मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तिची ओळख असू शकते ना त्यांच्याशी ?<<
असावी. खळेकाकांकडे ती गाणं शिकायला यायची असं वाचल्याचं आठवतंय.

तरिहि, कोणाला काय फरक पडतो? व्हि. शांताराम, पुल देशपांडे यांना हल्लीचे तरुण अनुक्रमे अण्णा, भाई म्हणतात. अर्थात आदराने. ते काय यांच्या बरोबर मांडिला मांडि लाउन जेवायचे काय?

हे सगळं मागे राज ठाकरेने अशोक सराफांच्या बाबतीत पुडि सोडल्यानंतर सुरु झालेलं आहे. अरे, सराफांना मामा म्हणवुन घेणं मान्य आहे तर तुम्हि कोण टिकोजीराव. उगाच नको त्या विषयात पडुन हसं करुन घेण्याची भयंकर आवड असते काहिंच्यात.. असो...

ह्या जी, जी मुळे एक किस्सा आठवला.

मी आणि इतर काही सहकारी आमच्या उभा (उत्तर भारतीय) साहेबाबरोबर मीटिंग मध्ये होतो तेव्हा त्याला एका उभा उच्चपदस्थ कस्टम्बरचा फोन आला तेव्हा त्याने गरजेचा आहे म्हणून तो फोन घेतला. आम्ही सगळे शांतपणे बसून होतो. आमच्या साहेबाने बोलताना इतक्या वेळा हां जी, हां जी केले की तेव्हा मला "हांजी हांजी' चा खरा अर्थ कळला. त्या आधी फक्त एक मराठीतला वाक्प्रचार म्हणून माहीत होता परंतु प्रत्यक्ष उदाहरण बघितले तेव्हा तो माझ्या साठी युरेकाजी क्षण होता.

शिवाय पुन्हा हा संस्कृतीचा भाग झाला. आपण सर्वसाधारणपणे कुठल्याही वयाने मोठ्या माणसांना काहीतरी संबोधन लावतो. (उदा. भांडीवाली बाई, भाजीवाला, रिक्षावला, दुकानदार इत्यादी) तो त्यांच्या गळ्यात पडून नातं जोडायचा प्रयत्न नसतो. >> हे पटलं. इथे मी संस्कृतीचा अर्थ सवय असा घेतो आहे. तो भाषिक सवयीचा भाग आहे.

सगळेच प्रतिसाद वाचले नाहीत.
प्रसिद्ध व्यक्तींना प्रसिद्ध व्यासपीठावर संबोधताना लोक त्यांना ज्या नावे ओळखतात/संबोधतात ते नाव वापरलेले बरे हा मुद्दा दिसतोय. याच्याशी सहमत. गांधीजी/बापु, दादमुनी, लतादीदी, पंचमदा ही काही उदाहरणे, अशी संबोधने खटकत नाहीत कारण लोक त्यांना तसे संबोधत/ओळखत. अशोकमामा खटकते.

पल्लवी जोशींचे श्रीनिवास खळ्यांशी काका म्हणण्याइतके संबंध असतील. पण तिच्यामुळे सगळा महाराष्ट्र त्यांना खळेकाका म्हणायला लागला.

बकुल पंडित यांना प्रश्न विचारताना उत्तरा मोने खळेकाका म्हणाल्या.

सारेगम हा एक सार्वजनिक कार्यक्रम आहे. त्याचं स्वरूप झीने खेळीमेळीचं ठेवलं. परीक्षकांना ताईदादा केलं. पण कार्यक्रमात आलेल्या सगळ्या खास पाहुण्यांशी सुद्धा अशीच सलगी दाखवायचे का? लता आणि आशा हृदयनाथना बाळ म्हणतात, म्हणून पल्लवी किंवा अवधूत यांनी त्यांना बाळकाका म्हटलं तर कसं वाटेल?

सुनीधी, नुसतं आरती म्हणून सोबत आदरार्थी बहुवचन वापरता येईल का? - आरती, तुम्हांला भेटून खूप आनंद झाला.
नुसतं आरती म्हणण्यात जास्त सलगी वाटत असेल, तर आरती अंकलीकर म्हणून अंतर ठेवता येईल.
तुम्ही स्मोरासमोर उभं राहून बोलत असाल, त्यांच्याशी बोलताय हे त्यांना कळत असेल, तर नाव घ्यायलाच हवं असं नाही.

पूर्वी साहेब हेही आदरार्थी संबोधन होतं. आशाच्या बोलण्यात फडके साहेब आलेलं आहे. आता सर म्हणतात.

हो, तसंच राव आणि बाई पण. वसंतराव, लताबाई वगैरे. पुढचं राव/साहेब/बाई/ताई/काका न जोडल्यास एकेरी हाक मारावी का आदरार्थी ह्यात गोंधळ होतो. उदा. हेच पहा ना, 'पल्लवी जोशींचे' आणि 'तिच्यामुळे'. असे घोळ माझेही होतात. कुणाला नुसत्या नावाने हाक मारलं की लहानपणी आजोबा ओरडायचे. तुझे काय ते लंगोटीयार आहेत का म्हणून. आता काळ बदलला आहे, तरी ती सवय लोकांची मोडलेली नसू शकते हे मी समजू शकतो. मला पण इथे लोक हरचंदजी वगैरे म्हटले की मी सांगतो नुसतं हर्पा/हपा म्हणायला. एकाने तर हपाजी केला होता माझा. नशीब पाजी नाही केला.

माझेही दोन पैसे Proud
याबद्दल एवढा विचार कधी केला नव्हता, पण आता केल्यावर असं वाटतं की समजा एखाद्या मान्यवर व्यक्तीशी समोरासमोर बोलताना संबोधन वापरायचा प्रसंग आला तर आदर दाखवण्यासाठी जे संबोधन वापरावंसं वाटतं ते वापरलं जाईल. पण त्याच व्यक्तीचा परोक्ष उल्लेख करताना नाव-आडनावासहित नुसताच आदरार्थी उल्लेख करणं जास्त योग्य वाटेल. उदाहरणार्थ समोरासमोर संबोधताना मंगलाताई, पण नंतर उल्लेख करताना 'आमच्या गावात मंगला गोडबोले
आल्या होत्या.'
अमुक तमुकवर राहुल देशपांडेची मुलाखत होती त्यात ते दोघे त्याला 'दादा' म्हणून अरेतुरे करत होते ते जरा खटकतच होतं . नको तितकं अनौपचारिक वाटत होतं. पण ते एरवीही नको तितके अनौपचारिक वागतात असंच वाटतं नाही तरी.

विभक्ती लावताना जरा पंचाईत होते.
आरतींना, आरतींनी, आरतींचा, आरतींशी हे आदरार्थी पेक्षा अनेकवचनी जास्त वाटतं.
यात अनुस्वार काढला तर पहिले आदरार्थी वाटेल इतर नाही.
तसेच अकारांत नाव असेल तर आदरार्थी ठेवून विभक्ती लावणे आणखी जिकरीचे.

वावे +१
अमुक तमुक वरची जोडगोळी फाईव्ह स्टारच्या रमेश- सुरेश सारखी आहे. अतिच कॅज्युअल.

आपल्या पोस्ट्स क्रॉस झाल्या. विभक्ती आडनावाला लावल्यास हा गोंधळ होणार नाही हे मान्य.
मायबोलीवर वापरायच्या नावात आडनाव फार कमी लोक वापरतात.
--
भरत, एकाच व्यक्ती बद्दल बोलत असु तेव्हा तुम्ही म्हणता तसे एकदा नाव घेतले की पुढे सर्वनाम वापरणे शक्य आहे.
बोलताना इतरांचाही उल्लेख येतो, "त्या एकदा पल्लवींना म्हणाल्या" इत्यादि.

आडनावात आपण अनेकवचनरुपी आदरार्थी विभक्तीची सवय लावुन घेतली आहे, देशपांड्याना, आंबडेकरांना तसे नावाचीही लावुन घ्यायची हा सुद्धा एक उपाय होऊ शकेल.
मानवांना म्हटले की संदर्भानुसार अनेकवचन आहे की आदरार्थी हे ठरवायचे.

फाईव्ह स्टारच्या रमेश- सुरेश Rofl टेलरकडे जाऊन पँटची लांबी कमी करून घेतात तेच का?
मानव, हो बरोबर. पण मायबोलीवर एवढा प्रश्न येत नसावा. विभक्ती लावताना अडचण वाटत असेल तर 'यांना, यांनी' वगैरे लावता येतं की. उदा. अस्मिता. यांनी.

भार्गवी चिरमुलेने सुद्धा मुलाखतीचं दुकान उघडलेलं दिसतं. अभिजीत खांडकेकर वर रॅपिड फायर करत होती.
मालिकांमध्ये कामं मिळेनाशी झाली की मुलाखती घ्या असा राजमार्ग होऊ घातला आहे का? इतक्या जणांना मुलाखती द्यायला लोकांकडे सांगण्यासारखं आहे का?

भरत, कदाचित. (हे ताईमाईअक्का बद्दल होतं)

मीही घेणार आहे मुलाखत.
खरं खरं डू आयडी ने येऊन आणि चांगल्या भाषेत बोलणार असतील तर मायबोलीकरांची मुलाखत वादळ निर्माण करेल

नवीन जाहिरात माहीत नाही वावे, पण असेल. पुष्कळ हॅपनिंग आयुष्य आहे रमेश-सुरेशचे. ते 'आपल्याच नादात' असणं अगदी अमुक तमुक टाईप आहे. Happy

किल्ली Lol मायबोलीकरांच्या मुलाखती धमाल होतील.

>>>
याबद्दल एवढा विचार कधी केला नव्हता, पण आता केल्यावर असं वाटतं की समजा एखाद्या मान्यवर व्यक्तीशी समोरासमोर बोलताना संबोधन वापरायचा प्रसंग आला तर आदर दाखवण्यासाठी जे संबोधन वापरावंसं वाटतं ते वापरलं जाईल. पण त्याच व्यक्तीचा परोक्ष उल्लेख करताना नाव-आडनावासहित नुसताच आदरार्थी उल्लेख करणं जास्त योग्य वाटेल. उदाहरणार्थ समोरासमोर संबोधताना मंगलाताई, पण नंतर उल्लेख करताना 'आमच्या गावात मंगला गोडबोले आल्या होत्या.'
<<<
हो, मलाही असंच वाटतं.
सणसणीत अपवाद प्रेमाचे मान्यवर - लता, आशा, गुलजार, रहमान, इत्यादी. त्यांचे परोक्ष उल्लेख मी एकेरीत नाही केले तर माझं मलाच ऑड वाटेल.

मला व्यक्तिशः नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी सहसा एकदम एकेरीत बोलता येत नाही - विशेषतः वयाचा अंदाज नसेल तर. एक आपलं जिभेचं वळण.
आणि मलाही व्यक्तिगत ओळख नसताना ज्ञानेश्वरांना सरसकट माऊली, सावरकरांना तात्या, गदिमांना अण्णा, पुलंना भाई, लताला दीदी इत्यादी संबोधणारे लोक भंपक असतील अशी दाट शंका येते! Proud

(त्यावरून आठवलं, भरत यांना मी सुरुवातीला गमतीने 'भ्राता भरत'/भ्राताश्री म्हणत असे. मग त्यांनी इतर कोणालातरी 'दादा म्हणू नका' म्हणून फटकारलेलं दिसल्यावर घाबरून ते बंद केलं. Proud )

तुम्हांला वाईट सवयीच फार. नंतर अंगाशी येतात त्या Wink
भरत आता मयेकरही म्हणू नका म्हणून फटकारतात.
>> मलाही व्यक्तिगत ओळख नसताना ज्ञानेश्वरांना सरसकट माऊली, सावरकरांना तात्या, गदिमांना अण्णा, पुलंना भाई, लताला दीदी इत्यादी संबोधणारे लोक भंपक असतील अशी दाट शंका येते>> हो खरं आहे. उगाच गळ्यात पडत आपण किती जवळचे दाखवायचा अट्टाहास वाटतो. तसंच आशा, लता वगैरे एकेरी उल्लेखानेच जवळच्या वाटतात. पण तुमच्यासारखं (स्वाती आंबोळे) गुलजारला चाचा वगैरेही नाही म्हणवत.

(स्वाती) आंबोळ्यांचे बरेच चाचा आहेत. लुंगी, धोतर, पायजमा. त्यात घोळ करू नका. किंवा करा.
आता पीएस पश्चात मणिरत्नमला चश्मेबद्दूर चाचा केलं असण्याची ही दाट शक्यता आहे.

मायबोलीवर असा पॅटर्न आहे.
औपचारिक दुरावा दाखविण्यासाठी -

@स्वाती_आंबोळे

बोल्ड करून मग खाली पळून जायचं
तुमचे आभार.

@स्वाती ,
आभार तुमचे.

सगळ्यांचीच नावं बोल्डमधे लिहून धन्यवाद लांब नेऊन ठेवायचे.

स्वाती, आभार.

स्वाती, थॅंक्स. Happy आणि इमोजी.
-इमोजी आहे का काशिनाथ घाणेकर.

स्वातीताई, अप्रतिम. कसं सुचतं तुला हे.
सेमी - मांडीवर - तूच माझी आदर्श. भारावून दंडवत वगैरे असू शकतील.

थॅंक्स गं. Wink डोमा म्हणजे अजून जवळीक.
नाव नाही आणि लागोपाठ खाली पोस्ट द्यायची. थोडीफार अविचाराने गडबडीत सुद्धा.

स्वेच्छामरणाच्या माबोपद्धती. Lol

>> स्वातीताई, अप्रतिम. कसं सुचतं तुला हे.
सेमी - मांडीवर - तूच माझी आदर्श. भारावून दंडवत वगैरे असू शकतील.>> हा प्रकार फार भंपक वाटतो मला.

Pages