हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
छन्दिफन्दि, मी माशेलकरांचे ९,
छन्दिफन्दि, मी माशेलकरांचे ९, ८ आणि ६ वर्षांपूर्वीचे व्याख्यान आणि आत्ताची मुलाखत - पाहिले. काही फरक नाही.
नासिरची मुलाखत फारच आवडली.
नासिरची मुलाखत फारच आवडली.
मुलाखत घेणारा ही आवडला. जेन्युअन वाटत होता. बरेच लोक भारावण्याचं कम्पल्शन असल्यासारखे वागतात तसा नाही वाटला मला. याच्या आणखी मुलाखती बघितल्या पाहिजेत.
अमित, फार छान वाटले वाचून.
अमित, फार छान वाटले वाचून.
हो, मीही ह्या चॅनलवरची बघितलेली पहिलीच मुलाखत होती. मनाने नोंद घेतली आहे. प्रश्नांची सरबत्ती नव्हती, मोकळ्या निवांत गप्पा वाटल्या.
कोणी घेतली आहे नसिरची मुलाखत?
कोणी घेतली आहे नसिरची मुलाखत?
हपा, पूर्ण सहमत
हपा, पूर्ण सहमत
अमित>>>बरेच लोक भारावण्याचं कम्पल्शन असल्यासारखे वागतात<<< मित्र म्हणे मधे हे सतत जाणवतं. एकतर त्याच होकारार्थी च् करतात ते, फार विचित्र आवाज काढत म्हणतात.. अगदी बघवत नाही.
अमृता सुभाषची मुलाखत अर्धवट बघितली. किती ते ओवाळून घेणं. सारखं दुबेजी दुबेजी म्हणून कित्ती मी नशीबवान... अरे हो, कळलं... असं झालं
मला तिचा अभिनय एकतर आवडत नाही (मारू नका) सतत एक रटाळ, कंटाळवाणे, जगाची चिंता वहाणारे भाव असतात. व्यक्तिरेखाही बऱ्याचदा पिचलेली,,दुखी, बिचारी अशीच असते. अर्थात आवडत नसल्याने फार बघितलं नाही. सो वैयक्तिक मत आहे हे.
अवल, सेम पिंच!
अवल, सेम पिंच!
मलाही भयंकर लाऊड ओव्हरॲक्टिंग करते म्हणून आवडत नाही ती!
हो न अन नॉर्मल बोलण्यातही
हो न
अन नॉर्मल बोलण्यातही सतत अभिनय अन मी मी 
अन सगळ्या मोठ्या माणसांबद्दल बघा मी कित्ती जणांंना ओळखते, भेटलेय, सोबत काम केलय... अरे हो, त्या इंडस्ट्रीत आहेस तर होणारच की
>>मला एक पॅटर्न लक्षात आला
>>मला एक पॅटर्न लक्षात आला आहे. एक व्यक्ती एका पॉडकास्टमध्ये दिसली की सगळ्या लोकांच्या पॉडकास्टमध्ये दिसते आणि अर्थातच तोच तोच कंटेंट.
हो हो अगदी, मलाही जाणवलं हे. विशेषतः डॉक्टर्स रिपिट होताना दिसले वेगवेगळ्या पॉड्कास्ट मध्ये. एकदा रणवीर, मग राज शमानी, त्राया हेल्थ आणखी इतरत्रही असतील
मला तिचा अभिनय एकतर आवडत नाही
मला तिचा अभिनय एकतर आवडत नाही >> +१. फार आरडाओरड करते. मला फ्लारिष्टाच्या शापामधल्या गायन तर पेट पीव्ह आहे.
अवल क्या परफेक्ट बोली रे.
अवल क्या परफेक्ट बोली रे.
मलाही ती अजिबात आवडत नाही. एक प्रकारचा आव आणून ॲक्टिंग करते.
बाकी, दुबेजी दुबेजी चा जप करणं कंपलसरी असावं.
आणि इंडस्ट्रीतल्या प्रतिथयश लोकांचा सोमिवर लाडाच्या नावांनी उल्लेख करून 'आम्ही कित्ती कित्ती बाई क्लोज' दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकदा पाहिलाय.
(हपा नसतात ना इथे? नाहीतर 'आणि' नी वाक्य सुरू केल्याबद्दल ओरडतील.)
अरे काय! माझा गणपुले?? मी
अरे काय! माझा गणपुले?? मी कुठे कुणाला काही बोललो तरी का!
आणि तुमच्या शेवटच्या वाक्यात <<'आणि' नी >> इथे मध्ये स्पेस नको आहे.
अमृता सुभाष आणि तिची आई
अमृता सुभाष आणि तिची आई दोघीही अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीत. त्या ज्यू सुभाष चा आवाज अतिशय बेकार अन् चिरका आहे. तिचे समोर काहीही चालू असेल की अगदी दुसऱ्या क्षणाला चॅनल बदलला जातो. महा इरीटेटिंग प्रकरण आहे. त्या अस्तू मध्ये पण हीच बेकार आहे इतक्या सुंदर पिक्चर मध्ये.
हो हो हीच झालं फ्लारिष्ट पण प्रेक्षकांवर अरिष्ट आले त्याचे काय???
आणि तुमच्या शेवटच्या वाक्यात
आणि तुमच्या शेवटच्या वाक्यात <<'आणि' नी >> इथे मध्ये स्पेस नको आहे.>>>>>> हर्पा मायबोलीचे आधुनिक "पाणिनी"
मला फ्लारिष्टाच्या शापामधल्या
मला फ्लारिष्टाच्या शापामधल्या गायन तर पेट पीव्ह आहे.>>>>+१११११
हपा अस्तु बद्दल +1000
हपा

अस्तु बद्दल +1000
ऋतुराज - पाणिनी मस्त कोटी
सुभाष मायलेकींचा अभिनय हल्ली
सुभाष मायलेकींचा अभिनय हल्ली एकसुरी वाटतो. म्हणजे ज्योती सुभाष ' पक पक पकाक ' मधली आणि ' घो मला असला हवा ' मधली. भाषेचा लहेजा, देहबोली आणि अभिनय, सगळं तेच ते वाटतं, काहीच फरक नाही. अमृता सुभाष चं पण तेच. पहिल्यांदा बघितल्यावर दोघीही आवडल्या होत्या, नंतर नाही.
' रंग पंढरी ' वर अभिनय क्षेत्रातील बऱ्याच जणांच्या छान मुलाखती बघितल्यावर आता सगळीकडे तसेच प्रश्न आणि तीच उत्तरे वाटतात.
अगोदर या हाताची बोटं कापा, पण
अगोदर या हाताची बोटं कापा, पण पाणिनी नका म्हणू!
पण कोटी आवडली.
अमृताची व तिचा नवरा ह्यांची
अमृताची व तिचा नवरा ह्यांची मुलाखत पाहिली का? फारच बोलत होती आणि जोरजोराने हातवारे करत … मित्रम्हणेवर पाहिलीच नाही…चिन्मयी सुमितची सुलेखाने घेतलेली मुलाखत बघणार नाही. तिचे वडील आएएस , मुलांना मराठी शाळेत, वाचन किती दांडगं इ इ परत परत कोण ऐकेल …. कोणी पाह्यली आहे का?
मित्र म्हणे मधे हे सतत जाणवतं
मित्र म्हणे मधे हे सतत जाणवतं>>
मित्र म्हणे चा ' पुरुषांची छळवणूक ' हा जो एपिसोड होता, त्यात तर त्या मुलाखतकाराचे प्रश्न आणि रिअँक्शन्स त्याच्या बिनडोकपणाची ग्वाही देणारे होते.
इथे मध्ये स्पेस नको आहे. >>>>
इथे मध्ये स्पेस नको आहे. >>>>
अवल, तुमाखमै!
अवल, तुमाखमै!
अमृता सुभाष मला आजिबात आवडत नाहीच. तो मित्र म्हणे ही आवडत नाही. अत्यंत साचेबद्ध विचार आहेत त्याचे. आणि ओबसेसिव्ह कंपल्सिव्ह भाराविंग झालेला आहे तो.
सलगी करून सगळ्यालाच सुपरलेटीव्ह अग्री करायचं. अनेकदा मुलाखतीला आलेला म्हणतो 'इतकं नाही ' तरी याचं काहीही क्लू न घेता भाराविंग चालूच.
मंजूताई हेच तर बोलला आपल
मंजूताई हेच तर बोलला आपल बोलली आहे चिन्मय. अनघा+११११ अतिशय फालतू होता तो एपिसोड. खरेतर किती मस्त झाला असता तो भाग.
हो, सौमित्र पोटे इरिटेटिंग
हो, सौमित्र पोटे इरिटेटिंग आहे. गश्मिर महाजनीच्या मुलाखतीत फार शहाणपणा करत होता.
मला पण अमृता सुभाष चा अभिनय
मला पण अमृता सुभाष चा अभिनय लाउड वाटतो, बाकी हल्लीच्या सिरीयल नाही पाहिल्या, तरी तरी मला हे म्हणायचं आहे की मला तिची मित्र म्हणे वरची मुलाखत आवडली. ( मी पहिल्यांदाच पाहिला हा पॉडकास्ट)
पण वरच्या सगळ्या कॉमेंट्स ना भारी हसू आलं.
अमित दे टाळी
अमित
दे टाळी
अरे बऱेच जणं जमले की इथे न आवडणारे
सायो, अगदी अगदी
मित्र म्हणे वाला प्रश्नाचं
मित्र म्हणे वाला प्रश्नाचं उत्तर ऐकूनच घेत नाही.. मध्येच नवीनच काहीतरी विचारतो...काय काम करते आहेस, काय नवीन येणारे सांगेपर्यंत तिसराच पूर्ण वेगळाच प्रश्न
हल्ली नवीन विषय काढून
हल्ली नवीन विषय काढून पॉडकास्ट्स घेणारे पैशापासरी झाले आहेत. सगळ्यांनाच मुलाखती घ्यायची टॅक्ट असतेच असं नाही. त्यात ती कोण मज्जागर्ल अंकिता लोखंडे आहे तिचं मराठी म्हणजे अगदी धन्यवाद आहे. ऐकवत नाही. तिच्यासारखे बरेच आहेत.
अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष
अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष ह्या मलाही आवडत नाहीत. मान हलवत आणि डोळे फिरवत आरडाओरड करतात. इथं यावर चर्चा झाली होती. तेव्हा अमा (?) या दोघींना बोटीत बसवून कुठेतरी लांब सोडायला हवे म्हणाल्या होत्या. आणि मी हातातलं काम सोडून त्यांना+१ दिले होते. लंपन आठवलं का ?
ऋतुराज, 'पाणिनी' आवडले.
Ho tar अस्मिता आठवते की,
Ho tar अस्मिता आठवते की, ह्यांना आधी एकदा शिव्या घालून झाल्यात ईथे
पण ह्यांना दरवेळी नावे ठेवण्यात एक वेगळीच मजा आहे
सौमित्र पोटे ' सर्वज्ञ ' पोटे असल्यागत मुलाखती घेतो. आणि त्याचे हसणे हे ' छद्मी ' असते जे मुलाखतकाराला शोभत नाही.
ह्यांना दरवेळी नावे ठेवण्यात
ह्यांना दरवेळी नावे ठेवण्यात एक वेगळीच मजा आहे >>>
हो
सायो+१
सौमित्र पोटे सतत स्वतःला/इतरांना स्पर्श करतो आणि मुलाखत देणाऱ्याच्या कधीही मांडीवर बसेल वाटावं इतकं जवळ बसतो. त्याला समोरच्या बद्दल काहीही देणेघेणे नाही असं वाटतं, जास्तच रिलॅक्स वाटतो. बोलण्यात आणि वागण्यात पर्सनल स्पेसचं भान नाही.
Pages