मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमेश - सुरेश >>> Biggrin

रंगपंढरी या सदरातील काही चांगल्या आहेत.>>
रंगपंढरीमध्ये मधुराणी उत्तमप्रकारे मुलाखत घेते. बहुतांशी मुलाखतीतील प्रश्न फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या कामाशीच संबंधित असतात, उगीच पाहुण्यांना वयक्तिक प्रश्न विचारत नाही. म्हणूनही असेल, त्या मुलाखती दर्जेदार वाटतात.

_/\__/\__/\_
मला एकच दंडवत (पहिला आणि शेवटचा...) घालायचा होता पण क्रोम बॅकस्पेसला देखला देव करतय.

धोतरात हात नाही घालत हो आपण! Proud बरं धोतर नाही तर राहिलं. मग इजा बिजात तिजा करायला नाथांना चाच्यांत टाकताय का? चायवाले चाचा. किंवा नाबोचाचा Proud

त्यांच्यावरील बायोपीकचे नाव होते.
आणि....... काशिनाथ घाणेकर. पॉज= सन्मान. 'आणि' आणि पुढे एकच शब्द लिहिताना आठवतेच. Lol

आणि....... काशिनाथ घाणेकर. पॉज= सन्मान. 'आणि' आणि पुढे एकच शब्द लिहिताना आठवतेच >>> Lol समजले

ती सगळी पोस्ट भारी आहे Happy

क्रोम बॅकस्पेसला देखला देव करतय. >>> Happy हे वाचून मी एक दंडवत घालून बघितला - क्रोम मधे पण उमटला व्यवस्थित. तू फोन मधून करतोयस का? की काही प्रोग्रॅमिंग भाषांमधे मधे एक डबल कोट प्रिन्ट करायचा असेल तर अलीकडे पलीकडे पन्नास एक एक्स्ट्रॉ डबल कोट्स टाकावे लागतात यश राज फिल्म्स मधल्या शावा शावा फॅमिली साँग मधे एक्स्ट्रॉज असतात तसे, तसे काहीतरी? Happy

त्या ह्यांना "नाथ" असं संबोधून उगीच गळ्यात पडून नातं जोडायाचा प्रयत्न करतायत ह्याची कोणीतरी जाणीव करून द्या ह्या स्वातींना !
(की तेच करायचं आहे ?? Proud )

वावे, पोस्ट आवडली.
आरतींना / आरतींचे असं कृत्रिम मराठी चालतं पण ताई/बाई म्हणायचं नाही! गंमतच आहे. राजची पोस्टही पटली. असो.

मला ताई म्हणायला आवडेल मग त्या स्त्रीचे वय ९० असले तरी. बाप्प्यांना, दादा. (सवय जाणार नाही)

अस्मिता, रमेश-उमेशची उकल कर बरे. अभ्यास कमी पडतोय.

अरे नवा प्रॉब्लेम नाही. क्रोमचा नेहेमीचाच बॅकस्पेस दिली की शेवटचं परत परत परत परत परत येतं तोच. फक्त तो दंडवतला आल्याने देखल्या देवा जोक करता आला हा इतकंच Wink

मला नेहमी ही आठवते Happy
https://www.youtube.com/watch?v=RLYk5FvLdRU

दंडवतला आल्याने देखल्या देवा जोक करता आला हा इतकंच >> Happy मी "पहिला आणि शेवटचा" वाचून "अखेरचा हा तुला दंडवत" वरच्या सुचलेल्या सर्व फाको फोर्सफिट वाटल्याने मागे घेतल्या Happy

अखेरचा हा तुला दंडवत >>>>
Don't underestimate the power of दंडवत. संदर्भ- दीवार.
एक लेखक दुसऱ्या लेखकाला मनात -
मेरे पास 'जबरदस्त लिहिले आहे है, मेरे पास धमाल है, मेरे पास मायबोलीवर येण्याचे सार्थक झाले' भी है.

दुसरा लेखक -
मेरे पास दंडवत है..
खेळ खल्लास. Lol

खूप केले अवांतर आता पुरे करतेय.

मेरे पास 'जबरदस्त लिहिले आहे है, मेरे पास धमाल है, मेरे पास मायबोलीवर येण्याचे सार्थक झाले' भी है.
मेरे पास दंडवत है.. >>>

Lol

अरे पण ती कंपॅरिजन चुकीची आहे. आपल्या आपल्यात लाडाने नाथ म्हणणे वेगळे पण ते समोर आले तर काय नाssथ अशी हाक मारणार आहोत का ? Lol पण मारली तर ते गळ्यात पडणे झाले ( इश्श) हे बरोबर Happy

अरे पण ती कंपॅरिजन चुकीची आहे. >>>> पण पूर्ण चर्चा पल्लवी जोशीने "खळेकाका" म्हणण्यावरून सुरू झाली ना.. त्यांच्या समोरनाही तर ते त्या कार्यक्रमात नसताना.

मित्र म्हणे वर अनुराधा सहस्रबुद्धे यांची मुलाखत
परिस्थिती किती गंभीर आहे हे ऐकून सुन्न व्हायला झालं

मित्र म्हणे वर अनुराधा सहस्रबुद्धे यांची मुलाखत >>>>>>>++११
फारच डेंजर परिस्थिती आहे. हताश झाले ऐकून.

किशोरी आमोणकरांची कुमार केतकरांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
फारच आवडली. क्रिस्प आणि ब्रिलियंट मुलाखत घेतली आहे. फोकस ढळू न देता आणि उगाच फापट पसारा प्रश्नांना, नमनाच्या तेलावर पूर्ण काट मारुन थेट प्रश्न विचारण्याची नो नॉनसेन्स शैली फारच आवडली.
किशोरी आमोणकर फार आत्मियतेने आणि संगीतातील संकल्पनांसाठी ही फार इंग्रजी शब्द न वापरता मराठीत किती सहज बोलल्या आहेत! गानसरस्वतीच. किती लहान लहान गोष्टीचा सखोल विचार केलेला आहे, करत होत्या! भाषा आणि संगीत, वेगळ्या रागातील एकच स्वर, श्रुतींच्या पलिकडचे स्वर... अनेक मुद्द्याबद्दल बोलल्या आहेत.

इथे वाचून मित्र म्हणे चे व्हिडीओज वर वर चाळत होतो. तर हे महाशय सौमित्र पोटे निघाले. ते लोकमत कि लोकसत्तासाठी फिल्मी कि काय सदर चालवायचे तेव्हां. एका उथळ, बालिश आणि हास्यास्पद इनोदी मराठी सिनेमाची भलावण करताना जो काही अभिनय केला होता तेव्हांपासून ते डोक्यातच गेलेले.
पण या चॅनेलवर वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत आहेत.
त्यातली ही खास रे टिव्हीची खूपच विशेष वाटली
https://www.youtube.com/watch?v=KddBK7_A3lY

आकाशवाणीच्या संग्रहातून- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पु.ल. देशपांडे यांनी घेतलेली अर्ध्या तासाची मुलाखत आहे.
https://youtu.be/nCkJV82HX7E?si=tS7voR5UJG1LclZ4

तर्कतीर्थांचा जन्म १९०१ सालचा. ही मुलाखत १९८६ मधली आहे. शहाऐंशीव्या वर्षीही असलेले खणखणीत विचार, आचार आणि उच्चार ऐकण्यासारखे आहेत. Happy ते तेव्हाही रोज एक व्याख्यान देत होते आणि मुलाखतीत म्हणाले आहेत की इतर कामांचा ताण बराच आहे, त्यात हा व्याख्यानांचा ताण आता जास्त वाटतो, पण लोकांना 'नाही' म्हणवत नाही!!!
वेदशास्त्रांचा अभ्यास, नंतर स्वातंत्र्यचळवळीत सहभाग आणि एकंदरीत आयुष्यभर तत्वज्ञानाकडे असलेला ओढा, बुद्धिप्रामाण्यवाद यावर ते बोलले आहेत.

धन्यवाद वावे! अर्ध्याहून अधिक ऐकली. टोटल रिस्पेक्ट! काय उत्तुंग व्यक्तिमत्त्वे एकेक!

बाकी पुलंच्या "एका गांधी टोपीचा प्रवास" मधले उल्लेख अशा मुलाखतींमधून आले असावेत (किंवा अशा चर्चांमधून). अर्थात पुलंनीही गांधींचा काळ प्रत्यक्ष पाहिला होताच.

दुसरे म्हणजे काकाकुवा बद्दल "नुकताच मिल किंवा स्पेन्सरचा ग्रंथ वाचून मनन करत असल्यासारखा तो दिसतो" वाला उल्लेख आठवला, इथे स्पेन्सर ची चर्चा ऐकून Happy

उत्तुंग व्यक्तिमत्त्वे >> खरोखरच. त्यांनी वाद-चर्चांचं जे वर्णन केलं आहे (दुसरी बाजू समजून घेणं, दुसऱ्या बाजूला तुच्छ न लेखणं) अशा प्रकारच्या संस्कारांची फार गरज आहे आपल्याला.
ते इंग्रजी प्रथम शिकले विनोबा भाव्यांकडून!

मिल-स्पेन्सर>> मला वाटतं 'बटाट्याची चाळ'मधल्या 'चिंतन'मध्येही कुणाचा तरी उल्लेख करताना मिल, स्पेन्सर ही नावं, ते गेल्यानंतर परत चाळीने कधी ऐकली नाहीत असं आहे.

Pages