हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
विकटहास्यद्वयीने पेट्स अर्थात
विकटहास्यद्वयीने पेट्स अर्थात आपण घरात पाळलेले प्राणी, विशेषतः कुत्रा - मांजर, ह्यावर दोन भागात पॉडकास्ट केलं आहे.
ही मंडळी नेहमी विषय चांगले निवडतात आणि आपल्या पोरकटपणामुळे सगळ्यांवर पाणी फिरवतात.
छान मुलाखती कळतात या
छान मुलाखती कळतात या धाग्यामुळे! डॉ. प्रियदर्श, क्षिती जोग आणि विद्या बालन तिघांच्याही मुलाखती पाहिल्या आणि आवडल्या.
मी आत्ताच ही मुलाखत पाहिली.
मी आत्ताच ही मुलाखत पाहिली. छान झाली आहे. प्रसाद गावडे खूप पोटतिडकीने बोलला आहे. बघताना मला जिज्ञासाचीही आठवण आली.
https://youtu.be/zyZwOoLXnGY?si=jq7XqfGtLCdDMO3f
> आपल्या पोरकटपणामुळे
> आपल्या पोरकटपणामुळे सगळ्यांवर पाणी फिरवतात.>>
ह्यांना मायबोलीचा रस्ता दाखवा आणि इथल्या कमेंट्स दाखवा नाहीतर अमितवला त्यांचा फोन नं द्या.
धन्यवाद ब्लू कोलंबसे.
धन्यवाद ब्लू कोलंबसे.
मुलाखत बघितली- आवडली. विद्या बालन हुशार आणि संयत वाटते. मोकळेपणाने बोलली आहे. मला तिची समाजसेवेवरची, ध्रुवीकरणावरची, क्षमाशीलतेवरची आणि एखादी गोष्ट पटत नसेल किंवा अपमानास्पद वाटली असेल तर कन्फ्रंट करण्याची मतं विशेष आवडली. तिचा IQ आणि EQ दोन्ही चांगला असावा, हे दोन्ही (एकत्रितपणे) उत्तम असणं दुर्मिळ असतं सहसा. तिचं काम आणि व्यक्तिमत्व दोन्ही आवडतं. चॅनलचं नाव Unfiltered आहे, पण मुलाखत Unfiltered पेक्षा जास्त relaxed rapport असलेली वाटली.
तिचा नवा चित्रपट येत आहे प्रतीक गांधी सोबत, त्यामुळे ही दोघं बऱ्याच ठिकाणी एकत्र मुलाखती देत आहेत. ह्यांची 'कर्ली टेल्स' वरचीही छान खुसखुशीत होती.
विद्या बालनची मुलाखत ताबडतोप
विद्या बालनची मुलाखत ताबडतोप पहायला घेतली आहे. माझी सर्वात आवडती सध्याची.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=G4fRkCEM76s मंगला गोडबोले. वंदना बोकिलांनी घेतलेली मुलाखत.
मंगला गोडबोले लेखिका म्हणून आवडतातच. त्यांची मुलाखतही फार आवडली, मनमोकळ्या आणि एक विचारी, सजग आणि कुठलाही आव न आणता नो-नॉनसेन्स बोलल्या आहेत.
मुलाखतही आदर ठेवून पण उगाच भारवल्यासारखी घेतलेली नाही.
क्षिती जोगची कुठली मुलाखत
क्षिती जोगची कुठली मुलाखत म्हणताय?
मी आरपार वरची मुग्धा गोडबोलेने घेतलेली आज बघितली, आणि फार म्हणजे फारच आवडली. मुलाखत आणि क्षिती जोग दोन्ही. परत एकदा नो-नॉनसेन्स आहे ती.
आता झिम्मा ३ आला तर मी तो नक्कीच तिचा आहे म्हणून आवडून घ्यायचा प्रयत्न करेन
काल विकट हास्यद्वयी चॅनेलवर
काल विकट हास्यद्वयी चॅनेलवर चिन्मय मांडलेकरची मुलाखत लावली होती. >>>> ही विकट हास्यद्वयी ती नव्हे. हे वेगळे चॅनल आहे.>> oooh !! अरेच्च्या ! so सॉरी !! मग ते कोणते चॅनल आहे ?नाव द्याना plz
अमुक तमुक= विकट हास्यद्वयी
अमुक तमुक= विकट हास्यद्वयी
इथे बरीच रेकमेंड केली गेलेली
इथे बरीच रेकमेंड केली गेलेली विद्या बालन मुलाखत ऐकली. ती छान मोकळं बोलली आहे. पण मला ती मुलाखत अगदी खूऊऊऊप आवडली असं वाटलं नाही. का ते लक्षात येत नाहीये. कदाचित प्रश्न फार आवडले नसतील किंवा कल्पना नाही.
अमुक तमुक= विकट हास्यद्वयी>>>
अमुक तमुक= विकट हास्यद्वयी>>>> अरे!! हो हो !! मी घोळ घातला
अजब गजब आणि अमुक तमुक .. काय नावे आहेत चॅनेल्सची
मंगला गोडबोले यांची मुलाखत
मंगला गोडबोले यांची मुलाखत बघितली.. अतिशय आवडली. एखादी छोटी कार्यशाळा च असावी अस वाटल. शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
>>पण मला ती मुलाखत अगदी
>>पण मला ती मुलाखत अगदी खूऊऊऊप आवडली असं वाटलं नाही. का ते लक्षात येत नाहीये. कदाचित प्रश्न फार आवडले नसतील किंवा कल्पना नाही.
मला अजिबातच आवडली नाही . थोड्या वेळात बंद केली. मुलाखतकाराला पाचपोच नव्हता, भोचकपंणा जास्त होता, असं मत झालं त्याच्याबद्दल..
चित्रपटाचे पैसे किती घेता असं कोण विचारतं?
हो वर्षा, बरोबर.
हो वर्षा, बरोबर.
वर्षा +1
वर्षा +1
मी पण इथ वाचून बघायला घेतली पण अजिबात आवडली नाही.. पैसे तर विचारले च पण Porn बद्दल चे प्रश्न पण अवांतर वाटले..पाचपोच नव्हता याला पण अनुमोदन..
केया आणि वर्षा, बहुतेक हेच
केया आणि वर्षा, बहुतेक हेच मला नाही आवडलं. मुलाखत मुलाखत म्हणत जरा जास्तच पर्सनल स्पेसमध्ये घुसायला बघतात. तो मुलाखतकार स्वतःसुद्धा उगाचच जोरात हसत होता. अमुकतमुकचाच दुसरा भाऊ.
विद्या बालनने हातचं काही न राखता जमतील तितकी प्रामाणिक उत्तरं दिली आहेत असं वाटलं.
अमुकतमुकचाच दुसरा भाऊ>>अगदी
अमुकतमुकचाच दुसरा भाऊ>>अगदी अगदी सायो..
विद्या बालन आवडली पण
आपण (वेडगळासारखे) हसलो म्हणजे
आपण (वेडगळासारखे) हसलो म्हणजे फार दिलखुलास/मनमोकळे असा गैरसमज झाला आहे की काय?
:हहगलो:
:
हहगलो:विद्या बालनच्या मुलाखतीत
विद्या बालनच्या मुलाखतीत मुलाखत घेणारा जास्तच कॅज्युअल आहे, आणि पॉर्न विषयी विचारणं माझ्यासाठी धक्कादायक नव्हतं पण नवीन होतं. ती सुद्धा तुझा आवडता देश कुठला सांगताना जपान मला स्वच्छतेमुळे अतिशय आवडतो, जपान माझं सुरेख स्वप्न नाही तर 'वेट ड्रीम' आहे म्हणाली. नाही म्हणलं तरी टाईमिंगमुळं फिसकन हसू आलं. त्यामुळे अनफिल्टर्ड म्हणजे आपल्याकडे 'सेक्शुअली ओपन' असाच काही तरी अर्थ घेतात, कारण ते झाकण्याकडेच वर्षानुवर्षे कल होता. पण त्यात तथ्य नाही. ते सर्व बाबतीत असायला हवे त्यामुळे 'एकांगी मोकळेपणा' येतो चर्चेला आणि मग ते चीप वाटतं. त्याच्याकडून थोडा ढिसाळ कारभार होता याबद्दल सहमत. ती सर्वच बाबतीत मोकळेपणाने बोलली असती पण त्याने दरवेळी- दर प्रश्नाला gaslight करून मुलाखत एकांगी केली.
मी पुन्हा एकदा मुलाखत बघून
मी पुन्हा एकदा मुलाखत बघून मला का आवडली नाही हे बघणार होते पण मला त्या माणसाला सहन करायची इच्छा नाही.
youtube वर लोकमत filmy चॅनेल
youtube वर लोकमत filmy चॅनेल ला भूषण कडू ची मुलाखत आली आहे, प्रश्न नाहीयेत तो एकटाच सांगतोय. करोना मध्ये त्याची बायको गेली. त्यावेळी खूप कामे पण नव्हती film नाटके एकंदरीत acting रेलटेड गोष्टी बंदच होत्या तेव्हा. त्यामुळे त्याच्यावर हालाखीची परिस्थिती ओढवली मानसिक रित्या खचला पैशांची चणचण वगैरे काय काय सांगतोय बाबा तो .. एकेकाळी २ २ गाड्या ड्राइवर असलेला मी त्यावेळी वडापाव खाण्यापुरते पण पैसे नसायचे म्हणाला, दारूचं व्यसन लागलं उधारी वाढली आत्महत्येचा विचार घोळू लागला असं बरंच काय काय ..
तरीपण मला १ क्षण असे वाटले की एकतर तो १००% सर्व सांगत नाहीये किंवा किंचित वाढवून सांगत आहे. कारण एकीकडे वडापाव खायला पैसे नाहीत प्रवास करायला पैसे नाहीत वगैरे म दारूसाठी कुठून आले पैसे? पण तो सांगतोय ते खरे असेल तर खरेच वाईट आहे म. कारण अशावेळी जर सद्सदविवेक जागृत नसेल तर माणसाला आता पण कशाला प्रायोरिटी द्यायची आहे हे समजत नाही, सो पैसे उधार घेऊन किराणा भरण्या ऐवजी त्याने दारू आणली असेल तर काय माहिती. पण एकंदर सांगण्यावरून असे जाणवले कि त्याला जणू जवळचे कोणीच नव्हते ज्याच्याकडे तो राहू शकेल किंवा मानसिक आर्थिक मदत हक्काने मागू शकेल असे.
पूर्वी जे इतके कमावलेले असते
पूर्वी जे इतके कमावलेले असते ते असे लोक नीट सांभाळून नाही ठेवत का? कितीतरी जण असे रावाचे एकदम रंक झालेत, ते पण खूप कमी कालावधीत. ... सहानुभूती पण नाही वाटत अशा लोकांबद्दल.
At least he could have put
At least he could have put his earnings in bank fd. Like a responsible adult.
असे म्हणणे कदाचित क्रूर वाटू
असे म्हणणे कदाचित क्रूर वाटू शकेल पण धनवंती, अमा यांचे विचार पटले. खूप कलाकारांविषयी हे ऐकायला येते. यात नसेल कदाचित पण इतर वेळी जनतेने, सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही वगैरे आरोप असतात.
नोकरदार माणसांची, कामगारवर्गाची नोकरी कोविडमुळे गेली तेव्हा त्यांनी पूर्वसंचित वापरूनच दिवस काढले ना? बरे ज्या क्षेत्रात आपण करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे ते बेभरवशाचे आहे हे माहित असताना, भविष्याची सोय करणे गरजेचे नाही का?
कोण भूषण कडू?
कोण भूषण कडू?
मी ही काल ऐकली ती मुलाखत.
मी ही काल ऐकली ती मुलाखत. त्याची बायको गेल्याचं माहित नव्हतं. पण जनरली ज्यांच्याकडे खायलाही पैसे नसतात त्यांच्याकडे सिगरेट, दारू वगैरेकरता कुठून ना कुठून तरी येतातच. हे त्याच्याबद्दल नाही, जनरल.
अमुकतमुक वर डॉ. भाग्येश
अमुकतमुक वर डॉ. भाग्येश कुलकर्णींची डायबेटीस वर मुलाखतीचा पहिला भाग ऐकला.
चांगले बोलले आहेत.
भूषण कडू हा मराठी बिग बॉसच्या
भूषण कडू हा मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझन मध्ये होता. त्यावेळी त्याने त्याचा प्रेमविवाह व नंतर त्याची बायको वारली, पुढे आई वारली. त्यामुळे तो मानसिक रीत्या कोलमडला हे कथन केले होते.
शामची मम्मी या नाटकामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती.
Pages