मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाद संजीवनी म्हणून त्या भेलांडे बाई मुलाखत घ्यायच्या. मुलाखत घेताना एक डायटिशियन कम शेफ बाई बिना तेलाचे तुपाचे, साखर गुळ नसलेले (पर्यायी गोष्ट जसे की खारीक खजूर) अशक्य बेक्कार / हेल्थी (?) पदार्थ बनवते आणि ते आलेले गेस्ट गप्पा मारत पाण्याच्या घोटाशी ते गिळतात. आणि सगळे चांगले गेस्ट आहेत अगदी उषा मंगेशकर, श्रीधर फडके, फेणाणी जोगळेकर, सुषमा श्रेष्ठ, साधना सरगम ई..तेल म्हणजे फोडणीला पण नाही तशीच मोहरी परतायची Proud ते गेस्ट अगदी कसनुस तोंड करून जे काही बनवले आहे ते गिळतात. आणि भरीस भर भेलांडे बाईंचा ladikpana आणि हातवारे, कधी गिरकी घेईल आणि खाली पडेल इतके हात हलवत बोलते.

बिना तेलाचे तुपाचे, साखर गुळ नसलेले (पर्यायी गोष्ट जसे की खारीक खजूर) अशक्य बेक्कार >>> Happy मला आधी वाटले ही सगळी त्यांच्या बोलण्याबद्दलची विशेषणे आहेत Happy

जनरल अमेरिकन टॉक शोज मधे येणारे थोर लोक आपण फार ग्रेट आहोत असा आविर्भाव दाखवत नाहीत. त्यांच्या स्थानाची त्यांना कल्पना असते पण ते शो ऑफ करत नाहीत. उलट सेल्फ-डेप्रकेटिंग विनोद खूप करतात.

लंपन Rofl हो तो कार्यक्रम म हा न होता. आलेल्या पाहुण्यांचा अपमान होता तो. अनवट स्वाद आणि रुचिरा असेच महान कार्यक्रम आहेत ज्यात त्या नवशिक्या पोरांना सारखं काहीतरी बोलत राहायची सूचना असते आणि मग ते काहीही बरळत राहतात. त्यातले काही सूत्रसंचालक डोक्यात जातात. परी तेलंग बरी आहे. परत परत तेच भाग दाखवतात.
सह्याद्रीवर दुसरी बाजूचं हिंदी व्हर्जन कोशिश से कामयाबी तक चांगलं असतं. सीजन एक किरण जुनेजा करायची आणि दुसरा सीजन झरीना वहाब करते. जुही चावला, तुषार कपूर, राजकुमार राव, अर्चना पुरनसिंग, गुलशन ग्रोवर, सुधांशु पांडे यांच्या मुलाखती आवडल्या होत्या.

ललिता प्रीती, ते मी 'अमुक्त मूक' असं वाचलं.
लंपन Lol
मारूती चितमपल्ली यांची बघणार आहे.
'कोशिश से कामयाबी तक'मलाही आवडलं. साधेपणा होता कार्यक्रमात.>>> +१ त्यातली दिया मिर्झाची मुलाखत बघितली होती, आवडली होती. मला दूरदर्शनवरचा काही तरी जुना कार्यक्रम बघितल्याचा फील आला.
----
या आठवड्यात एलेन व जॉर्ज क्लूनीच्या मुलाखती डेव्हिड लेटरमनच्या नेटफ्लिक्सवरील My Next Guest Needs No Introduction with David Letterman या शो मध्ये बघितल्या दोन्ही आवडल्या. क्लूनीची जास्त आवडली.

शिवाय ओबामा आणि हसन मिनाज यांच्या गप्पा बघितल्या, ही मुलाखत म्हणजे नुसत्या गप्पा वाटल्या. हे दोघेही फारच वाक्चतुर आहेत. यातल्या थंबनेल मधल्या हसनचा हातवारा बघून कुणाकुणाला शत्रूजीचे 'खामोश' आठवेल. Wink
https://youtu.be/jAYVKZSWXhY

ही एक बिल गेट्सची The daily Show मधली जुनी क्लिप आहे. फारच चावट आणि धमाल आहे. विकसनशील देशात विष्ठेपासून शुद्ध पाणी तयार करणे व ते पिऊन दाखवणे.
https://youtu.be/v5pW_Mqt6dU

किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग – १) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर. : https://www.youtube.com/watch?v=oZoWNcGNUtU

काय मस्त मस्त माहिती आहे. मायबोलीकरांमुळे अनेक गडकिल्ल्यांची ओळख झाली आहेच. त्याच गडकिल्ल्यांची अजून वेगळी ओळख मिळेल या मुलाखतीत.

मोनोलॉग प्रमाणे प्रत्येक जण मुलाखती टाकून जातोय. धाग्याच्या नावाला जागून त्या मुलाखती कशा वाटल्या हे कुणी लिहीणार का ?
पहिल्या पानावरच्या बर्‍याच मुलाखतींचे विषय आवडले.
सिनेक्षेत्रातल्या फुटकळ कलाकारांच्या तितक्याच फुटकळ युट्यूबरने घेतलेल्या मुलाखती नाही आवडल्या.
सेलेब्रिटींपेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखती आवडतात. क्वचित सेलेब्रिटींच्या ठीक वाटतात.
प्रत्येक गोष्टीत योग्य व्यक्तीपेक्षा सेलेब्रिटींच्या मतांचं स्तोम माजवणे बरं वाटत नाही.

वंदना शाह या डिवोर्स लॉयर आहेत. मुलाखत तूनळीवर बघितली. अति श्रीमंत लोकांच्या केसेस त्या हाताळतात त्यामुळे आपण रिलेट करू शकत नाही पण नवीन माहिती मिळते, नवीन संज्ञा समजतात. मुलाखत चांगली वाटली.

किल्ल्यांच्या अद्भुत आणि अनोळखी गोष्टी (भाग – २) | ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर : https://www.youtube.com/watch?v=zjksP2vbPT0

वर पहिल्या भागाची लिंक दिली आहेच. हा दुसरा भागही आता प्रकाशित झाला आहे. मस्त, रोचक आणि माहितीपूर्ण मुलाखत आहे.

युट्युबवर अमुक तमुक चॅनल ला सबस्क्राईब केलंय. त्यावर विबासं आणि लग्नसंस्था पॉडकास्ट (?) चालू होतं.
तो मुलाखत घेणारा ओंकार एकदम मधेच कुठेही बिनडोकासारखा खिदळत होता, भयंकर उथळ कॉमेंट्स, जाम वैताग आला त्या माणसाचा. एकतर त्याचं ते मांडी घालून पाय दाखवत बसणं बॅन करायला हवं.
डॉ. शिरीशा शाह त्या शिंदे वकीलीण बाईंना बोलूच देत नव्हत्या बर्‍याचदा. मलाच खूप काही माहित आहे असा एकदम आर्विभाव, फार सुमार मुलाखत वाटली.

डॉ. शिरीशा शाह त्या शिंदे वकीलीण बाईंना बोलूच देत नव्हत्या बर्‍याचदा. >> अगदी अगदी. त्या बोलायला लागल्या की त्यांना अडवून स्वतःचे बोलणे चालूच. होस्टने त्यांना थांबवून वकिलीण बाईंनापण बोलायची संधी द्यायला हवी होती.

होस्टने त्यांना थांबवून वकिलीण बाईंनापण बोलायची संधी द्यायला हवी होती.>>>>>>>>++११ तो होस्टच गंडलेला आहे त्यामुळे दोघींना वेगळे प्रश्न विचारावे म्हणजे दोघींना बोलता येईल असं काही केलं नाही त्याने. मुलाखत घेणार्‍याला सुद्धा विषयाची थोडीतरी जाण, प्रगल्भता असणे जरूरीचे आहे.

अंजली_१२ on 5 September, 2023 - 17:14>>+१
होय ते अमुक तमुक मीही केलंय subscribe पण मलाही तुम्ही लिहिलंय ते नाही आवडलं त्या मुलाखतीतलं.
समोर माणूस असा बसला तर काही वाटत नाही एकवेळ, पण कॅमेरातून ते नाही आवडत आहे बघायला Sad

तो मुलाखत घेणारा ओंकार एकदम मधेच कुठेही बिनडोकासारखा खिदळत होता >> हो. मी ही मुलाखत नाही बघितली, पण इतर मुलाखतीतही तो असाच करतो. ज्यांच्याविषयी चर्चा चालू आहे, तिथे असं विचित्र हसल्यास, त्या लोकांकरिता ते खूप अपमानकारक वाटतं. शिवाय त्याचा प्रश्न विचारतानाच आविर्भाव पण स्वतःला खूप काही माहिती आहे आणि ते माहीत नसलेले कसे येडे अश्या प्रकारचा असतो. उदा. कुठल्यातरी मुलाखतीत तो त्याच्या एका मित्राला मुलींबद्दल काही गोष्टी कश्या माहीतच नव्हत्या ते सांगून हसत सुटला होता. त्या कार्यक्रमाचा उद्देशच अश्या गोष्टींबाबत जागरुकता वाढवणे हा (स्तुत्य) आहे. तिथे तुम्ही त्या लोकांना जागरुक करायचं सोडून त्यांचीच लायकी काढणार असाल तर हा कार्यक्रम वायाच गेला म्हणायचा.

कथा सईची म्हणून सई परांजपेंची मुलाखत आहे , मस्त आहेत तीन भाग. चौथा भाग बहुदा उद्या येणार आहे. सह्याद्री वर घेतली आहे, युट्यूब वर सध्या तीन भाग आलेत. फारच सुंदर बोलल्या आहेत. प्रश्न उत्तर फॉरमॅट नाही, फक्त त्या बोलत आहेत सलग. नक्की बघण्या ऐकण्या सारखी आहे.

अमुक तमुकच्या मुलाखती फेसबुक फीडमध्ये दिसल्या . तो अँकर मंचावर सोफ्यावर धड मांडी नाही, धड पाय खाली सोडले नाहीत असा बसतो. आणि आपण हातवारे करू तिथे सगळं अंग हलवतो.

हा मासला
https://fb.watch/o6QclWGwSD/

अरे वा आवडली ना स्वाती, मस्तच झालेत तिन्ही भाग. चौथा भाग येईल आता. त्या ८०+ आहेत आणि कधी एकदम डोळा मारून, कधी मिश्किल हसून एकदम गोड बोलल्या आहेत. अजिबात कुठेही कटुता नाही.

कथा सईची म्हणून सई परांजपेंची मुलाखत आहे ,> काल पहिला भाग बघितला. खूप छान आहे.
सह्याद्री दुरदर्शनचे साधेपण अजून टिकून आहे बघून छान वाटलं. त्यांच्या दगडी घरासमोरच त्या बोलत आहेत, एक घरगुती फिल येत होता.
हल्लीचा मुलाखतींमधला भपका, महागडे कोच, फुलं सजावटी काही नसल्याने फार नॅचरल साधंसुधं बरं वाटलं खूप दिवसांनी.
त्यांची आई पण किती ग्रेट बाई!

सई परांजपेंच्या मुलाखतींचे सगळे एपिसोड्स पाहिले. काय मस्त आहे. कसलं बुद्धिमान घराणं आहे त्यांचं आणि कुठेही बडेजाव, मिजास नाही बोलण्यात.

Pages