मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीज म्हणाली धरतीला मी आकाशवाणीवरचं ऐकलंय आणि वाचलंय. त्यातला राणीच्या मृत्यूच्या वेळचा भाग आणि मोठं स्वगत शालेय पाठ्यपुस्तकातही वाचलंय. त्यामुळे फैयाझ सुधा करमरकारांबद्दल जे बोलल्या ते विशेष वाटलं. सुधा करमरकरांनी नुसत्या आवाजाच्या आणि संवादफेकीच्या जोरावर राणी उभी केली. नाटकाला संगीत वसंतरावांचं आणि स्वामींची भूमिकाही त्यांनी केली ही नोंदही आवडली.

श्रीनिवास खळेंचा खळेकाका असा उल्लेख मला खटकतो. पल्लवी जोशीने झी सारेगम मध्ये सुरुवात केली आणि ते सगळ्यांचे काका झाले. त्यांचा आब राखला जात नाही असं मला वाटतं. त्यात ते खरेखुरे साधे - humble.

कुणालाही ताई, दादा, काका, मामा म्हटलेलं मलाही विचित्र वाटतं. नशिबाने प्रसिद्धीच्या जगात तरी त्यात लैंगिक भेदभाव ठेवलेला आहे आणि दिसेल त्याला काकू मामी म्हणत नाहीत. पण मग मावशी करतात. तेच जी, सर बाबतीत. पण आता ती आपली संस्कृती आहे हे मला पटायला लागलंय.

एकदा नवीन असताना भरत यांना मी 'भरतसर' म्हटलं तर ते मला अस्मिता मॅडमच म्हटले एकदम. त्यामुळे 'मान देणं' थांबवलं घाबरून..... Lol
'जी' वगैरे खरंच क्रिंज वाटतं. एकतर ते हिंदी आहे आणि उगाच 'जी जी रं जी' आठवतं तमाशातलं.

आता ती आपली संस्कृती आहे हे मला पटायला लागलंय.>>>> +१ अमितदादा. Lol

वरची गर्भारपणात मद्यपानाबद्दल चर्चा वाचली. उत्सुकतेने शोधलं तर हा एक लेख मिळाला.
>>>> वरवर वाचला. सीमा रेषा किती धूसर आहे. सगळं तुमच्या निर्णयावरच सोडलं आहे. प्रेग्नंसीचे निदान होईपर्यंत अनावधानाने जीवनशैलीचा भाग म्हणून ड्रिंक घेणे आणि unprotected intercourse झाला असल्याने घाबरून गर्भपात करणं, सगळं माहिती असूनही ड्रिंक्सचे डोहाळे लागणे ही प्रत्येक केस वेगवेगळी आहे. स्त्रीचं वय आणि इतर काही जेनेटिक, pre existing conditions, यावर काही भर दिला नाही. अमेरिकेत एखाद्या आजाराची शक्यता ०.१% जरी असली तरी तुम्हाला जाणीव करून देतात. त्यात fear mongering चा ग्रे एरिया आहेच पण जाणीव करून देणं professional ethics मधे येतं. प्रत्येक प्रेग्नंसी वेगवेगळी असते, मग तुम्ही त्या ०.१% मधे येणारच नाहीत हे आधीच गृहित धरणं ही कायम एक रिस्कच झाली. माझ्यामते एखाद्याने काय करायचे ते करावे पण ते सोशल मीडियावर येताना किमान त्यातले संभाव्य धोके अधोरेखित व्हावेत.

वैयक्तिक आयुष्याचं काही देणंघेणं नाही पण त्यांनी त्यांच्या कामाचा, आयुष्यातल्या संघर्षाचा, निर्मितीप्रक्रियेचा भाग सुद्धा नसलेली गोष्ट आवर्जून चव्हाट्यावर मांडायची गरजच नाही मुळात. ही अशी ऑथेंटीसिटी काय कामाची जी मर्यादा भंग करू शकते. मी मुलाखत बघितली नाही कारण इच्छाच मेली. ही तिची व्यक्तिरेखा नव्हती, वैयक्तिक निर्णय होते. 'तनु वेड्स मनु' मधे कंगना दारू पिऊन गोंधळ घालते, ते काम तिनं जबरदस्त केलं आहे. पण ती सोशल मीडियावर मी एअर पोर्टवर दारू पिऊन गोंधळ घालेन आणि त्याची रील बनवेन म्हटल्यावर कुणीतरी हे चूक आहे हे मांडायला हवं. बघणाऱ्यांना फरकच कळत नाही, तोही मोठा प्रॉब्लेम आहे.

मी मुलाखत बघितली नाही , लेख सुद्धा नीट वाचला नाहीये. पण एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते लिहिलं. असो.

झालं!
खोचकपणे लिहिलेल्या वाक्याला आणखी जास्त खोचकपणे आणि तत्परतेने कोट करुन प्लस वन मिळण्यासारखं सुख नाही! Proud

भरत यांनी दिलेला लेख मी ही सकाळी भरभर वाचला आणि प्रतिक्रिया लिहुन खोडलेली. त्या सोशॉलॉजिस्ट आहेत, प्रश्नाला सामाजिक कंगोरे आहेत म्हणून शक्यता... हासूर्यहाजयद्रथ सिद्ध न झालेली शक्यता मांडणे, ती खरी मानून.. कारण पुरावा त्या बाजुने झुकणारा आहे, मार्गदर्शक तत्वे मांडणे, ती मांडून काहीशी भिती दाखवणे आणि त्यावरुन एकदम 'डज एव्हिडन्स इव्हन मॅटर?' शीर्षकाचा लेख लिहिणे हे काही मला पचलं नाही. असो.

आता गप्पांचा धागा होणारे हा... पण आमच्याकडे भारतातले लोक भारतातल्या चेन ऑफ कमांडला सर म्हणतात. मॅडम म्हटलेलं ऐकलं नाही, पण म्हणत असतील कदाचित. पण तेच लोकं कॅनडा/ आम्रविकेतल्या कुणाला सर म्हणत नाहीत. त्यात पण जे एकदम ज्युनिअर आहेत तेच लोकं सर म्हणतात, जे थोडे वरच्या लेव्हलला आहेत त्यांनी कुणाला सर म्हणताना ऐकलेलं नाही.
बरं मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. ऑफिस गुरगावला आहे पुणे/ बंगलोरला नाही असा भौगोलिक कोन असेल तर कल्पना नाही. पण १५-२० वर्षांपूर्वी पुण्यात तरी आम्ही कुणाला सर म्हणत न्हवतो.

त्यांच्या कामाचा, आयुष्यातल्या संघर्षाचा, निर्मितीप्रक्रियेचा भाग सुद्धा नसलेली गोष्ट आवर्जून चव्हाट्यावर मांडायची गरजच नाही मुळात>>>> १०००++

आमच्याकडे भारतातले लोक भारतातल्या चेन ऑफ कमांडला सर म्हणतात.>>>>+
सर/मॅम कल्चर मुंबई-पुण्यात नाही. चेन ऑफ कमांडमध्ये सर/मॅम कल्चरला अजिबात प्रोत्साहन नव्हते. आम्ही अगदी भारदस्त नावाच्या इंडीयन हेडला पण त्यानेच शॉर्टफॉर्म केलेल्या नावानेच ॲड्रेस करायचो. पण नॉर्थची मुलं-मुली आवर्जून सर वगैरे म्हणतात. या मुलांमुळे आपण आगाऊ/असंस्कृत असल्यासारखं वाटायचं. मग अनौपचारिक गप्पांत ‘आप’ वगैरे वापरून मी माझ्यापुरता प्रश्न सोडवला होता.
लाला कंपनी व खऱ्या एमएनसीमधेपण हा फरक जाणवतो.

भरत यांना मी 'भरतसर' म्हटलं तर ते मला अस्मिता मॅडमच म्हटले एकदम. (हे इटालीक का होत नाहीये?) >>> अस्मिता, Lol

धाग्याला संबंधीत, गाण्याच्या गोष्टीत राहुल देशपांडेची सुरु केली आहे.

मुलाखतीतलं जाऊदे पण इथे मायबोलीवरही नावापुढे ‘जी’ लावत असतात की. नस्ता खोटेपणा वाटतो. जो आयडी आहे तो लिहा की.

त्यांचा आब राखला जात नाही असं मला वाटतं. >>>> असं का वाटतं ? मला कळलं नाही म्हणून विचारतो आहे.

आता ती आपली संस्कृती आहे >>>> फक्त संस्कृतीच नाही, भाषा सुद्धा कारण असू शकेल. उदा ऑफिसमध्ये वयाने किंवा हुद्द्याने मोठ्या मराठी व्यक्तींशी इंग्लिशमध्ये बोलतान पहिल्या नावाने संबोधणे नैसर्गिक वाटते पण तेच मराठीत बोलताना "तुम्ही" म्हंटलं जातं. अहो-जाहो + नाव हे कॉम्बो कृत्रिम वाटतं. ऑफिशयल वातावरणात चालून जातं पण वैयक्तिक संबंधांमध्ये वेगळी संबोधनं आपोआपच वापरली जातात आणि त्यात मला काही गैर वाटत नाही. इथे मंडळाच्या कार्यक्रमांसाठी बरेच कलाकार आले होते. ज्येष्ठ / मध्यम अनुभवी / नवीन सगळेच होते. त्यांच्याशी बोलताना किंवा स्टेजवरून अनाउन्समेंट करताना वंदना गुप्तेंना सगळे आपोआपच, न ठरवता वंदना मावशी म्हणते होते. पण तेच मुग्धा गोडबोले, आनंद इंगळे, ऋतुजा देशमुख, महेश काळे ह्यांना आम्ही पहिल्या नावाने संबोधित करत होतो आणि बोलतानाही एकेरीच बोलत होतो. त्याबद्दल त्यांना आणि आम्हांलाही काही वाटलं नाही. अतुल परचुरे आणि प्रतिक्षा लोणकर हे तसे मध्यम अनुभवी आहेत तर त्यांना तू म्हणावं की तुम्ही ह्यात माझा निवेदन करताना गोंधळ झाला. आणि मला "जी" अजिबात म्हणायचं नव्हतं. तर त्यांनीच हसून एकेरी उल्लेख केलास तरी चालेल असं सांगितलं

खूपच अवांतर झालं पण सांगायचा मुद्दा हा की मला तरी खळे काका मध्ये आबा राखला जात नाही असं वाटत नाही. म्हणून तो प्रश्न.

काका , दादा, ताई , मावशी ही नाती आहेत. ती संबोधनं नात्यातल्या व्यक्तींपुरतीच राहावीत. कोणा प्रसिद्ध व्यक्तीला तसं संबोधून नातं जोडायचा, गळ्यात पडायचा प्रयत्न वाटतो.

तुम्ही इ. आदरार्थी बहुवचनाबद्दल हे नाही. नाते जोडण्याबद्दल आहे. ते भाषेत नक्कीच नाही.

कोणा प्रसिद्ध व्यक्तीला तसं संबोधून नातं जोडायचा, गळ्यात पडायचा प्रयत्न वाटतो. >>>> अच्छा. पण ह्या केसमध्ये किंवा त्या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांमध्ये तसं "नातं" असू शकेल. आपण नात्यात नसलेल्या पण पुरेशी ओळख असलेल्यांना ताई, दादा, काका वगैरे म्हणतोच की. पल्लवी जोशी त्या क्षेत्रात काम करणारी असल्याने तिची त्यांच्याशी तश्या लेवलची ओळख असू शकेल असा बेनिफीट ऑफ डाऊट द्यायला हरकत नाही.

शिवाय पुन्हा हा संस्कृतीचा भाग झाला. आपण सर्वसाधारणपणे कुठल्याही वयाने मोठ्या माणसांना काहीतरी संबोधन लावतो. (उदा. भांडीवाली बाई, भाजीवाला, रिक्षावला, दुकानदार इत्यादी) तो त्यांच्या गळ्यात पडून नातं जोडायचा प्रयत्न नसतो. Happy

मला मराठीत बोलताना "जी" लावलेलं आवडत नाही. तसच कुठल्यातरी उपाध्याही दिलेल्या आवडत नाहीत. उदा. शास्त्री, तात्या, माऊली. शिवाय मायबोलीवर किंवा बाहेरही "मित्रा" म्हणतात ते !

खोचकपणे लिहिलेल्या वाक्याला आणखी जास्त खोचकपणे आणि तत्परतेने कोट करुन प्लस वन मिळण्यासारखं सुख नाही! >>> Happy टोटली.

पण १५-२० वर्षांपूर्वी पुण्यात तरी आम्ही कुणाला सर म्हणत न्हवतो. >> हो. एक शाळेतले सर सोडले तर (आणि एक पुपु बाफ वरचे Wink )

मंचावरून केलेलं संबोधन औपचारिक असावं. तो घरगुती कार्यक्रम नाही.

व्यावसायिक आणि ग्राहक हा वेगळा प्रकार आहे. तिथे बहुधा एकमेकांची नावं माहीत नसतात.

"ऐक ना पूर्वा..."
"मला डॉक्टर पूर्वा पुरंदरे म्हणालात तर बरं पडेल. नसती सलगी मला आवडत नाही. (आवाज चढवून ) सो बिहेव युअरसेव्हज डॉक्टर पुंडलिक."
----- एका नाटकातील संवाद.
असे नको व्हायला.
यूपी मध्ये आपल्या चार वर्षांच्या मुलाशी बोलताना आप असे संबोधतात. तर आमच्या गावी कोकणात बापालाही अरे तुरे करतात.
एक फुकटचा सल्ला. विशेषतः स्त्रियांशी बोलताना सावधान राहणे उचित!

मंचावरून केलेलं संबोधन औपचारिक असावं >>>> मंच/ कार्यक्रमही औपचारिक असेल तर हे बरोबर आहे. सारेगमप हा काही औपचारिक मंच नव्हे.

पण १५-२० वर्षांपूर्वी पुण्यात तरी आम्ही कुणाला सर म्हणत न्हवतो. >> हो. एक शाळेतले सर सोडले तर >>>> पंधरा-वीस वर्षांपूर्वी अमित शाळेत नव्हता रे. (वाटत नसला तरी) वयाने बराच मोठा आहे तो Wink

शाळा कॉलेज सोडल्यापासून कधीही कोणाला सर/ मॅडम म्हटलं नाही आणि ऐकलं पण नाही ( एखादा अपवाद सोडला तर..)

ताई, दादा, काका उगाच जोडायला आवडत नाही...
पण एखाद्या ग्रुप मध्ये कोण वयस्कर व्यक्तीला काका/ काकू म्हणू सगळेच संबोधत असतील आणि त्यांची अनुमती असेल तर..
किंवा कोणी सांगितलं आम्हाला ताई, दादा म्हंटलेल आवडेल. तर मग मात्र तसच म्हटलं जातं..

मराठीत (ईमेल) व्यवहार करताना कधी कधी पंचाईत होते..
काही व्यक्ती मानाने/ वयाने/ ज्ञानाने मोठ्या असतात त्यांचा एकेरी उच्चार करणे इष्ट वाटतं नाही... अशावेळी क्तवचि ताई किंवा काही निघून जाते...

काका , दादा, ताई , मावशी ही नाती आहेत. ती संबोधनं नात्यातल्या व्यक्तींपुरतीच राहावीत. कोणा प्रसिद्ध व्यक्तीला तसं संबोधून नातं जोडायचा, गळ्यात पडायचा प्रयत्न वाटतो. >>>> १००+

तसही काही संबोधनं लावायचीच असतील तर तात्या, आप्पा, आक्का, अण्णा ई. आहेतच.

एकंदर मराठीत व्यवहार( ईमेल/ पत्र/ इतर औपचारिक) थोड कठीण वाटतं ते
धन्यवाद, श्री, श्रीमती, एकेरी नाव की आदरार्थी बहुवचन, नमस्कार

हे सगळे बोली मराठीत न येणारे, किंवा सहजपणे लवचिकतेने न येणारे शब्द वापरायला लागतात...
मग त्यात बरीच कृत्रिमता येते... वाटते.

तसही काही संबोधनं लावायचीच असतील तर तात्या, आप्पा, आक्का, अण्णा ई. आहेतच. >>>> ? ही पण नाती दाखवणारी संबोधनंच आहेत ना? आक्का म्हणजे मोठी बहिण, आप्पा म्हणजे मोठा भाऊ / कोकणीत की कानडीत आप्पा म्हणजे वडिल. मग ह्यात आणि त्यात फरक काय ?

भरत, माझा जरा गोंधळ झालाय. मग प्रत्यक्ष बोलताना या व्यक्तिंना काय हाक मारायची? परवा इथे आरती अंकलीकर आल्या होत्या. त्यांच्याशी बोलताना, जी किंवा मॅडमपेक्षा ताईच बरे वाटेल ना?

प्रत्येक वेळेस तसंच नसतं पराग. आप्पा, आक्का ही संबोधनं जनरलीसुध्दा वापरली जातात उदाहरणार्थ, पुण्यात डेक्कन जिमखान्याच्या कॅंटीनला आप्पाचं कॅंटीन म्हणत असत. त्या कॅंटीनमधला आप्पा काही समस्त पुण्याचा थोरला काका नव्हता Happy

आप्पा, आक्का ही संबोधनं जनरलीसुध्दा वापरली जातात उदाहरणार्थ, पुण्यात डेक्कन जिमखान्याच्या कॅंटीनला आप्पाचं कॅंटीन म्हणत असत. त्या कॅंटीनमधला आप्पा काही समस्त पुण्याचा थोरला काका नव्हता >>>> आम्ही काका आणि ताई जनरली वापरतो. Proud कोणाला तसं म्हंटलं म्हणजे ते समस्त पुण्याचे काका किंवा ताई आहेत हा आमचा दावा नाही.. पल्लवीचाही आहे असं ऐकलेलं नाही.
काहीच्या काही लॉजिक अरूण !!!

पल्लवीचा काय संबंध? तू माझ्या पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेवरची माझी प्रतिक्रिया होती ती. त्यामुळे कुणाचं लॅाजिक गंडलय ते तूच चेक कर .

असो मला काय म्हणायचं होतं ते मी भरतच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. त्यामुळे माझ्याकडून इथेच पुर्णविराम.

बाकी विषयानुसार चर्चा चालूदे.

कोणा प्रसिद्ध व्यक्तीला तसं संबोधून नातं जोडायचा, गळ्यात पडायचा प्रयत्न वाटतो. >>>
आणि मंचावर औपचारिक संबोधन असावं >> या दोन्हीला +११ ते अशोक मामा, खळे काका खरोखर त्यांना ओळखणार्‍यांनी म्हटले तर ठीक. बाकीच्यांचे बळेच वाटते.
गंमत म्हणजे "वंदना मावशी" ओढून ताणून गळेपडू वाटते पण वंदना ताई गुप्ते म्हटले तर मात्र औपचारिक वाटते समहाऊ. का ते नाही सांगता येत.

या दोन्हीला +११ ते अशोक मामा, खळे काका खरोखर त्यांना ओळखणार्‍यांनी म्हटले तर ठीक >>>> वर लिहिलं मी त्याबद्दल. स्पेसिफिकली पल्लवी जोशी बद्द्ल, तर ती त्या क्षेत्रात काम करते. तिची ओळख असू शकते ना त्यांच्याशी ?

त्यामुळे कुणाचं लॅाजिक गंडलय ते तूच चेक कर . >>> हो केलं. तुझ्या पोस्टमधलं गडलय म्हणूनच लिहिलं. Wink

का ते नाही सांगता येत. >>>> धन्यवाद. Happy

Pages