मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्याद्री दूरदर्शन - आमची पंचविशी - शांता शेळके - श्रीनिवास खळे - सुधीर गाडगीळ

फार काही नवीन हाती लागणार नाही. पण शांताबाईंचं प्रसिद्ध काव्यप्रेम आणि कविता पाठ असणं, त्यांचं खळखळून हसणं, हे तिघे भारतीय बैठकीत सहज बसलेले असणं , श्रीनिवास खळ्यांचं तोवर खळेकाका झालेलं नसणं आणि खळे साहेब , शांताबाई , काय हो, ही संबोधनं सहज वाटणं असं बरंच काही. कार्यक्रम किती सालचा आहे ते कळलं नाही. १९८० च्या दशकातला असावा. तोवर या दोघा कलावंतांबद्दल फार माहिती सहज उपलब्ध नसावी. गाडगीळ चाचपडत प्रश्न विचारताहेत. तोवर मोठ्या लोकांशी बोलायची सवयही झाली नसावी.
हे दोघेही त्यांना सुधीर असं संबोधताहेत आणि ते आदरार्थी बहुवचन आहे.

सह्याद्रीवरचाच पुष्पा पागधरे आणि प्रमिला दातार यांचा गोष्टी गाण्यांचा पाहिला. प्रमिला दातार या वयात इतक्या ताठ बसलेल्या आणि खणखणीत गाताना, बोलताना पाहून छान वाटलं. लहानपणी पाहिलेली पेपरातली सुनहरी यादें ची जाहिरात आठवली. त्यांना स्वतःला फार कमी गाणी मिळाली असावीत. इतनी शक्ती हमें देना दाता ला प्रमिला दातारांनी सूर देणं किती गोड!
पुष्पा पागधरेंचा साधेपणा ठसला. कार्यक्रमात वाजलेल्या दोन लावण्या आणि तिसरी माझ्या नथीचा तुटला फासा या किती अवघड आणि त्यातली भरपूर व्हेरिएशन्स.
त्यांना त्यांच्या वकुबाच्या मानाने फारच कमी गाणी मिळाली.
लावणी = उषा मंगेशकर हे समीकरण झाल्यावर सुलोचना चव्हाणही मागे पडल्या असाव्यात. आणि ठसकेबाजपणा हे एकच वैशिष्ट्य लावण्यांत उरलं. आशाच्या काही लावण्यांत अदायगी, नजाकत दिसतात.

अनिल थत्ते बिग बॉस मराठी मध्ये होते तेच काय?
बोलका माणूस आहे.

बघून आलो तीच व्यक्ती.
बिग बॉस मध्येही मी कसा श्रीमंत वै सुरू असायचं
25 लाखाचं टॉयलेट की कमोड ह्याचे फार किस्से सांगायचे ते. आतल्या इतर मंडळींना हो का , आम्हीही येऊ बघयाला वै म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.

लहानपणी पाहिलेली पेपरातली सुनहरी यादें ची जाहिरात आठवली. >>>> +१

मी पाहिला आहे 'सुनहरी यादे' हा प्रोग्रॅम ८० च्या दशकात. शिवाजी मंदिर ला बर्‍याच वेळा लागायचा. एक दोन वेळा प्रमिला दातारांच्या घरी सुद्धा गेलेलो आहे.

एकंदरीतच "गोष्टी गाण्याच्या" ही सिरीज खूपच चांगली आहे. प्रमिला दातेंचा हा भाग, आणि मागे फैयाझ आणि बकुल पंडित यांचा भाग पण चांगला झाला होता.

एकंदरीतच असंख्य चॅनल्स्च्या झगमगाटात सह्याद्री वाहिनीचा साधेपणाच खुलून दिसतो आणि मनाला भावतो सुद्धा.

आतापर्यंत माझ्या खालील मराठी जालमंचावरील विविध मुलाखती बघून झाल्यात :

  • ग गप्पांचा, रंगपंढरी, मित्र म्हणे,
  • अमोल परचुरे मंच, दिल के करीब, दुसरी बाजू
  • सह्याद्रीवरील गान मुलाखती ( मैत्र हे ताल/ शब्द सुरांचे, गोष्टी गाण्यांच्या)
  • साधना मंच, पराग माटेगावकर मंच,
  • वरीलपैकी काही मंच विशिष्ट कलाप्रकारांसाठीच आहेत.
    या सर्वांमध्ये मला ‘ग गप्पांचा’ हा मंच विशेष आवडला. त्यांची विविधता सर्वाधिक वाटली. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवराच्या प्रांतानुसार मुलाखतकारही बदलतात. हा बदल नक्कीच चांगला वाटतो. या मुलाखती म्हणजे जाहीर कार्यक्रमांचे चित्रांकन असते. त्यामुळे मधूनमधून प्रेक्षकांवरही कॅमेरा फिरतो.

अनिल थत्ते यांची मुलाखत आवडली. एकदम धमाल आहे. थोडीफार अतिशयोक्ती असू शकेल, पण ज्याअर्थी हा माणूस अजूनही जिवंत आहे, याचा अर्थ त्याचे हात वरपर्यंत पोचले आहेत, हे नक्की. जिकडेतिकडे सर्वत्र मार्केटिंग असते आणि मी पण तेच करतो, आपण कितीही गुणवान असलो पण धनवान नसलो तर आपल्याला काहीही किंमत नाही, हे किमान मान्य करणारा प्रामाणिकपणा आवडला.

क्रिश अशोक यांची राज शमानी याने भारतीय आहार पद्धतींविषयी घेतलेली मुलाखत चांगली आहे.
लिंक - https://youtu.be/Zf0idCv5BGU?si=RW8QXTm-BDEteDRU

क्रिश अशोक एक हौशी food nutritionist असावेत. त्यांनी मसाला लॅब नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मुलाखत बघून पुस्तक वाचावे असे वाटते.

राज शमानीच्या चॅनेलवरच्या इतर मुलाखती देखील चांगल्या वाटल्या.

परवा मित्र म्हणे वर RAW मध्ये एजन्ट असलेल्या जयंत उमराणीकर यांची मुलाखत बघितली. चांगली झाली, इतके सुंदर स्वच्छ अस्खलित मराठी शांत बोलणं होतं त्यांचं, बोलण्यात कुठेच अति अभिमानाचा किंवा गर्वाचा लवलेशही जाणवला नाही. ते आधी पोलीस होते आणि मग RAW मध्ये गेले ..म्हणजे त्यांना बोलावून घेतलं.. पण त्यांनी एकेक किस्से व काही कोडवर्ड्स सांगितले ते सगळं ऐकून भारी वाटत होतं एकदम.. मूवीत दाखवतात अल्मोस्ट तसंच. खूप सजग असतात हे लोक व तसंच असावं लागतं.. कधी वेष बदलायचा कधी नाही वगैरेचं भान असायला हवं तेवढं डोकं चालवता यायला हवं.. ते कधीच रॉ म्हणत नव्हते दरवेळी RAW असच म्हणत होते.

मागच्या पानावर आलेली रेखाची मुलाखत बघितली. खूपच नीरस आणि कंटाळवाणी वाटली. फक्त रेखा होती म्हणून अर्ध्यावर सोडता नाही आली नाही तर इतके उथळ, कसलाच आगापिछा नसलेले पश्न असलेली मुलाखत बघणे कठीण असते. इतक्या रटाळ प्रश्नांना रेखाने दिलेली उत्तरे मात्र खूप मुद्देसूद आहेत.

मुलाखत आवडण्यामागे मुलाखत देणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्वापेक्षा मुलाखत घेणारा जास्त कारणीभूत असतो. त्याच्याकडे व्यासंग, समोरच्या व्यक्तीमधले गुण उलगडून दाखवणारे प्रश्न विचारण्याचे कसब हे असणे अत्यंत गरजेचे असते.

अंजली मी पण त्याच मुलाखतीबद्दल लिहायला आले होते . मित्र म्हणे वर संजय राऊत यांची पण मुलाखत पहिली . अत्यंत ओघवती झाली आहे . मुलाखत मुलाखत असा प्रकार नाही वाटला . .. दोन माणसं सहज गप्पा मारतात तसं वाटलं . राऊतांबद्दल अजिबात फार माहिती नव्हती .

संजय राऊत यांची पण मुलाखत पहिली . अत्यंत ओघवती झाली आहे >> हो? मला ते राजकारणी म्हणून बघावे वाटत नव्हते त्यांचे बोलणे शांत कधी ऐकलेच नाहीये कायम बोचकारण्याऱ्या चिडक्या बोक्यासारखे बोलत असतात सो बघावंसं वाटलं नाही.. पण राजकारण सोडून अवांतर जास्त असेल तर बघते आता.

नक्की पहाणार.
लल्लनटॉपवर रत्ना पाठकची पण माहितीपुर्ण आहे.

रिझर्व्ह बँकेकडून सरकारने लाभांशाच्या रुपात अव्वाच्या सव्वला पैसे घेतले ?
: https://www.youtube.com/watch?v=WdCM3ERgvaI

डॉ. उदय निरगुडकरांनी छान समजावून सांगितलं आहे.

तुंबाडचा निर्माता/ अभिनेता सोहम शहाची मुलाखत आली आहे. तुंबाड री-रिलीज होतोय त्यानिमित्ताने आली असवी.
तुंबाडवर कसं काम झालं, पावसाची, त्या ढगांची, वातावरणाची उत्तम दृष्य मिळावी म्हणून सहा वर्षे चित्रिकरण चालू होतं. देवीची कूस (गर्भाशय) आणि त्याचं चित्रण/ विज्युअल्स कसे ठरले, हस्तर कसा बदलत गेला, पटकथा आणि आजू बाजूची डीटेल्स कशी इव्हॉल्व होत गेली, आणि ए़कुणच त्याने राहीने आणि सगळ्या टीमने किती बारकावे लक्षात घेत विचार आणि पुन्हा विचार करुन सिनेमा बनवला आहे हे ऐकून या जॉन्राचा चित्रपट भारतात बनल्याचं फार कौतुक वाटतं.
अगदी दिलखुलास मुलाखत आहे. मला फार आवडली. लगेहात काल परत तुंबाड बघुन टाकला. इथे चित्रपटगृहात अजुन आलेला नाही. त्यामुळे फार आशा नाहीत.

तुंबाडचा निर्माता/ अभिनेता सोहम शहाची मुलाखत आली आहे. तुंबाड री-रिलीज होतोय त्यानिमित्ताने आली असवी.
>>>>
मीही बघितली. आवडली. सोहम शहा मनमोकळेपणाने बोलला आहे. अजून तपशीलवार होऊ शकली असती कदाचित, पण री-रीलीजसाठी स्पॉयलर येऊ न देण्याची काळजी घेतली असावी. तो अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा तीनही धुरा सांभाळत होता. त्यात यावर सहा वर्षे संशोधन करून तीन वेगवेगळ्या अंतांमधून एक निवडला. नारायण धारप आणि त्यांच्या तीन कथा व राही अनिल बर्वे यांनी त्यात बदल करून केलेली पूर्ण नवी तुंबाड ही कथा साकारली. त्यात सतत कोसळणारा पाऊस (आणि कोंदट कुंद वातावरण) हा एक मुख्य आणि बेभरवशाचा कलाकार होता, कृत्रिम पाऊस आणता आला असता पण ढगांची रचना बदलली असती. ते न पटल्याने त्यांना पुढच्या वर्षीच्या पावसाळ्या पर्यंत थांबावे लागले.

सोहमच्या मते हा चित्रपट भुताचा किंवा हॉरर जॉन्राचा नसून लालसा आणि एका अमानवीय प्राण्याचा (हस्तर) आहे. लालसा नसती तर पूर्तीदेवतेच्या गर्भगृहात विनायक गेला नसता. पण त्याला जे जीवन लहानपणी जगावे लागले त्याने तो कायमचा असुरक्षित झाला. त्यामुळे कुठे तरी इतर भावना त्याच्या मनात असूनही ( राघवला मुक्ती देताना डोळे पाणावतात असे प्रसंग) लालसेने कायमच त्याच्यातल्या चांगल्या माणसावर मात केली.

यात हस्तर सुरवातीला काळा होता व दुसऱ्या शेवटात तो वरची दोरी कापून टाकतो असा शेवट होतो. तो खराच शेवट ठरला असता आणि कदाचित तुंबाडचे पुढचे भाग आले नसते. ते गर्भगृह सुद्धा धडधडणारे जिवंत आहे, ती लालसाही अशीच पिढ्यानुपिढ्याच्या शापाप्रमाणे अविरत आहे.

VFX चा अतिवापर हा हिंदी चित्रपटाचा कणा असलेल्या मानवी भावना व नात्यांचा खोली या गोष्टींची जागा घेऊ शकत नाही हे आधीच पटलेय. अती तांत्रिक गोष्टी चित्रपटातील पात्रांना प्रेक्षकांपासून दूर नेऊन ठेवतात आणि 'आत' हलत नाही. त्यामुळे त्याने वडील मुलाला वाचवतात असा शेवट निवडला असे तो म्हणाला. ते मला आवडले. मुलाखत आवडली तरीही काही तरी मिसिंग वाटत होते.

रणवीरचा कल अंधश्रद्धेकडे झुकणारा आहे. त्याच्या प्रश्नांचा रोख (मंत्र तंत्र/ occult) कंटाळवाणा होऊ लागला. अशा चित्रपटांना असा प्रॉपगॅन्डा तयार करून 'क्लिशे' बोलत रहायची निदान तुंबाडसारख्या चित्रपटावर चर्चा होताना गरज वाटत नाही.

तुंबाड परत बघताना मला तो मस्त तुटक वाटला. हे तुटक असणं हेच त्याचं बलस्थान आहे. जॉईनिंग द डॉट्स आणि काही अपूर्ण कथा. गोडी अपूर्णतेची! याने मजा येते.
शेवटी विनायक आपल्या सर्वांगाला पिठाच्या बाहुल्या लावून संकट स्वतःवर ओढवून मुलाला वाचवतो. विनायक आधी इतका कोरडा दाखवला आहे, त्याच्या आयुष्यात कुठेच प्रेम जिव्हाळा याला स्थान आठवत नाही आणि तो शेवटी असा का वागतो?
मला स्वतःला विनायक स्वतः झटकन वर चढू लागतो. मुलाला वाचवायचा जुजबी प्रयत्न करतो पण हस्तर वर येताहेत बघून मुलगा दोरीवर असतानाच दोरी कापून टाकतो. आणि दार बंद करुन टाकतो अशा शेवट आवडला असता. झटका बसला असता! पोस्ट क्रेडिट सीनला दुसरा मुलगा दोरीवर चढायचा सराव करतोय आणि अनिता दाते पोटुशी आहे.... नाही पोस्ट क्रेडिट सीन फारच हॉलिवुडी झाले हे. विनायक मुलागा आत गेल्यावरही बाहेर धान्याच्या वर्तुळाबाहेर झटापटीत सांडलेली नाणी उचलतो आणि गाडी चालू करतो.. आणि वाड्यावर सरकारी नियंत्रण येतं. असा चालला असता.

अर्थात त्याला इमोशनल (पॉझिटिव्ह) शेवट हवा होता. पण विनायकची सायकी अशी चालेल का असं वाटलं मला.

पार्ट टू काढायला आता मुलगा हस्तर झाला, हस्तरची बॅक स्टोरी, आजीची बॅक स्टोरी, त्या जमिनदार बायोलॉजिकल बापाची स्टोरी, वाडा सरकारजमा झाल्यावरची स्टोरी असं बरंच काही मटेरिअल आहेच. हे सगळं अजुन फुलवलं की तुंबाड युनिवर्स करायचा स्कोप आहे हा मुलाखतीतला भाग सही आहे. असं झालं तर मजा येईल.

think bank नावाच्या चॅनेल वर (तू नळी ) वैशाली करमरकर यांची ३ भागात मुलाखत आहे. वैशाली करमरकर आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ आहेत. तीनही भाग must watch आहेत भाग २ तर must must must watch आहे असे वाटले मला. फक्त एकच खूप slow बोलतात कारण तसा विषयही सोपा नाहीचे पण तरी मी स्पीड वाढवून ऐकले बॉ..!
पहिल्या भागाची लिंक देते आपसूक उरलेल्या येतीलच पुढे. मागे केव्हातरी त्यांचे स्वयं talks कि असेच कशावर छान मुलाखत / प्रेसेंटेशन झाले होते. उदय निरगुडकर होते talk झाल्यावर मुलाखत घ्यायला

https://youtu.be/wakarAk3iV0?si=C66z6C5j1RDeZnva

सध्या जिकडेतिकडे महागुरू सचिन पिळगांवकर यांच्याच मुलाखती दिसत आहेत. प्रत्येक टीव्ही चॅनेल पासून ते सुदामे पर्यंत सर्वाना मुलाखती देत सुटले आहेत . प्रत्येक मुलाखतीत मी मी मी. वीट आला , वयाच्या १ ७ व्या वर्षी रमेश सिप्पीना पण यांनीच पटवून दिले म्हणे की अमजदचा मूळ आवाजच ठेवा , त्याचे डबिंग करू नका. बिचारा अमजद . सुप्रिया पिळगांवकर सुद्धा ह्या थोर व्यक्तीची मी पामर बायको आहे हे ओळखून त्यांच्याकडे कौतूकाने पाहत असते.

झाला का नवरा माझा नवसाचा प्रदर्शित ? कारण तोपर्यंत महागुरू सर्वत्र हजेरी लावणार

बच्चनजींच्या पेक्षा मला जया जी जवळच्या आहेत.त्या माझे खूप लाड करतात..इती महागुरू

खाली एकाने कॉमेंट लिहिली होती ..नीरज चोप्रा पेक्षा जोरात फेकतोय Lol

खरंतर हा धागा मी महागुरु साठीच उघडला...कोणी काही लिहिलंय का? हे बघायला... Lol मला खरंतर ती world-famous मुलाखत ऐकायची आहे...कोणी लिंक देता का लिंक ?

मला तर लोक काय कमेंट करतात त्यात भारी रस आहे
>>> अगदी. Lol
केया Lol

मलाही महागुरू 'खानेमें क्या है' नावाच्या खादाडीच्या यूट्यूब चॅनल वर दिसले. काही तरी नवीन येणार असले की पावसाळ्यात दिसणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांसारखे सगळीकडे 'पॉप पॉप' होतात. Happy

'खानेमें क्या है'चा होस्ट स्वतःच कायम दुष्काळातून आल्यासारखा दिसतो, तृप्तता अशी नाहीच. 'याला आधी द्या खायला, मुलाखतीचे राहू द्या' असे मनात येते.

Pages