मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत इतिहास संशोधन मंडळाचे गजानन मेहेंदळे यांचं व्याख्यान >>> हे ऐकते आहे. धन्यवाद अमित! इन्टरेस्टिंग आहे.
मुस्लिम सुलतानांनी हिंदू देवळे, मूर्ती, स्त्रीया यांच्यावर अत्याचार केले याच्यावर काहीशी रंगसफेदी करण्याच्या>>>> आश्चर्य म्हणजे अशी रंगसफेदी काही हिंदू इतिहासकारांनीदेखिल केल्याचे म्हटले आहे.

हपा, अरे सही! कुठे बघितलीस? इथे २३ मार्च म्हणजे कालच होता अशी जाहिरात दिसते आहे.
तू टीव्हीवरच पाहिलीस का? कुठे आहे का उपलब्ध?
या कार्यक्रमातील इतर भाग बघतो. बरेच दिग्गज लोक आलेले दिसत आहेत. धन्यवाद!

Pages