मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युबवर नीना कुळकर्णी आणि तिची मुलगी सोहा कुळकर्णीची मुलाखत पाहिली थोडी. नीना कुळकर्णी त्या सोहाला बोलूच देत नाहीये. तिच्याबद्दल काही विचारलं तिला की हीच टेकओव्हर करतेय. जरा वैताग आला बघून.

मित्र म्हणे नावाच्या युट्यूब चॅनलवर एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बाईंची मुलाखत बघत होतो. त्यांचे अनुभव ऐकताना मिंटा मिंटाला पुणे ५२ सिनेमाची आठवण होत होती.

मित्र म्हणे बहुतेक हेच, राधा मंगेशकर ह्यांची मुलाखत पाहिली.
बरंच काही बोलल्या आहेत त्या.
वेदना जाणवली आवाजात

किल्ली तुम्हाला उद्देशून नाही.

अलिकडेच मी एका दिवाळी अंकात राधा मंगेशकर यांची मुलाखत वाचली. त्यातही वेगळा आवाज असल्याने (किंवा लता/आशाताईंसारखा आवाज नसल्याने) त्यांना फारसा स्कोप मिळाला नाही असं वाचलं. त्या सोलो ट्रॅव्हल करतात व त्याबद्दल लिहीतात असंही वाचलं.
विथ ड्यू रिस्पेक्ट टू हर युनिक व्हॉइस, टॅलेंट ऍंड पर्सनॅलिटी, कितीतरी अशा गायिका आहेत ज्यांना हा स्ट्रगल करावा लागला किंवा अजून करावा लागतो आहे. कितीतरी सोलो ट्रॅव्हलर्स आहेत. स्ट्रगल समजून घेण्यासाठी का होईना, राधा यांना ऐकले जातेय हा त्यांच्या फेमस आडनावाचा प्रिव्हीलेज नाहीये का? की हा व्हेल्ड अटेम्प्ट आहे प्रकाशझोत त्यांच्याकडे वळवण्याचा, मार्केटींगचा? मुलाखत घेण्यासारखं त्यांनी काही विशेष अचिव्ह केलंय का?
मला नीटसं सांगता येत नाहीये कदाचित. पण सीमा, रमेश व अजिंक्य असे ३ ऍक्टर्स घरात असून अभिनय देवचं नाव कधी ऐकलं नव्हतं. ‘देल्ही बेली’ डिरेक्ट केल्यावर ते फेमस झाले. ते जाहिरातक्षेत्रात ऑलरेडी यशस्वी आहेत हेही समजलं. तसं काही राधा यांच्या बाबतीत ऐकलं नसताना एकदम मुलाखती कशा येतात?

MazeMan, सहमत. राधा मंगेशकर यांचा आवाज अनेक वर्षांपूर्वी भावसरगम कार्यक्रमात ऐकला होता. लता मंगेशकर यांच्याशी तुलना सोडा, मुळात सूर आणि ताल यांच्यात गडबड वाटली. त्या मंगेशकर आहेत म्हणून निदान त्यांना कुणी स्टेज तरी दिलं. मित्र म्हणे वर त्यांची मुलाखत पाहिली आणि पुन्हा अनेक वर्षांनी त्यांची गाणी ऐकायचा प्रयत्न केला. फार काही सुधारणा आढळली नाही. आपल्या अपयशाचं खापर त्या लोकांवर फोडत आहेत असं वाटलं.

मी इतक्या वर्षांत त्यांचं गाणं ऐकलं नाही..
त्या म्हणतात social media म्हणजे खोटेपणा आहे.
पण प्रत्येक गोष्टीला बऱ्या वाईट बाजू असणारच ना.
मुळात एक सामान्य माणूस असल्यामुळे youtube किंवा तत्सम platforms वर जास्त गाणी ऐकली जातात. त्या तिथे पोचत नसतील तर कसं काय मत देणार?
पण त्यांच्या बोलण्यात खंत / वेदना जाणवली हे मात्र नक्की.
ते का आणि काय आहे माहिती नाही. Happy
https://youtu.be/dJSE6mgucFQ?si=bhs6ZQ_viXepi2U9

आता ही एक link सापडली. Comments मिश्र आहेत. मला वैयक्तिक मत बनवण्यासाठी आणखी ऐकावं लागेल. But it was not wow...

हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेला राधा मंगेशकर यांच्या मराठी गीतांचा अल्बम जेव्हा आला, तेव्हा आकाशवाणी मुंबईच्या एफेम गोल्ड वर राधाची मुलाखत झाली होती. गाणी वाजवली गेली.
मराठी सारेगम कारवाँ मध्येही ती सगळी गाणी आहेत.

त्यांनी लहानपणी गायलेलं आले रे गणपती आज दारी रे ( चाल - ना मानो गो तो दूंगी तोहे गारी रे) हे गाणं लताच्या " माझी आवडती गाणी" या चार कॅसेट्सच्या संचात आहे.

हम्म. सोशल मिडीआवर पेड लाईक्स मिळतात हे खरं आहे. पण टॅलेंटेड लोकांना जेन्युईन वाहवाही मिळतेच.
तुम्ही दिलेली लिंक ऐकली.
वर्षानुवर्षे एखादे गाणे जनमानसावर गारूड करून असेल तर इतर कोणी गायले की तुलना होणारच. लतादिदींची गाणी न गाता स्वतःची गाणी गायली तर कदाचित कंपॅरिझन कमी होईल.

माझेमन संपूर्ण पोस्ट पटली. मागे कधीतरी आदिनाथ मंगेशकरला सुद्धा एका कार्यक्रमात गाताना ऐकलं होतं. तो सुध्दा फार काही वाखणण्याजोगं गायला नव्हता. फक्तं ह्रदयनाथ मंगेशकरांचा सुपुत्र म्हणूनच लक्षात राहिला.

दुर्दैवाने त्यांच्या आडनावामुळे गाण्याची तुलना टाळता येणं शक्य नाही. जरी त्यांच्याकरता ते फेअर नसलं तरीही. त्यामुळे ते स्वतःचं वेगळं काही करत असतील तर ते त्यांनी डेव्हलप करावं. जसं राधा मंगेशकर रबिंद्रसंगीत करतात, बैजू मंगेशकर आर्टिस्ट आहेत तसंच काहीतरी.

तुलना वगैरे काही जरूरच नाही. राधा चक्क बेसूर गाते.
कसलीही तुलना न करता ते गाणं कंटाळवाणे, काहीही स्पार्क नसलेले, फिके वाटते. त्यात ती हृदयनाथ मंगेशकरांच्या शेजारी बसून गाताना त्यांनी त्या गाण्याची भलामण केली की तर शिसारीच येते. तुलना कोणी केली तर तो सर्वात मोठा बहुमान समजून झाकली मूठ गप्प बसावं.

अजब गजब चॅनेल वर हेमंत ढोमे ची मुलाखत मला आवडली छान सविस्तर सगळी प्रोसेस उलगडून सांगितली आहे सिनेमा नंतर थिएटर distribution आणि एकंदर फायनान्शियल प्रोसेस आपण (मराठी चित्रपट इंडस्ट्री ) कुठे कमी पडते किंवा कसे बदल व्हायला हवेत वगैरे. त्याचा आता बहुतेक एक स्वतः निर्मिती कि दिग्दर्शन ?केलेला सिनेमा आलाय (झिम्मा २ का ? मला अजिबात आठवत नाहीये )

मित्र म्हणे वर private डिटेक्टिव्ह बाईची मुलाखत ऐकली. पेंडिंग ठेवली होती ऐकायला, सलग ऐकावी म्हणून ती आज ऐकली.
त्यांनी सांगितलेल्या एका अनुभवा सारखाच एक अनुभव काही वर्षा पूर्वी एका काउन्सलर मॅडम च्या ब्लॉग किंवा अनुभव कथनातं वाचल्याच आठवलं. लाखात एक अशी केस असतें ती आपल्याच ऐकण्या वाचण्यात लाखात दोन अस वाटून पोटात गोळा आला उगाचच. Sad

मी ही पाहिली ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह मुलाखत. त्यांनी चेहरा दाखवला नाही पण मग नाव तरी का साङितलं असावं खरं?

नावासारखी नावं same खूप असतात त्यामुळे त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम येत नसणार, आणि anyway ते खरं नावं वापरून माहिती काढायला जात नसणार त्यामुळे case related लोकांना कळणार नाही पण चेहेरा दाखवला आणि तो अनेक जणांनी पाहिला तर त्यांच्या present आणि future targets (त्यांच्याच भाषेत )अलर्ट होतील असे असावा असं माझा आपला अंदाज

बिल्वा, तुम्ही कोणत्या अनुभवाबद्दल बोलत आहात ते लक्षात आलं. भयानक आहे ते!
मला ती मुलाखत बघताना ऐकताना सारखा प्रश्न पडत होता की ह्या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह लोकांकडे ह्या असल्याच केसेस येतात का? चोरीमारी, लुटालूट, पैशांची अफरातफर, जमिनी बळाकावणे, हपिसातलं राजकारण आणि त्यातून होणारे गुन्हे इत्यादी अनेक बाबतींत डिटेक्टिव्ह उपयोगी पडत असेल, पण ह्या बाई एकाच टाईपची उदाहरणं देत होत्या. मग त्या सौमित्रनेही तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्या म्हणाल्या की सध्या मॅग्झिमम केसेस ह्या असल्याच असतात.

हरचंद पालव, हो ती अक्खी मुलाखत पाहिली पण मी mention केलेला त्या बाईंचा अनुभव नुसता ऐकूनही माझ्या डोक्याचा पाठलाग सोडत नाहीये, तर त्या बाईंची काय अवस्था झाली असेल. Same असेच हदरले पण मी काही वर्षांपूर्वी त्या मानसोपाचार तज्ज्ञ मॅडम च्या अनुभव वाचताना अनुभवलं होत. पुन्हा आज तसंच Sad मला आठवत तसं त्या बाई मानसोपचार तज्ञ् असून स्वतः अतिशय disturbed झाल्या होत्या त्यांची ती case हॅन्डल करताना Sad हे बघून वाटत आपल्याच्यांनी नाही बा जमणार असलं प्रोफेशन. ज्याचं तेच करू जाणे

ती एक बाई, तिचा नवरा आणि त्यांचा एक मुलगा होता ती केस. ह्या डिटेक्टिव्ह बाई त्यांच्या घरात घुसल्या होत्या आणि रात्री अडकून सीताराम झाला बसल्या (ह्या केसमध्ये सीताराम म्हणवत पण नाहीये).

वरची पोस्ट वाचून ती बिना चेहऱ्याची मुलाखत पाहिली. मला ती अपूर्ण आणि एका पॉईंटला रटाळ वाटली. कदाचित ती बाई त्या विशिष्ट व्यवसायामुळे त्यापेक्षा जास्त काही स्पष्ट सांगू शकत नसेल, अशी मी समजूत करून घेतली. पण अशा प्रकारचे प्रोफेशन एवढ्या लहान वयात निवडून त्यात जम बसवणे येड्यागबाळ्याचे काम नाही हे मात्र खरं आहे.
शिला भट यांची मुलाखत पाहिली. ह्या पत्रकार बाईने हाजी मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम अशा तमाम डॉन मंडळींच्या त्या काळात मुलाखती घेतल्या होत्या.

अरे हो, ती केस विसरलेच. कठीण आहे एकूणातच.
ती डिटेक्टिव्ह त्या सौमित्र पोटेला सांगतेय एका क्लायंटबद्दल की तिच्या फिजिकल नीड्स होत्या आणि ह्याच्या डोक्यात काही प्रकाशच पडेना तिला काय म्हणायचं आहे हे. तेव्हा हसायलाच यायला लागलं.

मुलाखत पाहिली. घरात राहणाऱ्या माणसांच्या माहितीशिवाय घरात शिरणे पटले नाही. त्यांच्या सुरक्षिततेला हा धोका आहे.
समजलेली माहिती अशिलाला न सांगणे हेसुद्धा पटले नाही.

घरात शिरायला त्या घराच्या मालकानेच स्वतः किल्ली दिली असे त्या म्हणाल्या त्यामुळे त्याबद्दल काही वाटलं नाही. पण हो अशीला शी प्रामाणिक राहून माहिती द्यायला हवी होती असं वाटलं कारण त्याने अशील आणि कदाचित त्यांचा मुलगा या दोघांनाही त्या दुष्ट चक्रातून बाहेर पडायला मदत झाली असती. अर्थात हे आपलं मत झालं पण त्या वेळेला त्या बाईंचे केस चे शेवटचे दोन दिवस होते आणि त्यात त्यांना बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी केल, त्यात त्यांचा काही दृष्टिकोन असेल.

...क्लायंटबद्दल की तिच्या फिजिकल नीड्स होत्या आणि ह्याच्या डोक्यात काही प्रकाशच पडेना तिला काय म्हणायचं आहे हे. >> हो अगदी. डोक्याला हात लावला मी.

मी बिल्वा यांच्याशी सहमत. क्लायंटला सांगायला हवं होतं. कदाचित त्यांनी सांगितलंही असेल. मुलाखतीत सगळीच उत्तरं प्रामाणिक असतील याची काय खात्री?

सध्या प्राणप्रतिष्ठाबद्द्लच्या मुलाखती बघण्यात राहून गेली पण परवा दूरदर्शनवर कथा सईची मुलाखत पाह्यली. *कथा* सिनेमावर होती. फारच छान आहे जरूर बघा. परत एकदा निवांतपणे कथआज्ञ पहायचाय.

Pages