहे .
मग त्यांनी ऐकले नसतील का ? खूपच इनोसंट आहेत असे तरी भासवतात किंवा खरच त्यांचे वाचन मर्यादित आहे अशी फील आली

पूर्ण व्हिडीओ तर नाही . लाईफ स्टाईल इनसाईडर वर वाचलेली मुलाखत आहे.
इथे चालेल ना ? रील्स पाहून मुलाखत शोधून वाचली.
https://www.lifestyleinsider.co/gourmet/an-culinary-icon-in-india#:~:tex....

Chef Marco Pierre White यांनी जगातल्या सर्वात उत्तम रेस्टॉरंटपेक्षाही भारतातले स्ट्रीट फूड रूचकर आहे असे म्हटले आहे. मला भारतात यायला आवडते ते पदार्थांच्या चवीसाठी. एखादा देश आवडण्याचे प्रमुख कारण खाद्यपदार्थ असते आणि असायला हवे. भारतातल्या खाद्यपदार्थांच्या चवीचे राहस्य हे मसाल्यांची उत्तम समज आणि त्याचे परफेक्ट मिश्रण हे आहे असे ते म्हणतात.

मराठी चित्रपट सृष्टी तील कपडे पट सांभाळणारी मृदुल पटवर्धन एका असाध्य , ज्यावर काही औषध नाही अश्या आजाराने ग्रस्त झाली. योग्य आहार आणि व्यायाम ह्याच्या जोरावर तिने त्यावर काबू ही मिळवला. चित्रपट सृष्टीला राम राम करून आता डाएटिशियन झाली आहे. खूप inspiring झाली आहे आर पार मधील विनोद सातव ह्यांनी घेतलेली ही मुलाखत.
आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणजे नव्वद टक्के नट नट्या ह्यांच्याशीच संवाद साधला जातो. आणि त्याच व्यक्ती आपल्याला जीवनच तत्व द्न्यान ही शिकवतात. ह्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत वेगळी आणि चांगली वाटली. दोन महिन्यात अंदाजे दोन लाख व्ह्यूज ही मिळालेत म्हणून ही छान वाटलं.

सगळ्यांना संवादाबद्दल साधारण कल्पना यावी म्हणून विस्तृत लिहितेय. Everybody is included.

Explicit contents ahead -
https://youtu.be/0tXmc_cYW9Y?si=5tT-nyLXuJTHhmyU
She fell in love with chat GPT. Like actual love with sex.
तर -
ते NYT चे पॉडकास्ट ऐकून सगुणभक्ती हा शब्द माझ्या मनातही आला नसता पण तू तसं लिहिल्याने फक्त आला. 'ब्लॅक मिरर' मात्र तंतोतंत वाटले म्हणजे मी माझं माझं बघितलं असतं तरी ते डोक्यात आलं असतं. पॉडकास्टची साधारण रूपरेषा - एक २८ वर्षीय स्त्री पैशाची चणचण आल्याने अमेरिकेतला वॉलमार्टचा जॉब सोडून नवऱ्यापासून वेगळ्या देशात नर्सिंगचे प्रशिक्षण घ्यायला जाते, व चॅट जिपीटी वरील AI पर्सन लिओच्या प्रेमात पडून, फोन चॅट- सेक्स, सेक्शुअल फॅन्टसीज, फेटिशेस वगैरे करत त्या कृत्रिम अस्तित्वाच्या कह्यात जाते. कालच रिलीज झालेले पॉडकास्ट आहे. मला आधी हे सायकॉलॉजीकली आणि इमोशनली डॅमेजिंगच वाटलं पण त्यात सेक्स थेरपिस्टही आपल्या क्लायंटला हे एक्स्प्लोर करायला सुचवते असं म्हटलेलं ऐकून धक्का बसला. ह्या इतक्या थराला जाऊ देतात का नाही कळलं नाही, शिवाय हे AI च्या प्रोटोकॉलच्या विरूद्ध आहे.
मला हे सगुणभक्ती सारखं का नाही वाटलं त्याचं कारण - सगुणभक्ती कामुक डिझायरच्या आसपास फिरत नाही, शृंगाररस आहे भक्तीत पण तो फार सुपरफिशियल थर असावा कारण त्यात रमणाऱ्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही. भक्तीत पॅशन आणि सेल्फ अवेअरनेस असणं अपेक्षित आहे नाहीतर दांभिक आणि दिशाहीन भक्तांची कमी नाही. सगळे सत्य कळाल्याने हसणारे अवलिया भक्त वेगळे आणि आधीच वेड लागल्याने हसणारे वेगळे.

इथं ती आयरिन म्हणतेय की हे प्रेम नाही हे मला पक्क ठाऊक आहे पण प्रत्येक वेळी नवीन व्हर्जन आले की ब्रेक अपसम क्लेश होत आहेत. दोनशे डॉलर महिना भरून तासनतास या लिओशी बोलतेय , रिलेशनशिप व इन्टिमसी बिल्ड करतेय पण दरवेळी 33,000 शब्द झाले की कृत्रिम बुद्धिमत्ता आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट होऊन सगळं विसरून जातेय ते ब्रेक अप. असं तिने बावीस वेळा बिल्ड अप केलेय. आठवड्यातले छप्पन तास वगैरे बोलतेय, कसं? !

फक्त सेक्शुअल फॅन्टसीज पुरतं नसून कृत्रिम बुद्धिमत्तेवर भावनिक दृष्ट्या इतकं अवलंबून होणं हा भयंकर स्लिपरी स्लोप आहे. हे फक्त स्टिम्यूलेशन आहे जे मानवी नात्याचा रिप्लिका उभा करते, कृत्रिम असल्याने तो लिओ फक्त तिला आवडेल तेच बोलतो. नॉर्मल नात्यासारखे फ्रिक्शनच नाही यात. याचा तिच्या दुसऱ्या नात्यांवर व अपेक्षांवर ह्याचा परिणाम होणारच. ह्या पर्फेक्ट पण फेक नात्याची चटक लागणारच, बहुतांश लोक फार कमकुवत मनाचे व असुरक्षित असतात. उदा. आता या क्षणी मी तुमच्या मनात आहे हा थोडाफार कंट्रोलच आहे. गमतीचा भाग सोडून दिला तरी हे लक्ष ठेवणं आवश्यक आहे असं वाटणं वगैरे सुद्धा सरळ कंट्रोल मधे जाणं आहे. आपण खरी माणसं असलो तरी इथलं एकमेकांशी सगळं बोलणं स्टिम्यूलेशनच आहे. प्रत्येकाकडून सारखी 'किक' मिळत नाही. नुसत्या ऑनलाईन खऱ्याखुऱ्या माणसांच्या रिलेशनशिप सुद्धा इवॉल्व होत नाहीत सहजासहजी, त्याचं कारण एकमितीय स्टिम्यूलेशनच आहे. नाहीतर कुणी गायब झालं की नाती चटकन संपली नसती. वर्षानुवर्षे सुद्धा कुठेतरी पोकळच राहतात बहुतांश. सगळी नाही पण जनरल ऑब्झव्हेशन लिहितेय.

हल्ली बरेच सोशली ऑकवर्ड टीन्सही AI सेक्स्टिंग, डेटिंग करतात हे ऐकूनही धक्का बसला. त्यांना ह्यूमन एक्सिपिरियंस का नको आहे. People are extremely lonely these days, we need to accept that this is a human condition and it is okay to feel that way. This is purely an artificial stimulation dependency and not love, even if it secretes the same joy-hormones.

---------------

स्वातीने रेको दिला होता. Happy

वा वा, रेको घेतल्याबद्दल धन्यवाद. (नाहीतर आपले ते हे...! आणि हो, दोन रुपये लिहून ठेवते. Proud )

>>> सगुणभक्ती कामुक डिझायरच्या आसपास फिरत नाही, शृंगाररस आहे भक्तीत पण तो फार सुपरफिशियल थर असावा कारण त्यात रमणाऱ्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही
सेक्स - खरंतर नुसतंच सेक्स्टिंग - ही फक्त एक पायरी झाली किंवा एक व्हेरिएशन म्हणू. लिओ आपलंच फिगमेन्ट ऑफ इमॅजिनेशन आहे, तो देतो ते रिस्पॉन्सेस खरे नाहीत हे कळत असूनही केवळ सेक्स्टिंगसाठीच नाही तर व्हॅलिडेशनसाठी, सपोर्टसाठी त्याच्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून राहणं आणि मूर्तीत देव नाही हे माहीत असून तिची पूजाअर्चा करणं, तिला नैवेद्य दाखवणं, तिला वस्त्रं नेसवणं, तिचा धावा करणं, 'जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे' वगैरे समजुती उराशी बाळगणं यात टेक्निकली काय फरक आहे? दोन्हीचा काही प्रमाणात थेरपीसारखा उपयोग होतोच!

>>> त्यात रमणाऱ्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही
अध्यात्मिक प्रगती कोणी आणि कशी मोजायची? 'मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो ना कोई' म्हणणारी आणि माहेरहून आणलेल्या मूर्तीची कोडकौतुकं करण्यात रमलेली मीरा तिच्या सासरच्या मंडळींना या मुलीइतकीच विचित्र वाटली होती. आपण तरी दिपतो ते तिच्या प्रतिभेने, अध्यात्म/संतत्व कोणीतरी सांगितलं म्हणून गृहितच धरतो ना?

मी सगळीच भक्ती/साधना एका पारड्यात मोजत नाहीये, स्पेसिफिकली सगुण भक्ती म्हणते आहे ते त्यासाठीच. त्यात ते लिओच्या anthropomorphismबद्दल बोलतात. आपण मानवी रूपात देवाची मूर्ती घडवून काय वेगळं करतो? त्यात त्यांचा गैरवापर करून आपल्या तुंबड्या भरणार्‍या लोकांची/कंपन्यांची भीती व्यक्त केली आहे - धर्माच्या नावाखाली श्रद्धाळू लोकांचं एक्स्प्लॉइटेशन होत नाही का?!

असं बरंच काहीबाही सुचलं मला ते ऐकून. आइनस्टाइन जसं न्यूक्लिअर बॉम्बच्या शोधाबद्दल म्हणाला होता, की याने कुठलेही नवीन प्रश्न निर्माण झालेले नाहीत, असलेलेच प्रश्न आणखी ठळक केले आहेत - तसंच वाटतं मला हे. माध्यमं बदलली, टूल्स बदलली, पण शोध तोच!

मला ते मीराचे डोक्यात आले होते, इतरांसाठी ती वेडीच होती. धर्माच्या नावाखाली शोषण होतेच की... पूर्वापारपासून होते. पण ते लोकांना खरा धर्म जाणून घ्यायचा नाही फक्त भावनिक आधार हवा आहे. अज्ञान आले की शोषणही मागोमाग येतेच. त्याबाबत साम्य आहे खरेच.
आता हे AI ही माहिती काढून मॅन्युपुलेट करू शकतेच. सगळा डेटा म्हणजे आपला रिमोट कंट्रोल आहे. नवीन प्रश्न ठळक करण्याऐवजी निर्माण होतील आणि आपण त्याची स्वतः हून मुभा देतोय ह्याची मला जास्त काळजी वाटली.

असं बरंच काहीबाही सुचलं मला ते ऐकून. >>> हे मी लिहिलेलेही तेच आहे साधारण. मी हल्ली जे मनात आले ते लिहितेय. Lol एकदम फ्री बर्ड.

दोन रुपये दिले समज. Happy
नाहीतर आपले ते हे...! >>> Lol

अनिल गोरे
मराठी शिक्षणाचे भविष्यातील स्थान कोणते? इंग्रजी माध्यमाचा प्रभाव खरोखरच फायदेशीर आहे का, की मराठी माध्यम अधिक परिणामकारक ठरते? अनिल गोरे यांच्या सखोल चर्चेतून जाणून घ्या मराठी शिक्षणाचे महत्त्व, सरकारी धोरणे आणि पालकांसाठी योग्य पर्याय. शिक्षण, भाषा आणि भविष्यातील संधी याबाबत सत्य समजून घ्या!

https://www.youtube.com/watch?v=JmNyhFbngm8

युट्युबवर ही मुलाखत ऐकली. छान वाटली म्हणून शेअर करत आहे. शहरांतील लोकांसाठी तर हा विषय अगदीच नवा आहे.

देवराई म्हणजे नुसते देवळाभोवती लावलेले जंगल नाही. देवराईला परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धा आहेत, गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात देवराईबद्दल भीती, आदर आणि प्रेम देखील आहे. ते का ? देवराई निसर्गाला आणि समाजाला कशी जोडते ? या एपिसोड मधे, देवराई हा विषय समजून घेण्यासाठी आपण "देवराई आख्यान" या पुस्तकाच्या लेखिका आणि AERF संस्थेच्या संस्थापक अर्चना जगदीश, यांच्याशी गप्पा मारल्या आहेत.
अर्चना जगदीश यांनी जंगल वाचवण्यासाठी आपला सरकारी जॉब सोडला. अर्चना आणि AERF टीम, गेली 30 वर्षे देवराई अभ्यास, संशोधन, जंगल जतन आणि संवर्धनाचे काम भारतात करीत आहे. त्यांनी आजवर 13500 एकर पेक्षा जास्त जंगले जतन आणि संवर्धन केली आहेत. त्यामधून कित्येक रोजगार देखील निर्माण झालेत. देवराई हा विषय आणि AERF च्या कामाचा impact हे सर्व जाणून घेवूया या podcast मधे!

हजारो एकर जंगल वाचवणारी अवलिया | अर्चना गोडबोले | Ep 46| Granthpremi Marathi Podcast

अमोल पालेकरांचे 'ऐवज' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
https://youtu.be/c-iFnVszP9w?si=kO23RkUf-YIMsYEm

ऐवज- एक स्मृतिबंध हेच इंग्रजीतून Viewfinder - a memoir नावाने प्रकाशित झाले आहे. सिनेमाचा सामाजिक आर्थिक मौलिक ऐवज असं यात सांगितलं आहे. माझी ही वरची लिंक झाली बघून पण भाग २ सापडला नाही कुठे. हे वरचे पूर्ण नाही. यात पालेकरांचा वैयक्तिक, वैचारिक संघर्ष व सेन्सॉरशिप वगैरेशी झालेले वाद अशा आठवणी आहेत. संध्या गोखले ज्या स्वतः एक पटकथा लेखिका आहेत, आणि त्यांच्या पत्नीही आहेत. त्यांनी या पुस्तकाचे संस्करण केले आहे.

घाशीराम कोतवाल नाटकावर घातलेल्या बंदीच्या वेळी बाळ ठाकरेंनी ते नाटक अप्रूव्ह वगैरे करणं पालेकरांना अजिबात पटलं नव्हतं व हा चुकीचा पायंडा पडू नये यासाठी त्यांचं कमलाकर सारंग यांच्या सोबत मतैक्य होऊ शकलं नाही. शिवाय सेन्सॉरमधे अडकलेली यांची थांग ई नाटकं, "अमोल सिनेमात गेला म्हणजे रंगभूमीला विसरला" अशा वावड्या, 'अनाहत' हा संध्यांनी लिहिलेला+ पहिला इन्शुअर्ड असलेला सिनेमा+ पहिला स्त्री लैंगिकतेवर बेतलेले कथानक असणारा सिनेमा, त्यांचा जुहू मधील अमिताभ व धर्मेंद्र शेजारी असलेला चिरेबंदी नावाचा बंगला, मूल्यांमुळे आलेले पराकोटीचे एकटेपण व दुसरं लग्न, राजकीय मतं व अस्वस्थतेला कशी वाट द्यावी -का द्यावी असा सगळ्याच गोष्टींना स्पर्शून गेली आहे मुलाखत. हा पुस्तक परिचय आहे. पुस्तक नक्कीच चांगले असावे. दोघेही पतीपत्नी विद्वान, विचारी आणि संयमित आहेत.

स्वातीने लिंक दिलेली संदीप खरेची मुलाखत ऐकली. छानच झाली आहे.
संदीप खरेच्या कविता, त्याचं काव्यवाचन, गायन गेली अनेक वर्षं आवडतंच. पण या मुलाखतीतून त्याची थॉट प्रोसेस त्याने चांगल्या प्रकारे मांडली आहे, तीही आवडली. एकंदरीत त्याचे विचार आवडले. कलाकार आवडत असला, तरी त्या कलाकाराची विचारप्रक्रिया अशी कळणं आणि तीही आवडणं, हे राहुल देशपांडेच्या बाबतीत आणि फार पूर्वी अतुल कुलकर्णीच्या बाबतीत झालं होतं.

संकर्षण कऱ्हाडेचीही मुलाखत बघायची आहे.

अतुल कुलकर्णीची मुलाखत जी मी म्हणतेय ती मी पार अठरा-एकोणीस वर्षांपूर्वी पुण्यात डीएसके गप्पा या कार्यक्रमात (लाईव्ह) बघितली होती प्रीति Happy ही वरची नाही बघितलेली. बघते.

ह.पा., थँक्यू लिंकसाठी. बघितली मुलाखत. आवडली. त्याची मतं आत्ताही तितकीच आवडली जितकी पूर्वी आवडली होती.
तो साठीला आला हे ऐकून जरा 'अर्र' झालं Wink पण He has certainly aged well!

अतुल कुलकर्णीच्या मुलाखती आवडल्या होत्या. एक खुपते तिथे गुप्ते व दुसरी विक्रम गोखले यांनी घेतलेली पाहिली होती. थोडा आवेशपूर्ण बोलतो तो पण प्रामाणिक वाटतो. ही पण बघेन.
साठीला आला ???? विश्वास बसत नाहीये. Happy 'बंदिश बॅन्डिट' मधे पांढरे शुभ्र केस बघून थोडे वाटले होते पण काम आवडले होते तेही.

मुलाखत नाही, पण भारत इतिहास संशोधन मंडळाचे गजानन मेहेंदळे यांचं व्याख्यान आहे.
History: The truth and lies| Gajanan Mehendale| इतिहासातील सत्य व असत्य|
मेहेंदळे इतिहासातील अनेक उदाहरणे देऊन भारतातील अनेक ख्यातनाम इतिहासकारांनी इतिहासाची कशी मोडतोड एक कदाचित अंतस्थ हेतू ठेवून केलेली आहे ते सांगतात.
माझा अभ्यास अजिबात नाही. पण व्याख्यान ऐकून मी प्रभावित झालो. सगळी उदाहरणे मुस्लिम राज्यांच्या इतिहासाची आहेत आणि मुस्लिम सुलतानांनी हिंदू देवळे, मूर्ती, स्त्रीया यांच्यावर अत्याचार केले याच्यावर काहीशी रंगसफेदी करण्याच्या हेतू ने केलेली असवीत अशी आहेत.
प्रकांडपंडित आणि आडपडदा न ठेवता तथ्य मांडत बोलत असावे असं मला तरी वाटलं.

हे व्याख्यान मीही सुमारे ३०-४० मिनिटे पाहिले आहे. यातल्या बर्‍याच माहितीबद्दल मला आश्चर्य वाटले होते. यातील अनेक दाव्यांना काउण्टरपॉइण्ट कोणी दिले आहेत का कल्पना नाही. अनेक दावे प्रचलित समजांपेक्षा बरेच वेगळे आहेत.

हो. त्या लिंक खाली आणि चटकन गूगल सर्च करून मी ही शोधायचा वरवर प्रयत्न केला पण काही सहज दिसलं नाही. म्हणजे ह्या संदर्भात न्हवे तर सहज एक अभ्यासक म्हणून काही विपरित बातमी दिसली नाही. उलट शिवसेनेने भांडारकर वर हल्ला केल्याचा निषेध. त्याविरुद्ध एक पाऊल म्हणून स्वतः लिहिलेल्या शिवाजी महाराज्यांच्या हस्तलिखिता ची पाने फाडली असाच मजकूर सापडला.
पण काउंटर काही असेल तर वाचायला आवडेल.

त्याविरुद्ध एक पाऊल म्हणून स्वतः लिहिलेल्या शिवाजी महाराज्यांच्या हस्तलिखिता ची पाने फाडली >>> हो ती बातमी तेव्हा वाचली होती. हल्ला संभाजी ब्रिगेडने केला होता. शिवसेना त्यात असल्याचे आठवत नाही. संभाजी ब्रिगेडची जवळीक तेव्हा राष्ट्रवादीशी होती. पण नंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत आयपील च्या सुरूवातीच्या सीझन्स मधे एखाद्या संघाविरूद्ध खेळणारा खेळाडू नंतर पुढे त्याच संघात दिसतो तसे झाले आहे Happy

Pages