हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
इतक्यात ज्यूलिया लुई
इतक्यात ज्यूलिया लुई ड्रायफसचा ‘वाइजर दॅन मी’ हा पॉडकास्ट ऐकला. >>> ज्यूलिया भयंकर आवडते. तिची डेव्हिड लेटरमनसोबतची मुलाखतही आवडली. कुठे ऐकला ?
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या/
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या/ येऊ इच्छिणार्या हिंदूंना मदत करणार्या एका कार्यकर्त्याची मुलाखत वैभव सिंग यांनी घेतली होती. तिथल्या हिंदूंना इकडे आणण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात हे समजले. तो कार्यकर्ता बीजेपीचा असल्याने शेवटाकडे थोडी पक्षाची भुमिका, वैयक्तिक अस्पायरेशन्स वगैरेही दिसल्या. तरीही या विषयावर ऐकण्यासारखीच आहे.
स्मिता प्रकाश यांनी घेतलेली एक्स रॉ चिफ विक्रम सुद यांची मुलाखतही चांगली आहे.
रमणिक सिंग मान यांच्या पंजाबातील स्थितीवरच्या मुलाखतीही चांगल्या असतात.
अलिकडेच ‘आप की अदालत’मध्ये मनोज वाजपेयी आले होते. मुलाखत गार्डेड वाटली तरीही आवडली. आप की अदालतमध्ये कधीतरी तारिक फतेह आले होते. त्यांची सध्याच्या पाकिस्तानविषयीची मते स्फोटक होती. ती मुलाखत लक्षात आहे.
फरदून कॉंट्रॅक्टरने घेतलेली केकेची मुलाखतही आवडली होती.
रणवीर अलाहाबादियाचे अलीकडेच १/२ पॉडकास्ट पाहिले. ते आवडले. .
लिंक देता का आचार्य, किंवा
लिंक देता का आचार्य, किंवा दुसरा काही दुवा . >>>> नेहमी लिंक्ससहीतच देतो. पण एक तर लॅपटॉप नाही मदतीला. दुसरे म्हणजे या सर्व मुलाखती टीव्ही वर पाहिलेल्या. युट्यूबवर आहेत हे माहिती आहे. पण मोबाईलवरून सर्च देऊन इथे देण्यात सर्कस करावी लागेल. बघूयात नंतर.
https://www.youtube.com/
https://www.youtube.com/@O2india/videos या चॅनलवर 'रहमान म्युझिक शीट्स' अंतर्गत बर्याच मुलाखती चांगल्या आहेत.
https://www.youtube.com/@thekcraft या चॅनलवरच्या 'Classics' अंतर्गत मुलाखती सध्या पाहते आहे. थोड्याश्या जुन्या झालेल्या मालिकांबद्दल आहेत. त्यातल्या आभाळमाया, प्रपंच, अग्निहोत्र आणि गंगाधर टिपरे मालिकांचे एपिसोड्स विशेष आवडले. टिपरेंची लिंक देते आहे -
https://www.youtube.com/watch?v=yPbTs7uHFNE
मस्त धागा आहे..
मस्त धागा आहे..
हर्पेन ह्यांनी प्रतिसादात लिंक दिलेली इंदिरा गांधींची मुलाखत वाचली.
र. आचार्य तुम्ही बऱ्याच मुलाखतींच्या लिंक दिल्यात जमेल तेव्हा नक्की पाहीन...
अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी
अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी दोन हात कसे केले त्याबद्दलची ही मुलाखत. चांगली आहे असं कसं म्हणायचं? पण नक्की पहावी अशी आहे. मनमोकळेपणाने बोलले आहेत.
https://youtu.be/jEAnldW47bI
परचुरेच्या मुलाखतीबद्दलच
परचुरेच्या मुलाखतीबद्दलच लिहायला आले होते जीचा वावे यांनी वर उल्लेख केला आहे. अतुल परचुरे हा नेहमीच जमिनीवर पाय असणारा कलाकार राहिला आहे त्यामुळे मुलाखत चांगली आहे यात शंका नाही. दुसरी बाजू मधली अतुलची मुलाखतसुद्धा आवडली होती आणि तो अतिशय प्रॅक्टिकल तेव्हाही वाटला होता. मुलाखत घेणारा कोण आहे माहित नाही पण काही प्रश्न अनाठायी वाटले, जसे राज ठाकरे यांना सत्ता मिळाली तर ते बदल घडवून आणतील का. त्यापेक्षा अतुलला अजून काही लोकांना उपयोगी पडतील असे प्रश्न विचारले असते तर बरे झाले असते. अतुल यातून बाहेर आला आहे आणि परत काम करतोय ही आनंदाची गोष्ट आहे.
अजिबात कल्पना नव्हती याची. ते
अजिबात कल्पना नव्हती याची. ते बरे झाले हे चांगले झाले.
चंपा चांगली पोस्ट.
धन्यवाद वावे.
बहुतेक मराठी कलाकार मोकळेपणाने बोलतात असं लक्षात आलं आहे. गिरीश कुलकर्णी यांची दिल के करीब मधली मुलाखत बघितली, खूप आवडली. साधंसरळ व संयत व्यक्तिमत्त्व आहे. भाषाही अतिशय ओघवती व जास्तीत जास्त मराठीच बोलतात, कानाला छान वाटलं.
"अमुक तमुक" या नावाने
"अमुक तमुक" या नावाने यूट्यूब वर मुलाखती आहेत.. वेगळे विषय आहेत...छान आहेत सगळ्याच मुलाखती.. अनौपचारिक गप्पाच आहेत..जरूर बघा असे सुचवेन
वावे, चंपा व अस्मिता सहमत! तो
वावे, चंपा व अस्मिता सहमत! तो सौमित्र पोटे माझावर होता.
अवांतर: माझवर अमित भंडारी दिसत नाही कुठे
स्मृतीगंधवर अश्विनी भिडेची मुलाखत आवडली.
धन्यवाद अस्मिता. चांगल्या
धन्यवाद अस्मिता. चांगल्या मराठीवरून आठवलं, सुव्रत जोशी याची दिल के करीब मधली मुलाखत ऐकण्यासारखी आहे. कमीत कमी इंग्रजी शब्द, स्पष्ट आणि शुद्ध उच्चार आणि बुद्धिमत्तेची झाक दिसते. या आधी सुव्रत एवढा आवडत नव्हता आणि तो NSD चा आहे हेही माहित नव्हते. ही मुलाखत बघून मी फारच प्रभावीत झाले.
सुव्रत जोशी म्हणजे दिल दोस्ती
सुव्रत जोशी म्हणजे दिल दोस्ती दुनियादारीमधला ना? तो असेल तर तेव्हाच मला तो खूप आवडला होता त्याच्या मराठी उच्चारांकरता.
कालच function at() { [native
कालच function at() { [native code] }उल परचुरे यांची मुलाखत पाहीली. इथे लिहायला आले पण वरती लिहून झालेले आहे. खरच उत्तम मुलाखत खूप धैर्य व सकारात्मक वृत्ती.
दिल के करीब मध्ये स्वानंदी
दिल के करीब मध्ये स्वानंदी टिकेकर ची मुलाखत पाहिली. चांगली होती. आणि ती बरीच प्रगल्भ वाटते. छान बोलली आहे. एवढ्या मोठ्या कलाकारांची मुलगी असूनही जमिनीवर वाटली. ती अभिनय पण चांगलाच करते.
नोबेल परितोषिक विजेते
नोबेल परितोषिक विजेते Theoretical Physicist, प्रख्यात Richard Feynman यांची१९८३ मधली मुलाखत.
Jiggling Atoms पासून Fire, Electricity, Magnetism सारख्या गोष्टीबाबत त्यांच्याकडून ऐकणे हा खूप सुंदर अनुभव
The complete FUN TO IMAGINE with Richard Feynman
https://www.youtube.com/watch?v=P1ww1IXRfTA
अजिबात कल्पना नव्हती याची. ते
अजिबात कल्पना नव्हती याची. ते बरे झाले हे चांगले झाले. >> अनुमोदन.
दिल के करीब किती दिवसात पाहिलं नाही.
अश्विन चितळे (श्वास वाला)
अश्विन चितळे (श्वास वाला) त्याची पोटे ने घेतलेली मुलाखत उच्च आहे. किती छान बोलला आहे, फारच प्रगल्भ, मस्त मस्त. फारसी बद्दल बोलला आहे बरेच, त्यामुळं अजूनच जवळची वाटली आणि आमच्या Sadegh मास्तरचाच चेला (आमचा मास्तर जे सांगायचा फारसी क्लासमध्ये ते बरेच उल्लेख आले आहेत मुलाखती मध्ये).
नक्की पहा.
अभिनेत्री नूतनची दुर्मिळ
अभिनेत्री नूतनची दुर्मिळ मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=0nMpRKdBadk&t=314s
मला सुरेखा तळवलकर अजिबात
मला सुरेखा तळवलकर अजिबात आवडली नाही , कसले ते लाडे लाडे बोलणे, कुठल्याही विषयाचा गंध नाही , प्रश्नांना खोली नाही , समोर कोण बसला आहे याचे भान नाही , सुदैवाने गिरीश कुलकर्णीची मुलाखत पहिली , उत्तम बोलले ते पण हिचे तेच ते लाडे लाडे बोलणे . दिल के करीब फक्त येण्यारया काही विशिष्ट पाहुण्यामुळे बघते. विक्रम गोखले यांची दुसरी बाजू पण पहिलीए ते सतत दम देऊन समोरच्याला कसपट समजून बोलायचे. स्वतःची सिनिऑरिटी दाखवायचे हा पण शो केवळ येण्यारया काही विशिष्ट पाहुण्यामुळे बघितला. इंग्लिश मध्ये कारण जोहर चे कॉफी विथ कारण सीजन १,२,३, बरे होते , कारण जोहर जरा कंट्रोल मध्ये होता , आताचे सर्व सीजन कमरेखालचे विनोद आणि सेक्स लाइफ बद्दल.. हा शो पाहणे कधीच सोडले. सिम्मी गरेलवालने जयललिता ची घेतलेली मुलाखत उत्तम होती. जयललिता व्हेरी स्ट्रॉंग पेर्सोनालिटी. अनुपम खेर शो चांगला होता स्ट्रिक्टली नो मुवि प्रोमोशन त्यातील ऋषी कपूर ची मुलाखत छान होती.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=FM-E_iM0D0M - प्राणी आपल्याशी काय बोलतात.
मला खरे वाटले नाही. मेलेले प्राणी, जिवंत प्राणी सगळे बोलतायत.
अॅनिमल कम्युनिकेटर.
<<<मला सुरेखा तळवलकर अजिबात
<<<मला सुरेखा तळवलकर अजिबात आवडली नाही , कसले ते लाडे लाडे बोलणे, कुठल्याही विषयाचा गंध नाही , प्रश्नांना खोली नाही , समोर कोण बसला आहे याचे भान नाही , सुदैवाने गिरीश कुलकर्णीची मुलाखत पहिली , उत्तम बोलले ते पण हिचे तेच ते लाडे लाडे बोलणे . दिल के करीब फक्त येण्यारया काही विशिष्ट पाहुण्यामुळे बघते>>>>
मला वाटलेले की मी एकटीच या मताची आहे.. तिचे मुलाखत घेताना सतत केसांशी खेळणे फारच वैतागवाणे वाटते.
लंपन, हो फार मस्त आहे ती
लंपन, हो फार मस्त आहे ती मुलाखत. एकदम मनमोकळं बोललेत.
बादवे बेसिक पर्शियन मी त्यांच्यैकडूनच शिकले. फार मस्त अनुभव होता
लोल इंद्रा, माझंही सुलेखा
लोल इंद्रा, माझंही सुलेखा तळवलकरबद्दल १००% हेच मत आहे. गिरिश कुलकर्णीची मुल॑खत मस्त होती.
मला दुसरी बाजू मध्ये विक्रम गोखले अजिबात आवडले नाहीत. भयंकर बोअर आहेत. अग्निहोत्र बघायला लागल्यापासून ते पार नावडतेच झाले आहेत.
मी ही इथेच वाचून सुत ने आका
मी ही इथेच वाचून सुत ने आका ची घेतलेली मुलाखत पहायचा प्रयत्न केला होता. पण दोघेही विशेष वाटले नाहीत.
अवलजी मस्तच. चितळे कडून शिकला
अवलजी मस्तच. चितळे कडून शिकला की sadegh कडून? मी डेक्कन कॉलेजला जात असे विकेंड ब्याच. सिंधी आणि मुस्लिम पबलिक् जास्त.
तळवलकर मध्येच एकदम शून्यात जाते आणि तिला प्रश्नच सुचत नाही मग काहीही पडेल विचारते:)
अश्विन चितळे कडून शिकले
अश्विन चितळे कडून शिकले
अरण्यऋषी' श्री. मारुती
अरण्यऋषी' श्री. मारुती चितमपल्ली : https://www.youtube.com/watch?v=gS4bKJ-OWZ4
श्री. मारुती चितमपल्ली यांची मुलाखत पाच भागात आहे. चितमपल्ली खरंच ऋषी आहेत. त्यांचे अनुभव ऐकताना अगदी गुंगून जायला होतं.
ही मुलाखत बघतानाच त्यांच्या गोष्टींचा व्हिडिओही सजेस्ट झाला. हातासरशी त्याचीही लिंक देऊन टाकते इथे.
चंद्रमाधवीच्या देशात ! मारुती चितमपल्ली (अद्भुत कथा) : https://www.youtube.com/watch?v=7LIRxw40mi4
Lallantop, ANI Podcast,
Lallantop, ANI Podcast, सायकॉलॉजि संडे, अमुक तमुक या यु टूब चॅनेल वरील मुलाखती मी पाहतो. छान असतात.
बाईपण भारी देवा सिनेमा
'बाईपण भारी देवा' सिनेमा आल्यापासून सुलेखा तळवलकरच्या 'दिलके करीब' वरील शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी - मोने व रोहिणी हट्टंगडी ह्यांच्या मुलाखतींचे व्युव्स अचानक कित्येक हजारांनी वाढले (वाढत) आहेत.
मामी - मारुती चितमपल्ली
मामी - मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीबद्दल +1. प्रदीर्घ मुलाखत आहे, पण अजिबात कंटाळा येत नाही. किती समृद्ध जीवन जगतात काही माणसं! वयाच्या 92 व्या वर्षी इतकं कार्यरत असणं किती कमाल आहे!
Pages