मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदीप पाठक छान बोलतो दिलखुलापणे, त्याची दिलं के करीब मधली मुलाखत माझी ऑटाफे आहे. ही वरची अजून पाहिली नाही, बघेन लवकरच.

हे मुलाखत घेणारे सतरा वेळा त्याला तू तर असा दिसत होतास, असा चेहरा नव्हता, तसा नव्हता म्हणून त्याला स्वतःला आला नसेल तरी कॉम्प्लेक्स देणारच असं ठरवून बसलेत असं वाटतंय ..
इतरही लोकांना असेच तेच तेच विचारत राहतात

सुलेखा तळवलकरने घेतलेली वैशाली म्हाडेची मुलाखतही चांगली आहे. डाऊन टू अर्थ वाटली ती आणि प्रामाणिकपणे कसलाही आव न आणता बोलली आहे.

सिद्धार्थ कन्ननच्या चॅनलवर सिनीयर सोकुची मुलाखत खूप आवडली. एकदम डाऊन टू अर्थ वाटते ती आणि मोकळं बोलली आहे.

अंजली करेक्ट, मी तासभर वगैरे बघून वाट्याला जात नाही. पेशन्स नाहीत माझ्याकडे, तुकड्या तुकड्यात बघायची तर विसरून जाते एकदा थोडी बघून आणि मागे पडतं ते सर्व.

हो मला पण आवडली त्यांची मुलाखत... आड पडदा न ठेवता बोलल्यात..बऱ्याच अंशी तथ्य असेल असे वाटते..मारामारी वैगरे झाली पण सांगितले

शास्त्रीय गायिका डॉ अश्विनी भिडे-देशपांडे यांची डॉ आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली मुलाखत>>> मुलाखत पेक्षा चर्चा म्हणणं जास्त योग्य. अतिशय उत्तम आहे.

निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांची ANI वरची हि मुलाखत. इंग्रजी मध्ये आहे . छान आहे . सर्व प्रश्नांना छान उत्तरे दिले आहेत . बरेच मुद्दे कव्हर केले आहेत . थोडी मोठी आहे पण गुंतवून ठेवणारी आहे .
https://youtu.be/X3HeRwdkbHw?si=3bcsRnZ92v_O_Gge

मानसी महाजन >> मुलाखत आवडली. होम स्कूलिंग बद्दल माहिती देऊन आणि स्वतः त्यात आयुष्य घालवत असतानाही तीच शिक्षणाची उत्तम पद्धत आहे असं मी अजिबात म्हणणार नाही - असं त्या आवर्जून म्हणाल्या. एवढंच नाही, तर समाजात शाळांची गरज यावरही खूप मौलिक विचार मांडून शाळा संस्थेचे महत्त्व त्यांनी लक्षात आणून दिले.

सौमित्र पोटे टिपिकल बाबा मोडमध्ये प्रश्न विचारत होता. बघताना मजा आली. Happy

आरपारमध्ये मोहन आगाशे
हसत खेळत हलक्या फुलक्या प्रकारची मुलाखत.
निम्मी पाहिली.

" लग्न हे सगळ्यात कृत्रिम नाते आहे .."
असो ! Happy

https://www.youtube.com/results?search_query=marathi+interview+show

ग-गप्पांचा :
Bentex मधील नोकरी सोडून स्वतःचा Senorita हा दागिन्यांचा व्यवसाय उभा केलेल्या पूषन् वैद्य या मराठी उद्योजकांची यशस्वी कहाणी.
उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी.

तसेच 28 व्या वर्षी स्वतः मद्यव्यसनमुक्त होऊन पुढील आयुष्यात तरूणांच्या व्यसनमुक्तीचे महत्त्वाचे सामाजिक कार्य.

https://m.youtube.com/watch?v=shzWoFfI5hY

कालच युवल नोवा हरारीचा इंटरव्ह्यू बघितला. अजून अर्धाच झाला आहे. सगळे AI विषयी आहे पुढे. यावर्षी AI मधे प्रचंड प्रगती होणार आहे, ज्यासाठी मानववंश इतका प्रगल्भ नाही, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही बघायला मिळतील. कारण हे विकसित तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जो परस्परविश्वास लागतो, त्याचा पूर्णपणे अभाव आहे असे म्हणाला. त्यामुळे एकमेकांचा संशय घेऊन तणाव वाढीस लागेल, देशांतर्गत, कंपन्यांतर्गत, मानवांतर्गत...etc. बीअर बायसेप्स या चॅनलवर. सुरवातीचा बराच भाग अमेरिकन पॉलिटिक्स, युद्धातला सहभाग/ अमेरिकेने आगीत तेल ओतणे, ट्रंप वगैरे वर होता. तोवरच मला कंटाळा आला. नेटाने पूर्ण बघणार आहे.

शिवाय सध्या ब्रायन जॉन्सन या अमरत्वाचा फॉर्म्युला शोधणारा माणूस चर्चेत आहे. तुम्हाला हा अजूनही माहिती नसेल तर तुम्ही दगडाखाली राहत आहात. Wink सगळीकडे याच्याच मुलाखती दिसत आहेत. नेटफ्लिक्सवरही माहितीपट आला आहे. रोज छप्पन गोळ्या घेतो, कसलेकसले इन्फ्रारेड लाईट्स लावतो. पन्नास वर्षे वय असून पंचवीस वर्षांचा वाटतो. थोडा AI लूक आहे. त्यासाठी स्वतःच्या तरुण मुलाचा प्लाझ्मा घेऊन तरूण झाला आहे ऐकून 'मॉडर्न डे ययाती' वाटला. एक्स्ट्रिमिस्ट वाटला. Something is definitely off about this guy. पूर्ण बघितले नाही काही याचे. थोडा बीअर बायसेप्स वरील व थोडा डॉ माईक या दोन चॅनल वरील इंटरव्ह्यू तुकड्यांत बघितले.

अस्मिता Longevity is in vouge in biological research these days. पण रिसर्च अजुन कन्सेप्च्युअल पातळीवर आहे. उदा अजुन असे जेनेटिक/मेटॅबॉलिक क्लॉक विकसित झाले नाही ज्याने पुर्ण शरीराचे एजिंग मोजता येईल. सध्या जे आहेत ते टिश्यू स्पेसिफिक आहेत. म्हणजे फारतर तुम्ही किडनी/बोन/लंग्स असे वेगवेगळ्या अवयवांचे वय (किंवा तो वाढण्याचा वेग) मोजु शकता आणि तो वेगवेगळा असतो. त्यामुळे ब्रायन सारख्या लोकांचे (सध्या एक आहे पण हळूहळू रांग लागेल) दावे किती विश्वासार्ह मानायचे हा प्रश्न आहे. कारण ते पुर्ण शरीराचा वय वाढण्याचा वेग कमी केला असा दावा करतात तो त्यांनी मोजला कसा ? ब्रायन जॉन्सन बद्दल दुसरा आक्षेप असा आहे की तो ज्या पाच पन्नास सप्लिमेंट्स घेतो त्यापैकी एकाचीही उपयुक्तता अजुन सिध्द झाली नाही. ह्या सगळ्या सप्लीमेंट्स बनवुन विकणारी कंपनी त्याची स्वतःची आहे!

डॉ. वेंकी रामा कृष्णन ह्या नोबेल लॉरिएट फिजिसिस्ट टर्न ्ड बायलॉजिस्ट ने मध्यंतरी लॉंगेविटी रिसर्च बद्दल (त्यातील पोकळ दावे मुख्यतः) पुस्तक लिहिले, मी अजुन ते वाचले नाही पण त्या निमित्ताने त्यांनी बर्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. वानगीदाखल ही पहा:

https://youtu.be/aNqwamgxNiU?si=A4mQMMXcaCD9osXL

टिश्यू स्पेसिफिक आहेत. म्हणजे फारतर तुम्ही किडनी/बोन/लंग्स असे वेगवेगळ्या अवयवांचे वय (किंवा तो वाढण्याचा वेग) मोजु शकता आणि तो वेगवेगळा असतो.
>>>>> हे मला लक्षात आले. त्यात तर बघितले पण इतर ठिकाणीही पाहिलेले आहे.
कारण ते पुर्ण शरीराचा वय वाढण्याचा वेग कमी केला असा दावा करतात तो त्यांनी मोजला कसा ? >>> तेच ते, काही बाबतीत तो त्याच्या मुलापेक्षाही तरूण आहे म्हणे.

सप्लिमेंट्स बनवणारी कंपनी म्हणजे हा सायंटॉलॉजीचा प्रत्यक्ष एक कायरोप्रॅक्टर असलेला एरिक बर्ग आणि ग्वेनिथ पॅल्ट्रोचे 'गूप' यात एकाची भर पडली आहे. धन्यवाद पर्णिका, इंट्रेस्टिंग पोस्ट. लिंकचीही नोंद घेतली आहे. मलाही हे खूळ किंवा पोकळच वाटते आहे. शिवाय हा एकुण प्रकारच अनैसर्गिक वाटला.

वाहत्या धाग्यावरून -
शकुंतला परांजपे यांच्या वरची सईने दिलेली मुलाखत एकदा वाचली होती. त्यात त्यांनी केंब्रिज मधे घेतलेले शिक्षण, वेगळ्या वंशातील माणसाशी लग्न, मिक्स्ड रेस्ड सईला एकटीने पुण्यासारख्या शहरात वाढवणं व कुटुंब नियोजनाचे काम व असं अतिशय जगावेगळं आयुष्य निवडलं होतं. स्वतंत्र विचारांच्या, बुद्धिमान व द्रष्ट्या होत्या. कुटुंब नियोजनाचे महत्त्व आणि उपयुक्तता लोकांना पटवून देण्याचे काम तेही स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केले होते. रं धो कर्वे चे वडील- धोंडो केशव कर्वे व शकुंतला परांजपे वडील रॅंग्लर परांजपे हे आतेमामे भावंडं होती. त्यांचे सगळे प्रशिक्षण रं धो कर्वेंनी केले. इरावती कर्वे त्यांच्या वहिनी व डॉ आनंदी गोपाळ व गोपाळराव जोशी पण जवळच्या नात्यात होते. त्यांनी संततिनियमनाच्या जनजागृतीसाठी अनेक सभा घेतल्या व स्त्रियांना सभेला न येऊ देण्याचे प्रयत्न हाणून पाडले. ललित लेख, नाटक, कादंबरी असे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. त्यांना समाजकार्यासाठी मॅगसेसे, पद्मभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. झंझावातच होत्या म्हणून हा पोस्ट प्रपंच.

अस्मिता, पर्णिका - माहितीपूर्ण पोस्ट्स!
मी अजून दगडाखाली रहात असल्याने 'ब्रायन जॉन्सन' नोटेड Happy
' सय ' पुस्तक वाचल्यावर आपोआपच शकुंतला परांजपेंबद्दल उत्सुकता वाटून शोधून वाचलं गेलं. अत्यंत हुषार बाई होती पण दुर्दैवाने त्यांच्याबाबत फक्त जर्मन माणसाशी लग्न, स्वभावातला बंडखोरपणा आणि विक्षिप्त पणा अशाच गोष्टी सर्वसामान्यपणे प्रसिद्ध झाल्या.
र धों कर्वे, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे ह्या आणि अशा लोकांनी त्या काळात सर्वांच्या विरोधाचा सामना करत जे कार्य केलं त्या मानाने त्यांना म्हणावी तेवढी प्रतिष्ठा मिळाली नाही.

शकुंतला परांजपेंचं काही आंबट काही गोड हे पुस्तक माझ्या संग्रही आहे. सईची विनोदबुद्धी वंशपरंपरागत आहे.
हल्लीच कधीतरी संततिनियमन (याला नंतर कुटुंबनियोजन म्हणू लागले) प्रसारासाठी काम करताना खेड्यापाड्यातल्या स्त्रियांपर्यंत पोचताना त्यांनी काय काय उपाय योजले त्याबद्दल वाचलं होतं. त्या राज्यसभेवर नॉमिनेटेड खासदारही होत्या.

गिरीश कुबेरांनी युवाल नोहा हरारीची मुलाखत घेतली.. हरारी त्याच्या नव्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी भारतात येतो आहे, त्यासाठी त्याच्याकडूनच मुलाखतीसाठी विचारणा झाली होती. ए आय आणि आपल्याला बोअर राजकारणी हवेत अशा दोन थीम्स त्यात होत्या. ही मुलाख

अमुक तमुक वर डॉ. नंदू मुलमुलेंच्या मुलाखती ऐकल्या. खूपच आवडल्या. ह्याच चॅनेलवर श्रीराम कुंटेंची चीन संबंधित मुलाखत आहे. आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत थोड्याच वर्षात चीनला मागे टाकू वगैरेची वस्तुस्थिती उत्तम प्रकारे मांडली आहे.
आरपार वरील डॉ. मोहन आगाशेंची मुलाखत फार काही आवडली नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे मुलाखतकार मुलगी . तीच त्यांची अमुक तमुक वरची चांगली वाटली. ( एक गोष्ट मान्य करावी लागेल की अमुक तमुक वरची विकटहास्यद्वयी बरीच सुधारली आहे. कंटेंट आणि एकंदरीत वावर दोन्ही बाबतीत!)
मित्रम्हणे वरील डीटेक्टिव प्रिया २ नंतर यू ट्यूब ने आरपार वरील रजनी पंडितांची मुलाखत सुचवली. मुलाखतकारामुळे किती फरक पडतो, ते जाणवलं.

शकुंतला परांजपे भारीच होत्या. मी त्यांचं कुठलं पुस्तक वाचलेलं नाही, पण 'सय' वाचून कल्पना येते.
संततीनियमनाच्या प्रसारासाठी त्या आमच्या गावात आलेल्या असताना त्यांनी आमच्या अंगणात गावातल्या महिलांना बोलावून त्यांच्याशी बातचीत केली होती अशी आठवण माझी आजी सांगायची Happy

नाना पाटेकरची आमिर खानने घेतलेली मुलाखत बघितली. नाना पाटेकरचा नवीन सिनेमा येतोय त्यासाठी तो मुलाखती देतोय बहुतेक. खरं म्हणजे मला मुलाखत फारशी आवडली नाही, नाना पाटेकर स्वतःच्याच तोऱ्यात असल्यासारखा वाटला. माझ्या मते आमिर खान त्याच्यापेक्षा कर्तृत्वाने मोठा आहे. त्याच्याशी याहून जास्त मानाने बोलायला हवं होतं नाना पाटेकरने.
बरखा दत्तने घेतलेली शोभा डेची मुलाखत बघितली. मस्त आहे एकदम! शोभा डे रॉक्स Lol

Pages