मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@anjali _kool सहमत. त्याही वेळी मित्राने ' हो? ', ' काय सांगतो?' असे प्रकार केलेच होते. दुसरी बाजू मध्ये गष्मिरने कर्ज फेडल्याचा मोघम उल्लेख केला होता, पण त्यावर विक्रम गोखलेंनी पुढे काही विचारले नाही.
कुठल्यातरी मराठी सिनेमात पिता - पुत्र एकत्र होते बहुदा. त्याच्या प्रमोशनच्या वेळी असाच एक प्रश्र्न रविंद्र म. ना विचारला होता. काय तर म्हणे, तुम्ही वडिल म्हणून गष्मिरला नृत्याच्या काय टिप्स दिल्यात? विचारणाऱ्या बिनडोक व्यक्तीला बघायची फार इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही.

१९६० मध्ये सिंधु पाणी करार झाला. त्या कराराप्रमाणे रावी नदीच्या पाण्याचा जेवढा हिस्सा भारताला मिळणे अपेक्षित होते तो हिस्सा भारत वापरू शकत नव्हते. कारण आपल्याकडे पाणी साठवण्याची क्षमता नव्हती. आता भारताने ती क्षमता प्राप्त केली आहे. हा विषय समजून घेण्यासाठी आदी अचिंतने कर्नल अजय रैना यांच्याबरोबर डेफ टॉक्स चॅनेलवर केलेले डिस्कशन. ओव्हरऑल सिंधु पाणी करार समजून घेण्यासाठीही हा एपिसोड उपयुक्त आहे.
वि. सु. : डिस्कशन ऐकणार असाल तर हे लक्षात ठेवा की डेफ टॉक्स हे जिओपॉलिटिकल विषयाला वाहिलेले चॅनेल आहे. त्यामुळे राजकिय उल्लेख/विचार/मते येणे अपरिहार्य आहे जी सगळ्यांनाच अपील होतील असे नाही.

लाहोर पाकिस्तान मध्ये एका महिला पोलिसने ने दुसर्या एका महिलेला मॉब लिंचिंग पासुन वाचवले. त्या महिलेची ६ मिनिटाची BBC ने मुलाखत घेतली. जबरदस्त मुलाखत,
https://www.youtube.com/watch?v=01pGQ5mXDo4

त्या महिला पोलिसाचे कौतुक...
आता त्या महिलेच्या ड्रेसचे फॉरेन्सिक अनालिसिस करणार आहेत म्हणे ब्लास्फेमी झाली की नाही ठरवायला. दरम्यान सौदीमध्ये अरेबिक कोट्स लिहिलेले स्टोल्स/शाली घालून महिला सौन्दर्यस्पर्धेत भाग घेत आहेत.

साहिल, ह्या विषयावर सय्यद मुझम्मिल नावाच्या पाकिस्तानि पत्रकार/युट्यूबर ने हा व्हिडिओ केला आहे. फार उत्तम विश्लेषण केले आहे तिथल्या परिस्थितीचे.
https://youtu.be/pqTCSbrvAI8?si=IVGTjBYwAWicl3ZG

होय मुझम्मिल फार मस्त बोलतात. प्रचंड उत्तम विश्लेषक आहेत. मुझम्मिल यांच्या चॅनलवरती, कालच त्या स्त्रीबद्दल पाहीले.

अ ती तिथे माती झालीये आता
किती चॅनल्स, किती पॉडकास्ट, किती मुलाखती.. आणि त्याही २-२ तासाच्या!
अशाने काहीच बघावंसं वाटणार नाही.

एक वेळ अशीच येईल की काहीही बघायला नको.
पण आपल्या हातात चॉईस आहे जे हवं ते बघायचा आणि बघतानाही फॉरवर्ड मारायचा जे मला आवडतं.

साईद मुझम्मिल भारी आहे!
पुणे विद्यापीठ आणि ती दुसरी कुठली घटना आठवली, आणि ते आणि पुणे तुलना मनात चालू झाली. Sad

रविंद्र महाजनी बद्दल काय अचानकपणे सुरू झालं?
ते गेलेत. गेलेत तेव्हा एकटे राहायचे हे माहितीय.
बाकीचा गोंधळ माहीत नाही.
एक किस्सा जरूर लिहितो.

पुण्यावरून कोपुला जाताना साताऱ्याच्या just अलीकडे milestone नामक थांबा घ्यायचो.
स्वच्छ टॉयलेट्स आणि थोडेसे महाग असले तरी उत्तम चवीचे स्नॅक्स.
तर एकदा तिथे थांबलो असताना बाजूच्या टेबलवर जरा ओळखीचे चेहरे दिसले.
नीट पाहिलं तर चक्क मराठीतले handsome रुबाबदार हिरो रवींद्र महाजनी , त्यांचा देखणा मुलगा गश्मीर आणि त्यांच्या पत्नी आणि सुनबाई (गश्मीरची पत्नी)
नाश्ता झाल्यावर ( त्यांचा आणि आमचाही ) त्यांना फोटोसाठी रिक्वेस्ट केली. त्यांनी स्वतःसोबत तर फोटो काढून घेतलेच शिवाय गश्मीरला अगदी प्रेमाने गशू ये फोटो काढायचे आहेत म्हणून हाक मारली.
त्यांच्या फॅमिलीला तेव्हा पाहिले , overall पाहून वाटलेच नाही की काही अडचण असेल ह्यांच्या नातेसंबंधात.
MH 20 पासिंग असलेली BMW होती आणि drive करायला तेच बसले होते.
त्या वयात देखील एकदम handsome.
5 ते 6 वर्षांपूर्वी ची घटना ही.
दुर्दैवाने ते फोटो कुठेच बॅकअप मध्ये नाहीयेत.
सेल्फी घेताना माझी तारांबळ उडालेली.
कारण ते उंच दोघेही आणि मी उंचीला कमी.

' मोह मोह के धागे ' अशा शिर्षकाचा आवाहन आय पी एच वर व्हिडिओ आहे. मुलखात अशी नाही, चर्चा किंवा संवाद म्हणू शकतो.
अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्याची आवड असेल तर बघण्यासारखा किंवा ऐकण्यासारखा भाग आहे. मानवी मनातील इच्छा, आकांक्षा, मोह, लोभ, इर्षा, आसक्ती आणि विरक्ती ह्या भावनांचा अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम स्वतः वर आणि आजूबाजूच्या लोकांवर होतात, ह्या भावनांचा खरा अर्थ काय, असे एकंदरीत स्वरूप आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या बरोबर डॉ. धनश्री लेले सुद्धा आहेत.

रवींद्र महाजनीच्या बायकोची मुलखात fwd करत पहिली. कारण ती सारखीच समोर येत होती.
इतकं विचित्र वाटलं सगळं. जुगार, नवऱ्याची लफडी बायकोने सोडविणे, मुलाला १६ व्या वर्षी कामाला लावणे, त्याच्या पैशाने घर चालविणे, जप्ती आल्यावर मुलाला बायकोला वाऱ्यावर सोडणे, मारहाण ..

आणि कहर म्हणजे श्रीकृष्णाची उक्ती सांगून भालामान करणे..

सौरभ द्विवेदीने घेतलेली नितिन गडकरींची एक मुलाखत नुकतीच पाहिली..... आवडली!!
लल्लनटॉप्च्या जमघट सिरिजमध्ये आहे बहुतेक ही मुलाखत!!

लल्लनटॉप्च्या मुलाखती चांगल्या असतात, पण त्या व्हिडीओत पहिली १० मिनिटं ही त्या आख्ख्या मुलाखतीची झलक दाखवण्यात जातात. हे माझं पेट पिव्ह आहे. मग सुलेखा तळवलकर परवडली.

कुणाला वेगळ्या विषयावरची मुलाखत ऐकायची असेल तर Dr सूचेता परांजपे यांच्या महाभारत, वेद , उपनिषद या विषयांवरील माहितीपूर्ण मुलाखती आहेत..
त्यांची मार्दव आणि गोष्टीवेल्हाळ स्टाईल खूप आवडली.

डॉ. परांजपेंच्या मुलाखती बघितल्या आहेत. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात.

+१
त्यांची ऋग्वेदातील स्त्रियांवरची मुलाखत पाहिली होती असं आठवतंय. छान होती.

अनघा+१
वावेने 'महाभारतातील नायिका' हा लेख लिहिला होता, तेव्हा लिंक दिली होती. तेव्हा काही मुलाखती बघितल्या होत्या. खरोखरच छान सांगतात.

>>> डॉ. परांजपेंच्या मुलाखती बघितल्या आहेत. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात.
+१

'मोह मोह के धागे' पाहिला आणि आवडला. (पण डॉ. लेले चर्चा हायजॅक करत असल्याचा थोडासा फील आला मात्र अधेमधे.)
ती पाहिल्यावर अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णींचा एपिसोडही सजेस्ट झाला म्हणून पाहिला. तोही चांगला होता.
(अमृता सुभाष यातही लाऊड बडबड करत होती आणि इतरांना बोलायचा चान्स शोधावा लागत होता, पण ते आता धरून चालायचं. इतर कोणी बोलत असताना तिच्या रिअ‍ॅक्शन्ससुद्धा फार लाऊड असतात असं मला वाटतं. पण हे अवांतर आहे.)

स्वाती, लेले यांना बोलावलं होतं. ती दोन्ही बाजुंनी केलेली चर्चा असली तरी आनंद नाडकर्णी हे होस्ट होते आणि चर्चा मार्गावर ठेवणे, पुढे नेणे, पैलू दाखवणे हेच त्यांचं काम होतं. लेले गेस्ट होत्या त्यामुळे ते थोडंफार असणारच.
गेल्या भेटीत या तीन दिवसांच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रत्यक्ष योग जुळलेला. याच सीरीज मधली अश्विनी भिडे-देशपांड्यांची मुलाखत आली की आवर्जुन ऐकण्यासारखी आहे. त्या आपल्या गुरूंच्या लिमिटेशन्स आणि नुआंसेस इतक्या स्वच्छ आणि तरी विनम्रतेने सांगतात. हल्लीच्या जगात ते फारच विरळं आहे. फारच प्रांजळ बोलल्या आहेत त्या.

Pages