मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅन्क्यू अनघा पुणे. Happy दगडाखाली ही गंमत आहे बरं..! हल्ली सगळीकडून मारा होतो माहितीचा, त्यातून सुटता येत नाही. पोस्टीशी सहमत आहे.
डॉ नंदू मुलमुले हे माझ्याच गावचे आहेत. त्यांच्याबद्दल मी लहानपणापासून ऐकलेय. माझ्या मैत्रिणीची आई त्यांची पेशंट होती. त्यांची एक मुलाखत मलाही दिसली होती, जमले तर बघेन.
अमुक तमुक वरची विकटहास्यद्वयी बरीच सुधारली आहे. >>>> Lol फाईव्ह स्टारचे रमेश-सुरेश सुधारले ??? Wink

भरत, ही मुलाखतीची लिंक तुम्हीच दिली होती मला कुठल्यातरी धाग्यावर. तेव्हाच मला जरा तपशीलवार कळले. टिपापावर 'कुंकू' सिनेमाचा विषय सुरू झाल्याने हे लिहून काढले. 'कुंकू' मधे त्यांनी नायिकेच्या सावत्र मुलीचे काम केले आहे.

वावे, आठवण भारीच की ! Happy
नानाची आमिरने घेतलेली व अनिल कपूरने घेतलेली दोन्ही बघितल्या. तो ही 'वनवास' चित्रपटाचे प्रमोशन करत फिरत असल्याने सगळीकडे दिसतोय. तो आणि युवल नोवा हरारी दोघांनी झपाटलेय यूट्यूबला Happy नानाची व आमिरची मुलाखत, कारण कोण कोणाची घेतोय हे न कळण्याइतकी कॅज्युअल आहे. अगदी त्रोटक गप्पा वाटल्या. अनिल कपूरने घेतलेली जरा बरी आहे. दोन्हीतही तो विजय तेंडुलकर, विजया मेहता, सुलभा आणि अरविंद देशपांडेंविषयी छान बोलला आहे. एकदाच मुलाखती यायला लागल्या की रिपीटेशन होऊन कंटाळा येतो मात्र. नाना काही प्रमोशन करणाऱ्यांतला वाटायचा नाही. लहर फिरली तर खूप बोलेल नाहीतर सरळ उठून निघून जाईल वाटत राहते. पावला तर देव नहीतर दगड कॅटॅगरी. सुधारला वाटते.

नानाच्या मुलाखती अनॉयिंग वाटल्या - हिंदीत सगळ्यांना ‘तू’ म्हणून संबोधणं कानाला टोचत राहातं! एकेरीतले असाल तरी ‘तुम’ म्हणता येतंच की!
त्यातून ‘मी कसा बेपर्वा, मी कसा रॉ’ असलं काहीतरी सतत ठसवत राहायचं असतं की काय न कळे!

मजा याची वाटली की आमिर तरीही त्याला ‘आप’ म्हणत होता आणि अनिल कपूर ‘तू’! Getting back ची ज्याची त्याची तऱ्हा! Happy

अनॉयिंग ??? मला त्या मुलाखतीच वाटल्या नाहीत. Happy आमिर खान स्वतःविषयी जास्त बोलला आहे. कोव्हीडमधे रिलेशनशिपचे महत्त्व कळाले वगैरे.

अनिल कपूर 'तू असं मारू कसं शकतोस नाना, एवढा राग काय कामाचा.' तर हा 'बोलून कळलं असतं तर हात कशाला उचलावा लागला असता. परिंदात तू जॅकी ऐवजी मला का नाही घ्यायला सांगितले. वेलकम मधे आपण एकोणीस वर्षांनी एकत्र काम केले'. फोनवर बोलले असते तरी चालले असते. Happy

बाकी हिंदीत 'तू' उद्धट वाटते ऐकायला पण नाना विक्षिप्त आहेच की..!

बाकी मैं और मेरी मॉर्टालिटी दगडाखालीच आहोत हेही कबूल करायला हवं.>>>> Lol लोकांना 'तुम्ही दगडाखाली राहता' म्हटले की आपण गुहेत राहतो हे कळत नाही. ऊप्स Proud

>>> फोनवर बोलले असते तरी चालले असते
हो, सीरियसली! Lol

>>> पण नाना विक्षिप्त आहेच की..!
मला तो आव वाटतो. आपला विक्षिप्तपणा हाच आपला यूएसपी आहे असं ठरवून अट्टाहासाने तो करत राहायचं!

शक्य आहे. पण मला वाटायचे पन्नास वर्षे इंडस्ट्रीत आहे म्हणाला, सातत्याने ही इमेज टिकवणे कठीण झाले असते. त्याने रागाच्या भरात कुणाला तरी लाथाबुक्क्यांनी तुडवल्याचे किस्से त्याच्या प्रकाश आमटे यांच्या बायोपिकच्या प्रमोशनच्या वेळी दिग्दर्शकाने 'चला हवा येऊ द्या' शोमधे सांगितले होते. विरोधाभास म्हणजे प्रत्यक्षात प्रकाश आमटे मात्र अगदी समई सारखे शांत आहेत. ह्या आवेशाचा कंटाळा आलाय आणि वर कॅरेक्टरविषयी जाणून घेणं तिकडेच राहतं आणि वेगळाच विषय सुरू होऊन रसभंग होतो.

अस्मिता, दगडा खाली गंमतीतच लिहिलंय ))
नाना बद्दल मला अंदाज येत नाही. तो खरच तसा आहे की इन्फॉर्मल असल्याचा आव आणतो ते कळत नाही. मधेच सणक आल्यासारखं काहीतरी वेगळंच बोलतोय असं वाटतं. अनिल कपूर बरोबरची मुलाखत दोन मिनिटं पाहिली तर उगाच बळं बळं गळ्यात पडल्या सारखा बोलतोय असं वाटलं.. जमलं तर सूत हेच खरं. नानाची भाषणं जास्त आवडतात. इथे विषयांतर आहे, पण मकरंद अनासपुरेचं एक भाषण ऐकल्यावर त्याच्या बद्दलचं मत चांगल्या अर्थाने बदललं..

हो मलाही ते 'तू' जाम खटकलं. तो मूळचा विक्षिप्त आहे की विक्षिप्त भूमिका करून करून तसा झालाय की तसं नुसतं दाखवतो, काय माहिती!

बाकी हिंदीत 'तू' उद्धट वाटते ऐकायला पण नाना विक्षिप्त आहेच की..! >

हिंदीत अगदी घनिष्ट मित्र/भाऊ सोडले तर इतरांना "तू" म्हणणे हे उद्धट वाटते हे नंतर कळत गेले. कॉलेजमधे व नंतरही पुण्याबाहेरच्या भागातली (सोलापूर, फलटण, जळगाव, अमळनेर ई) आमच्याच वयाची मराठी मुलेही चांगली ओळख होण्याआधी एकमेकांना "तुम्ही" म्हणत त्याचे आश्चर्य वाटल्याचे आठवते. एका काळापर्यंत जेव्हा टोटल ममव वातावरणात होतो तेव्हा बहुतांश एकेरीची सवय होती. वडील व आजोबा सोडले तर रक्ताच्या नात्यातील बहुतांश एकेरी - इव्हन काका, मामा, आत्या, मावशी. जरी आई वडिलांपेक्षा वयाने मोठे असले तरी. या बाहेरच्या सर्कल मधले ज्येष्ठ लोक "तुम्ही". मात्र समवयस्क सगळेच एकेरी.

पण नाना हिंदीत वावरलेला आहे. गेली ३०-४० वर्षे आहे. त्याने तरीही हे बदललेले दिसत नाही.

फाईव्ह स्टारचे रमेश-सुरेश सुधारले >>> Happy Happy बर्‍याच दिवसांनी हे आठवले. अजून ती जाहिरात असते का माहीत नाही.

>>> पण नाना विक्षिप्त आहेच की....<<<
एक अनुभव लिहिते. साधारण १२-१५ वर्षापूर्वीचा हा किस्सा.
प्रभात रोड- जंगलीमहाराज रोड यांमधली एक चिंचोळी गल्ली.दुपारची वेळ होती. रस्ते मोकळे. मी स्कुटरवरून जरा स्पिडमधे गल्लीत वळले. पुढे एक वळण होतं. मी वळले अन कच्चकन ब्रेक लावावा लागला. एक मोठी जीपसदृष्य गाडी मध्यात आडवी. मी उचकून जोरात हॉर्न दिला. अन तेव्हाच बंगल्यातून गाडी बाहेर काढून गेट बंद करायला नाना गाडीतून खाली उतरले. हे एकाच वेळी झालं. सो हॉर्नमुळे ते दचकले अन मी नानाला पाहून दचकले Biggrin पण सामान्य माणसाप्रमाणे ओशाळत सॉरी म्हणत ते पुन्हा गाडीत बसले. गाडी रिव्हर्स करून मला जागा दिली. मी पण ओशाळत थॅंक्यू म्हणत पुडे सटकले.
नानाला ओरडू शकणारी म्हणून आता लोकं मला बिचकून असतात Proud
सो तसा विक्षिप्त वगैरे मुखवटाच असावा नानाचा.

मराठी मुलाखतीत नाना पाटेकर बरेच साधेपणाने बोलतात.. हिंदीत प्रमोशनच्या वेळी तिथे असलेली इमेजच कॅरी करत असावेत

माजी न्यायमूर्ती (उच्च न्यायालय) आणि अभिनेते रमेश भटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांची
मुग्धा गोडबोले ने घेतलेली मुलाखत आरपार यूट्यूब चॅनलवर.
सुंदर मुलाखत आहे. संयत उत्तरं आणि स्पष्ट विचार, रमेश भाटकर यांच्यावर झालेल्या खोट्या बलात्काराच्या आरोपातून सुटण्याचा प्रवास आणि त्या दरम्यानचे अनुभव आणि तेव्हा त्या न्यायाधीश असल्याने त्याचे सर्व नियम पाळून विचारपूर्वक वागणं, तसेच काही छान आठवणी याबद्दल बोलल्या आहेत.
मुग्धाने चांगली मुलाखत घेतली आहे. फालतू प्रश्न नाहीत, त्या बोलताना मध्ये interrupt करत नाही

https://youtu.be/hL6l6Taz4QY?si=JQebDiR1NZGQTZfK

मृदुला भाटकरांची मुलाखत सगळ्याच बाबतीत छान आहे. खूप प्रांजळ पणे बोलल्या आहेत. रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर दोघंही एकमेकांच्या व्यवसायाचा किती आदर करत होते, ते लक्षात येतं. एका चुकीच्या आरोपामुळे दोघांनाही अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरं जावं लागलं, मुलाच्या लग्नासारखे आयुष्यातील सर्वांत आनंदाचे प्रसंग सुद्धा नीट एन्जॉय करता आले नाहीत, पण तेही दोघांनी सहजपणे स्वीकारलं.

मृदुला भाटकरांची मुलाखत आवडली. मला या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती, पण किती स्वच्छ सॉर्टेड आहे त्यांचं बोलणं!

माजी न्यायमूर्ती (उच्च न्यायालय) आणि अभिनेते रमेश भटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांची
मुग्धा गोडबोले ने घेतलेली मुलाखत आरपार यूट्यूब चॅनलवर.
सुंदर मुलाखत आहे. >>>
त्यांचं सिंहीण/वाघीण आणि रिंग मास्टर उदाहरण नाही पटलं प्राण्यांचे खेळ च्या विरोधात असल्याने (हेमावैम) पण त्यांना काय म्हणायचं होतं ते कळलं..
बाकी मुलाखत छानच

https://www.ted.com/talks/jill_bolte_taylor_my_stroke_of_insight

वरचे स्ट्रोकवरच्या अनुभवाचे टेड टॉक पाहिले. सुरवातीचा भाग खूप इंट्रेस्टींग वाटला. उजव्या व डाव्या मेंदूतला फरक, वेगवेगळे प्रोसेसिंग, पर्सेप्शन सगळे आवडले. नंतर मात्र ट्रॅक जरा डिल्युजनल वाटला किंवा स्ट्रोकमधे आलीली अशी अनुभूती जी फार प्रायव्हेट असून, वास्तव आणि भ्रम ह्यातल्या मर्यादा धुसर झाल्याने फरक न कळणे. त्यात त्या बाई स्वतः सायन्टिस्ट असून पंचेचाळीस मिनिटे स्ट्रोक आलेला असताना 911 न करता कामाच्या जागी फोन करत राहिल्या. नंबर, नाव, स्पीच वा कसलाही अवेअरनेस नसताना असं कसं केलं. पुन्हा तर ते expansion of consciousness वगैरे जे खरंच घडले असेल का अशीही शंका आली किंवा त्यांना तसे वाटलेही असेल. थोडा partial NDE किंवा ayahuasca ने येणाऱ्या hallucinations शी प्रचंड मिळते जुळते वाटते. ही एक्स्टसी किंवा एक्स्टसीचा फास्ट पास (?) गांजा/ चिलिम वगैरेने साधू मिळवतात असं वाचलं आहे पण ही अवस्था टिकत नाही. कारण ती kick असते. पण गॉल्फ बॉल एवढा ब्लड क्लॉट असूनही त्या वाचल्या हा खरोखरच एक चमत्कार आहे.

हा त्यातल्या त्यात योग्य धागा वाटला म्हणून येथे दिले. Happy

वेगळे विषय :
1. अनिरुद्ध राजदेरकर :
मुलांना इतिहास नीट समजण्यासाठी तयार केलेली रंजक खेळणी : https://www.youtube.com/watch?v=IIJ1ghzaRVk&t=1289s

2. नौसैनिक विनायक पाटील
लढाऊ पाणबुडीवरील थरारक अनुभव :
https://www.youtube.com/watch?v=VdQUil5hBUw&t=493s

वाडा धाग्यावर आज ही लिंक दिली होती. ही माझी प्रचंड आवडती मुलाखत आहे. कधीही अधूनमधून पाहतो.
https://www.youtube.com/watch?v=VoLdkt3y0BQ

जिम कॅरेचा "द मास्क" (ऑटाफे) रिलीज व्हायच्या आधी डेव्हिड लेटरमनने घेतलेली मुलाखत आहे (अमेरिकेत पूर्वी हे रात्रीचे टॉक शो प्रचंड लोकप्रिय होते - २००० च्या आसपास जे लेनो व डेव्हिड लेटरमनचे काही मी पाहिले आहेत. जे लेनोचे जास्त). ही मुलाखत मी २-३ वर्षांपूर्वी कधीतरी पाहिली आणि टोटली हुक्ड झालो. त्यानंतर अनेक वेळा पाहिली आहे.

जिम कॅरेचे नेहमीचे "अ‍ॅण्टिक्स" तर आहेतच - साधारण सहाव्या मिनिटाला त्याने तो श्रीमंत झाल्यावर त्याच्या हसण्याची पद्धत कशी बदलली ते दाखवली, ते पाहा. पण आधी एक धमाल नक्कल आहे. "मला माझा आतला आवाज काहीतरी सांगायचा. इतरांचा आतला आवाज 'व्हिस्पर' करतो. पण माझा आवाज "बॉर्न यस्टरडे" मधल्या ब्रॉडरिक क्रॉफर्ड सारखा बोलतो" असे म्हणून त्याने जी अफाट नक्कल केली आहे त्याला तोड नाही. अशा शो मधे तो शो चालवणारे सहसा स्वतःचा आब राखून बोलतात. पण इथे डेविड लेटरमनलाही तसेच करायचा मोह आवरला नाही आणि पुढे २-३ मिनिटे दोघेही तसेच ओरडत राहतात. इव्हन त्या शो इव्हन नंतरही अधेमधे ओरडतात.

ही मुलाखत १९९४ सालची आहे. त्यातला बॉर्न यस्टरडे चा संदर्भ समजला नाही. पण हा संदर्भ त्यावेळच्या किंवा जुन्या पण सर्वांना माहीत असलेल्या सिरीजचा असणार असा अंदाज होता. कुतुहलाने यूट्यूबवर शोधले तर एक क्लिप सापडली. त्यातले त्या ब्रॉडरिक क्रॉफर्डचे बोलणे इथून २-३ मिनिटे पाहिले तर लक्षात येईल की याची नक्कल मजेदार तर आहेच पण "माझा आतला आवाज्/कॉन्शन्स असा बोलतो" ही कल्पनाच अफलातून आहे Happy
https://www.youtube.com/watch?v=UJVuyQgCLDQ

बाकी तीस वर्षांपूर्वी असा विनोद प्रचलित होता. आता भारतातले अनेक लोक हे शोज पाहतात. कलाकार, सेलेब्रिटीज तर बघतातच. मग अजून अशा मुलाखती आपल्याकडे का दिसत नाहीत!

आनंद नाडकर्णींची खूप छान मुलाखत (podcast )ऐकली.

https://youtu.be/RlqEbJQP9UU?si=aiZkWyk_zjsLJV_m

आयुष्यात गोल,/महत्वाकांक्षा, पर्पझ यांचा नीट विचार करत, समतोल साधत स्वतः (मी) चे, कुटुंबाचे ( आम्ही) आणि आपले ( समाजाचे) जीवन सुंदर / स्वस्थ करायचे.

वरच्या दोन्ही मुलाखती उत्तम आहेत!
' सर्व काही' वर डॉ. राजेंद्र भिडेंची मुलाखत आहे. डॉ. भिडे हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत. हस्ताक्षरावरून वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा कसा लावला जातो ह्यावर बोलले आहेत. वेगळा विषय आहे, त्यामुळे मुलाखत रंजक वाटली.

https://youtu.be/H-dbrm5N_d4?si=fIRf3nGCQC6tTwmE

श्रीरंग गोडबोलेंची think bank वरची मुलाखत.
आवडली.
सध्या जे latent प्रकरण चालू आहे, त्याच आणि बदललेली समाज माध्यमं, स्क्रीन टाईम, बदललेली कुटुंब पद्धती, माणसांचे स्वभाव, विचार ह्यांतील परस्पर संबंध त्यांनी इतका छान उलगडून सांगितलाय.

absolutely floored झालो. वेंकटेश राव ह्या माणसाच्या अचाट बुद्धिमत्तेने. अत्यंत रोचक, प्रचंड अवघड आणि मेंदूला प्रचंड ताण देणारी अशी मुलाखत : बाप रे, मुलाखतकर आणि मुलाखत देणारा दोघांनाही सॅल्यूट. अतिशय उच्च दर्जाचा मेंदूला खुराक.

Pages