हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
सईची मुलाखत नाही बघितली पण
सईची मुलाखत नाही बघितली पण गौतम जोगळेकरची मुलाखत बघितली आहे दिल के करीबमध्ये. तोही छान बोलला आहे मोकळेपणाने, त्याच्या आणि त्याच्या आईच्या नात्याबद्द्लही स्पष्ट बोलला आहे, कुठेही खोटेपणा किंवा सगळं कसं छान आहे हे दाखवण्याचा अट्टाहास नाही. मला तो आधी फुटकळ नट वाटायचा पण ही मुलाखत बघितल्यापासून आदर फार वाढला आहे त्याच्याबद्दल. फार साधा आणि खरा वाटला. पक पक पकाक त्याने दिग्दर्शीत केला आहे हे माहिती नव्हतं. त्याची बहीण विनी आता काम करत नाही का.
सईची मुलाखती फारच छान.
सईच्या मुलाखती फारच छान.
गिरिजा ओकची लल्लन टॉपवरची मुलाखतही आवडली. ती गाते, शिकते, डान्स या बद्दल माहिती नव्हतं. अन एकदम साधी सरळ छान मनमोकळं बोललीय. जरूर पहा
त्यांची दुसरी बाजु मधली पण
त्यांची दुसरी बाजु मधली पण फार सुंदर मुलाखत आहे.
सईचं पुस्तक वाचलं असेल, तर
सईचं पुस्तक वाचलं असेल, तरी मुलाखतीतून काही नवीन मिळणार आहे का? तर बघेन म्हणतो.
दुसरी बाजूमध्ये मुलाखतकार
दुसरी बाजूमध्ये मुलाखतकार विक्रम गोखलेंना सहन करावं लागेल त्याचं काय?
सई परांजपेची मुलाखत कुमार
सई परांजपेची मुलाखत कुमार सरांच्या धाग्यावर चर्चा झाली तेव्हा बघितली होती बहुतेक. नक्की आठवत नाहीये. सह्याद्रीच्या मुलाखतीत एका नॉस्टॅल्जिक संथ जीवनाचा आपलेपणा असतो. शोभना समर्थची मुलाखतही अशीच वाटली होती. एकदम साधीसरळ.
मागच्या आठवड्यात सोनु निगमची बिअर बायसेप्सवरील मुलाखत व आदिल हुसैन यांची स्मिता प्रकाशने घेतलेली मुलाखत बघितली.
सोनू एकेकाळी किती आवडायचा, फार मस्त बोलला आहे तो. गाणीही गायली आहेत. अफाट रेन्ज आहे या माणसाची. परदेसचं ये दिल, अभि मुझमें कहीं, तेरे बिन, साथिया व इंडी पॉपचा उदयावेळीचे तू कब ये जानेगी , बिजुरीया वगैरेचा प्रवास मनमोकळेपणाने सांगितला आहे. स्वतःच्या आयुष्यातले चढउतारही अलिप्त राहून सांगितले आहेत. भन्नाट माणूस आहे.
Sonu Nigam - Personal Life, Spirituality & Industry’s Darkest Secrets | The Ranveer Show हिंदी
आदिल हुसैन बद्दल मला काहीही माहिती नव्हती. हे फीडमधे आले व लागले. हा फारच जबरदस्त माणूस आहे. बहुश्रुत,आध्यात्मिक व परिपक्व वाटला. NSD चा विद्यार्थी ते आता प्रशिक्षक , हिंदी मेडिओकर सिनेमांतल्या त्रुटी , परदेशी सिनेमांतली देहबोली, त्याचे थेटर व सिनेमातले वेगवेगळे अनुभव, गुवाहाटीतलं बालपण, इंग्लिशविंग्लिश व समानता, लाईफ ऑफ़ पाय, ते अगदी गुड न्यूज पर्यंत गप्पा मारल्या आहेत. अतिशय प्रगल्भ माणसाचं बोलणं आणि निर्मितीप्रक्रियेवरची मतं ऐकायची असतील तर जरूर बघा. या मुलाखतीने मी फार प्रभावित झाले आहे, असं फार क्वचित होतं..!
Exploring the Connection Between Spirituality and Cinema with Adil Hussain
धागा छान चालू आहे..
धागा छान चालू आहे..
बघतोय एकेक..
दुसरी बाजूमध्ये मुलाखतकार
दुसरी बाजूमध्ये मुलाखतकार विक्रम गोखलेंना सहन करावं लागेल त्याचं काय? >>>
त्यामुळेच मला अजुन एकदा ऐकायची होती तरी ऐकली नाही. गोखले उत्कृष्ट कलाकार होते, माहितीचा खजिना होते पण दुर्दैवाने दुसरी बाजुमधे रसभंग व्हायचा.
भरत, त्यांना बोलताना ऐकणे हाच अनुभव घ्यायचा आहे. ऐकतच रहावे असे वाटले होते मला.
अस्मिता, वरच्या दोन्ही छान वाटताहेत.
गोखले उत्कृष्ट कलाकार होते,
गोखले उत्कृष्ट कलाकार होते, माहितीचा खजिना होते पण दुर्दैवाने दुसरी बाजुमधे रसभंग व्हायचा. >>
गोखले उत्कृष्ट कलाकार होते, पण त्यांची दुसरी बाजू कंटाळवाणी होती
सई परांजप्यांच्या मुलाखतीचा
सई परांजप्यांच्या मुलाखतीचा पहिला भाग बघितला. छान वाटलं बघून. खरंच किती उत्साहाने आणि मोकळेपणाने बोलल्या आहेत! 'सय' वाचलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी माहिती होतं पण प्रत्यक्ष ऐकायला जास्त छान वाटलं.
'येथे रँग्लर परांजपे रहात होते' अशा अर्थाचा तो नीलफलक एकदा तिथून सहज चालत जाताना दिसला होता तेव्हा एकदम भारी वाटल्याचं आठवतंय.
माफ करा. मी पुर्ण चुकीची
माफ करा. मी पुर्ण चुकीचे लिहिले आहे वर. दुसरी बाजुमधे सई परांजपेंची मुलाखत नाही. माझ्या डोक्यात विजया मेहतांचे नाव होते. (मी कपाळावर हात मारुन घेतला आहे व तुमचा तेच करण्यापासुनचा वेळ वाचवला आहे).
हे उगाच अवांतर
हे उगाच अवांतर
एखाद्या कलाकाराची व्यक्ती म्हणून बोलायची विशिष्ट ढब असेल आणि ते बोलणं पुरेसा वेळ ऐकलं असेल तर त्यांचं लेखन वाचताना मला ते त्या कलाकाराच्या आवाजात ऐकू येतं. उदा : शिरीष पै आणि पाडगावकरांच्या कविता. तसंच सईची विविधभारतीवरची विशेष गीतगंगा दोनतीन वेळा ऐकली होती. त्यातून त्यांचे स्पष्ट स्वच्छ उच्चार, मिश्कील विनोदाच्या जागेआधी येणारा हलकासा (विक्रम गोखलेंसारखा नव्हे ) पॉझ (तो विनोद प्रेक्षकांच्या डोक्यात हॅमर करायची नसलेली गरज) हे सगळं मनात ठसलं आहे. त्यामुळे सय हे पुस्तक माझ्या मनात त्यांच्या आवाजातच वाजलं.
विजया मेहतांच्या मुलाखतीही ऐकल्या आहेत. झिम्मा त्यांच्या आवाजात वाजतं का ते बघायला हवं.
आणखी अवांतर - त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करता करता ते एक स्वतंत्र पुस्तकच झालं. मराठी पुस्तकात नसलेला काही भाग त्यात आला आहे. त्यामुळे तेही वाचणं क्रमप्राप्त आहे. बघू कधी जमतं.
आणखी अवांतर - रेको - शकुंतला परांजपेंचं काही आंबट काही गोड. त्यांचीही मुलाखत दूरदर्शनने घेतली होती.
सईचं सह्याद्रीवरचं हृद्गत फुरसतीत ऐकेन.
>>> विजया मेहतांच्या
>>> विजया मेहतांच्या मुलाखतीही ऐकल्या आहेत. झिम्मा त्यांच्या आवाजात वाजतं का
हो!!!
त्यांचं लेखन वाचताना मला ते
त्यांचं लेखन वाचताना मला ते त्या कलाकाराच्या आवाजात ऐकू येतं. >> सेम हिअर ! उपहास पण ऐकू येतो आणि त्या शब्दाला काय हावभाव असतील ते ही दिसतात.
अमुक तमुक चॅनेल वरची चिन्मय
अमुक तमुक चॅनेल वरची चिन्मय दामले (बहुधा माबोकर चिनूक्स?) यांची मुलाखत पाहिली. अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.
एखाद्या कलाकाराची व्यक्ती
एखाद्या कलाकाराची व्यक्ती म्हणून बोलायची विशिष्ट ढब असेल आणि ते बोलणं पुरेसा वेळ ऐकलं असेल तर त्यांचं लेखन वाचताना मला ते त्या कलाकाराच्या आवाजात ऐकू येतं. >>>
सेम!!
'सय', 'झिम्मा', 'माझे रंगप्रयोग' (रत्नाकर मतकरी) तीनही पुस्तकं वाचताना मला अशी ऐकू आली होती.
सई परांजप्यांच्या मुलाखतीचे
सई परांजप्यांच्या मुलाखतीचे पाचही भाग पाहिले. मस्त बोलल्या आहेत त्या. पण अर्धवट वाटली. अजून भाग असले पाहिजेत असं वाटलं. जेमतेम टेलिव्हिजनच्या सुरुवातीपर्यंत पोचलं आहे.
अमुक तमुक चॅनेल वरची चिन्मय
अमुक तमुक चॅनेल वरची चिन्मय दामले (बहुधा माबोकर चिनूक्स?) यांची मुलाखत पाहिली. अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण आहे. >>>> फारच रोचक आहे. अजून भाग हवेत..
बंदे मे है दम… | Mahamulakhat
बंदे मे है दम… | Mahamulakhat | Sameer Wankhede | Dinesh Kanji | Interview | IRS | NIA | : https://www.youtube.com/watch?v=lfkoZ6SxKVE
अलीकडेच प्रसारित झालेली
अलीकडेच प्रसारित झालेली गीतांजली कुलकर्णी यांची दिल के करीब मधली मुलाखत पहिली, माझी आवडती अभिनत्री आहे. मुलाखत पण सुंदर होती. दिलखुलास आणि मनमोकळे पणी छान बोलल्या आहेत.
अमुक तमुक चा भाग छान
अमुक तमुक चा भाग छान माहितीपूर्ण आहे. आवडला तो भाग. दोन्ही होस्ट मात्र गंडलेले वाटले त्यातला एक तर कंड सुटल्यागत पूर्ण एपिसोड अंग खाजवत बोलत होता अतिशय घाण आणि किळसवाणा प्रकार.
गीतांजली कुलकर्णीचा भाग ओके ओके वाटला. तिचा गुल्लक आणि कोर्ट एवढच माहीत आहे. पिया बहुरूपीया बहुदा बंद झालंय आता. पैकी कोर्ट मध्ये तिच्यापेक्षा त्या विवेकचे काम उजवे वाटले. आणि गुल्लक मध्ये सगळ्यांची कामे छान आहेत. एन एस डी असून फार काही काम केल्याचे कळले नाही मुलाखतीतून.
अमुत तमुकचा होस्ट कोण आहे?
अमुत तमुकचा होस्ट कोण आहे? चिनूक्स एपिसोडमधला निळा शर्टवाला अगदीच येडचाप आहे. कसा हसत रहातो!!!
(मेघनाची पोस्ट वाचून)
(मेघनाची पोस्ट वाचून)
अमुकतमुकवरची चिन्मय दामले यांची मुलाखत बघितली ,आवडली. त्यांनी पाककृती, रेस्टॉरंट्स आणि लोकांनी बाहेरच्या भोजनगृहात खाण्याची सुरवात व एकंदरीत प्रवास, जातीनिहाय भोजनगृह, शाहुमहाराज यांचे योगदान, इराणी हॉटेल आणि बेकरींची सुरवात, मिसळ- पावभाजी ई पदार्थ व त्यांच्या पाककृतींचा इतिहास, सगळ्याच रेसिपीज अनऑथेन्टिक कशा असतात, लक्ष्मी वैद्य( सूपशास्त्र ?) यांच्या पुस्तकातील पाककृती, आगरकर व अनेक थोर व्हिजनरी यांचा पुढाकार अशा अनेक विषयांवर अतिशय प्रसन्नपणे व रंजक पद्धतीने सचित्र माहिती दिली आहे. सुरेख, सुस्पष्ट व मृदू भाषेत कुठलाही अभिनिवेश न बाळगता चर्चा केली आहे.
'सूपशास्त्र' या पुस्तकावरील परिचय इथं सई केसकरने लिहिला आहे हे मुलाखत बघताना आठवलं. शिवाय चिनूक्स यांचीच 'अन्नै वै प्राणाः' ही लेखमालिकाही आठवली.
दोन्ही होस्ट मात्र गंडलेले
दोन्ही होस्ट मात्र गंडलेले वाटले त्यातला एक तर कंड सुटल्यागत पूर्ण एपिसोड अंग खाजवत बोलत होता अतिशय घाण आणि किळसवाणा प्रकार.
महेश भट आठवला.
>>>
चिनूक्सचीच का दुसरी कुठली ?
एपिसोडमधला निळा शर्टवाला अगदीच येडचाप आहे. कसा हसत रहातो!!!
+१ त्याचे उच्चार स्पष्ट नाहीत, अधनंमधनं कळत नव्हतं. दोन होस्ट काय करायचे आहेत, एक पुरे की. तो साध्या साध्या गोष्टींवर खूप हसत होता, त्याने लिंक तुटत होती. मिसळवर गुलाबजाम चुरून खाऊ म्हणे !
बरेचसे होस्ट आत्मविश्वासू/कूल दिसण्याच्या नादात फार अनप्रिपेअर्ड- कॅज्युअल वाटतात, गेस्टना बोलतं करण्याएवढं बोलावं तर ऑकवर्ड -फिलर काही तरी बोलतात, उगाच हसतात, गॅसलाईट करतात, फारच जवळ बसतात (हळूहळू मांडीवर बसतील असं दिसतं), टू फ्रेंडली किंवा त्रयस्थ भाव आणतात. त्यांना within means रहाता येत नाही.
अॅडगुरू सांगताहेत, वर्गीस
अॅडगुरू सांगताहेत, वर्गीस कुरियन ते गौतम अदानी…| Bharat Dabholkar | Dinesh Kanji | Interview | Amul : https://www.youtube.com/watch?v=0a4pxr1TSF8
दिलखुलास मुलाखत. भरत दाभोळकरांसारख्या अवलिया, हरहुन्नरी माणसाची मुलाखत म्हटल्यावर रोचक असणारच. मस्त किस्से सांगितले आहेत.
काही दिवसांपूर्वी सखी
काही दिवसांपूर्वी सखी सह्याद्रीमध्ये बघितलेली डॉ निरूपमा देशपांडे यांची मुलाखत फार छान होती. त्यांनी मेळघाटातील आदिवासी लोकांसाठी प्रचंड काम केले आहे.
https://youtu.be/ADJz8SPG5ks?si=YVdJhL3OYC3jGDGm
ग-गप्पांचा : भाग 14 https:/
ग-गप्पांचा : भाग 14 https://www.youtube.com/watch?v=Y47AHvLt13s
केदार शिंदे यांची मुलाखत आवडली. ते शाहीर साबळे यांचे नातू आहेत हे समजले.
‘ टीआरपी मशीन’ या प्रकाराबद्दल त्यांनी कुतूहल व्यक्त केलेय. त्यांनी स्वतःही ते अजून पाहिलेले नाही आणि श्रोतृवर्गापैकी ते कोणी पाहिले आहे का, असे त्यांनी विचारले !
आज बंगळुरात 'स्वयं टॉक्स'
आज बंगळुरात 'स्वयं टॉक्स' नावाचा मुलाखतींचा कार्यक्रम झाला. डॉ. उदय निरगुडकर मुलाखती घेतात. ज्यांची मुलाखत घेतली ते चौघे - प्रशांत गाडे (यांनी कृत्रिम, रोबोटिक हात-पाय स्वस्तात तयार करून कित्येकांना मोफत बसवून दिले आहेत. इंजि. ड्रॉपआऊट.)
किरण पुरंदरे- पक्षीनिरीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेतच, पण गेली काही वर्षे पत्नी अनघाताईंसह नागझिऱ्यात राहून तिथल्या आदिवासींसाठी अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत.
सारंग साठ्ये - भाडिपा. डिजिटल माध्यमात काम करणारा आणि यशस्वी झालेला. हाही सुप्रसिद्ध आहेच.
अनुराधा प्रभुदेसाई- वीसेक वर्षांपूर्वी पर्यटक म्हणून कारगिलला गेल्या असताना त्यांना जाणीव झाली की सैनिकांबद्दल समाजात म्हणावी तशी कृतज्ञता नाही. त्यानंतर त्यांनी सैनिकांसाठी खूप काम केलं आहे.
कार्यक्रम चांगला झाला. पण चार जणांच्या मुलाखती जरा जास्त होतात. दोन किंवा तीन जणांच्याच घेतल्या तर जरा जास्त खोलात जाता आलं असतं. सुरुवातीला (किका सोडून इतर तिघांनी) प्रेझेंटेशन केली त्याऐवजी त्यांच्या कामासंबंधित छोटा व्हिडिओ दाखवून उरलेलं सगळं मुलाखतीतून आलं असतं तर बरं झालं असतं.
वायफळ चॅनलवर संकर्षण कर्
वायफळ चॅनलवर संकर्षण कर्हाडेची मुलाखत कम गप्पा आहेत. मोठा २ तासाचा आहे भाग पण छान बोललाय संकर्षण. एकदम डाऊन टू अर्थ आहे.
हो चांगली आहे मुलाखत.
हो चांगली आहे मुलाखत.
Pages