हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
दिल के करीब हल्ली नियमित न
दिल के करीब हल्ली नियमित न बघता अधूनमधून बघत असते. पूर्वी सुलेखा तळवलकर बरंच इंग्लिश बोलत असायची जे आता कमी झालं आहे हे बघून बरं वाटतं. पण सुलेखा तळवलकर मला खोटी खोटी गोड गोड असते असं वाटत राहतं.
दुसरी बाजूमध्ये विगो कंटाळवाणे वाटायचे.
https://www.youtube.com/
https://www.youtube.com/@NextLevelSoul/playlists
नेक्स्ट लेव्हल सोल - सर्व मुलाखती ऐकते.
सर्वच मेटॅफिजिक्स/ निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस/ हाऊ टु हॅक युअर माईंड याबद्दल असतात.
अस्मिता खूप उपयोगी धागा आहे. माहीतीत भर पडेल.
धागा आवडला. मी जनरली एका
धागा आवडला. मी जनरली एका चित्रपट कलाकाराची एक मुलाखत पाहिली की परत कोणीही घेतली तरी बघत नाही, तीच तीच प्रश्न, तीच तीच उत्तरं. राजकारण्यांच्या बघते कधी कधी, काहीही चालतं तिथे, प्रश्न काय उत्तर काय किंवा प्रश्नाला प्रतिप्रश्न ,मला मजा येते. म्हणजे अक्षय कुमारने "आप आम कैसे खाते हो" हा बिनडोक प्रश्नाचा कहर होता.
फारुख शेखचा एक कार्यक्रम यायचा तो आवडायचा. करण जोहर सुरुवातीला आवडायचा, आता फार उथळ प्रश्न असतात .
दिल के करीब कधीमधी बघते. ठीक आहे, रंगपंढरी मात्रं आवडलेलं, मधुराणी काय शांत आवाजात प्रश्न विचारायची.
आता कोणाच्या बघू नयेत, तर अनुपम खेर, प्रश्न विचारतो आणि स्वतःचीच टकळी सुरू करतो. फार बोर करतो तो. 2-4 एपिसोड पाहिलेले. सोनाली खरेचा खरे बोल ठीकठाक.
वरती उल्लेख केलेली इंदिरा गांधीची मुलाखत खूप आधी पाहिलेली, तेव्हाही आवडलेली, आताही आवडली. किती शांतपणे छान बोलल्या आहेत, उगा फाफटपसारा नाही.
वरचा प्रतिसाद वाचून आठवलं, ग्रेट भेट. तो कार्यक्रमही आवडायचा.
कशी मुलाखत घेऊ नये याचं
कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण विक्रम गोखले बद्द्ल अगदीच सहमत.
रच्याकने: वय वाढलं की कलाक्षेत्रातील व्यक्तींनी निवृत्त व्हावे/ प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एक्झिट घ्यावी इ. म्हणतात ते वि.गो. बाबत फारच जाणवलं. वाचाळ बडबड इ. प्रकार वाढत गेले आणि अभिनेता म्हणून दिसण्यापेक्षा अशा बेगडी, टुकार ठिकाणी ते दिसू लागले आणि मनातुन उतरत गेले. अर्थात अमिताभ हा नियम सिद्ध करायला अपवाद.
कशी मुलाखत घेऊ नये याचं
कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण >>> विश्वास मेहेंदळे (नक्की नाही) यांनी लीला गांधी यांची घेतलेली मुलाखत पाहण्यात आलेली होती. त्या आता विवाहीत असल्याने तमाशाच्या काळातले प्रश्न विचारू नका असे त्यांनी मुलाखतीत सौम्य भाषेत अनेकदा सुचवले. पण मुलाखतकारांना असे प्रश्न विचारताना गुदगुल्या होत होत्या. शेवटी लीला गांधी भडकल्या. त्या म्हणाल्या कि माझ्या मुली शिकलेल्या आहेत. माझी पार्श्वभूमी मी त्यांना सांगितलेली नाही. बाहेरून कळाली तर कळाली. पण त्यांच्यासमोर मला ही पार्श्वभूमी यावी असे वाटत नाही. एका चांगल्या घरात पडले. सुखाचा संसार चालू आहे. तुम्हाला सांगून पण तुम्ही का कुरतडून त्या जखमांवरच्या खपल्या काढताय ?
अरेरे...! काही शिष्टाचारही
अरेरे...! काही शिष्टाचारही नाहीत. असंवेदनशील वागणं.
विश्वास मेहेंदळे 'वाद संवाद' नावाचा कार्यक्रम करायचे, उथळ वाटायचे मला ते. एकदा त्यांनी शरद उपाध्येची मुलाखत घेतलेली. 'पांचटाला भेटे पांचट' वाटले . शरद उपाध्ये तर 'हे हे हे' करत स्वतःला मोठं चार्मिंग वगैरे समजायचे तितका मला त्यांचा राग यायचा. हा माणूस विश्वासपात्र नाही असं मला आतून वाटलं.
सोनाली बेंद्रेची माझा कट्टावरची मुलाखत फार आवडली. फार प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि खरी मुलगी वाटली.
नीलेश साबळे, कपिल शर्मा यांच्याबद्दल पण लिहा कुणी तरी.
>>>> ते पाहुण्यांना बोलूच देत नाहीत. ते मुलाखतकार नाहीत, विनोदी अभिनेते आहेत. मला दोघेही आवडतात. पण मुलाखत घेणं ही त्यांची ताकद नाही.
विश्वास मेहेंदळे खरंच असतील
विश्वास मेहेंदळे खरंच असतील तर आश्चर्य वाटेल. मला आवडायचे अशी मनात प्रतिमा तरी आहे.
सर्व प्रतिक्रियांबद्दल
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. एकेक नीट वाचते.
लिंक्स व छापील मुलाखतींचे दुवे चालतील हर्पेन.
दिल के करिब मध्ये सुलेखा
दिल के करिब मध्ये सुलेखा मध्ये मध्ये अतीच गोड बोलून किती स्तुती करू आणि किती नको मोडे मध्ये जाते...
काही प्रश्न विचारताना तुम्ही इतके हुशार, तुम्ही इतकं काम केलं, तुम्ही इतके सुंदर दर वेळेस रिपीट करायच. रणवीर is so cringeworthy many times..
मला बिटविन टू फर्न्सच्या
मला बिटविन टू फर्न्सच्या मुलाखती आवडतात.
कशी मुलाखत घेऊ नये याचं
* स्पॉयलर अॅलर्ट *
कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण विक्रम गोखले बद्द्ल अगदीच सहमत. >> +१ गश्मिर महाजनीची मुलाखत तर कहर होती. त्यांच्या प्रत्येक ' यंग मॅन ' ला माझी ह ह पु वा झाली होती. शिवाय ' आता मी तिथे जातो ' असं काहीतरी म्हणून ते जायचे, ते फार विनोदी होतं.
* स्पॉयलर अॅलर्ट समाप्त*
फक्त एक आवडलं होतं. त्यांनी शरद पोंक्षेची मुलाखत घेतली त्यात शरद पोंक्षे सावरकरांबद्दल फारच भरभरून बोलत होते. आता खरं तर विक्रम गोखलेही सावरकर प्रेमी. पण सगळं ऐकून झाल्यावर त्यांनी शरद पोंक्षे यांना वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला की बाबा रे, तू सावरकर वाचतोस ते ठीक आहे, पण तुझं इतर वाचन कमी पडतंय. आपल्याला सर्व मते मतांतरे माहिती हवीत वगैरे. जरी मुलाखतकाराने सल्ले देणे विचित्र आहे, तरी हे आवडलं होतं.** अॅलर्ट *
कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण विक्रम गोखले बद्द्ल अगदीच सहमत. >> +१ गश्मिर महाजनीची मुलाखत तर कहर होती. त्यांच्या प्रत्येक ' यंग मॅन ' ला माझी ह ह पु वा झाली होती. शिवाय ' आता मी तिथे जातो ' असं काहीतरी म्हणून ते जायचे, ते फार विनोदी होतं.
फक्त एक आवडलं होतं. त्यांनी शरद पोंक्षेची मुलाखत घेतली त्यात शरद पोंक्षे सावरकरांबद्दल फारच भरभरून बोलत होते. आता खरं तर विक्रम गोखलेही सावरकर प्रेमी. पण सगळं ऐकून झाल्यावर त्यांनी शरद पोंक्षे यांना वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला की बाबा रे, तू सावरकर वाचतोस ते ठीक आहे, पण तुझं इतर वाचन कमी पडतंय. आपल्याला सर्व मते मतांतरे माहिती हवीत वगैरे. जरी मुलाखतकाराने सल्ले देणे विचित्र आहे, तरी हे आवडलं होतं.
कशी मुलाखत घेऊ नये याचं
कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण विक्रम गोखले >>>

' आता मी तिथे जातो ' असं काहीतरी म्हणून ते जायचे, ते फार विनोदी होतं.>>> +१
मी एकाच दिलीप प्रभावळकरांची बघितलेली. आणि त्यांचे लेखनाविषयीचा/ अभिनयाचा प्रवास इतका सुंदर उलगडून सांगत होते की वि गो कडे एव्हढ लक्ष नाही गेलं.
एक प्रवीण दवणे यांनी एकदा आशा
एक प्रवीण दवणे यांनी एकदा आशा भोसलेंची मुलाखत घेतलेली. ते इतके बोलत होते, की शेवटी आशाताई म्हणाल्या " लोक माझं बोलणं ऐकायला आलेत ... "
>>> ते एक उदाहरण मुलाखत कशी घेऊ नये ह्याची.
मधुराणी च कवितेचं पान आवडायचं. सगळे नाही पण काही भाग बघितलेत.
'दिल के करीब' पण मधून कधी तरी बघितलेत.
गंगाधर टिपरे कुटुंबाबरोबरची मुलाखत हि आवडली होती
https://www.youtube.com/watch?v=yPbTs7uHFNE
वाह! खूप छान धागा व प्रतिसाद.
वाह! खूप छान धागा व प्रतिसाद. रघु आचार्य यांचे पहिल्या प्रतिसादातले बरेच मुद्दे पटले. राजकीय, कलाकार, वैज्ञानिक, उद्योगपती वगैरे अनेक क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या मुलाखती पाहिल्या आहेत व पाहतो. प्रेरणा मिळते. त्यामुळे प्रतिसदांतून आलेले दुवे बुकमार्क करून ठेवण्यासारखे आहेत. इंदिरा गांधी तसेच रेखा यांच्या वर उल्लेख आलेल्या मुलाखती पाहिल्या आहेत.
अलीकडच्या काळात अनेकदा मुलाखतीच्या नावाखाली "सेलिब्रिटीजना आपली भूमिका मांडून इमेज बिल्डिंग करण्याचा मनोरंजक कार्यक्रम" केला जातो. त्याला मुलाखत म्हणता येणार नाही हेमावैम. तरीही जे काही आहे ते पहायला आवडते. आय टेक द्याट विथ पिंच ऑफ सॉल्ट.
१९८०-८५ च्या आसपास कॅनडा (Vancouver) येथे घेतलेल्या अनेक प्रसिद्ध स्टार्सच्या मुलाखती आहेत. त्यावेळी त्या तेथील लोकांसाठी घेतल्या असाव्यात. पण आता पहायला खूप मस्त वाटते. राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, शशी कपूर इत्यादिंच्या मुलाखती पाहताना त्या काळात गेल्यासारखे वाटून मस्त गुदगुल्या होतात. राजेश खन्ना सांगत असतो, "ये मेरी फिल्म अभी रिलीज होनेवाली है"
Richard Feynman, Bill Gates, रतन टाटा, इंदिरा गांधी आदींच्या मुलखाती पाहताना एक वेगळीच ऊर्जा मिळत राहते. किती लिंक देऊ असे झाले आहे.
खूप खूप मस्त धागा अस्मिता!
मुलाखतीं साठी, ज्यांनी बघितलं
मुलाखतीं साठी, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अनफिलटर्ड विद समधिश जरूर बघा. खूप मज्जा आणतो तो.
मज्जा आली का ही मुलाखत बघून
मज्जा आली का ही मुलाखत बघून ?
https://www.youtube.com/watch?v=WrmChOvKjcU
अतुल. धन्यवाद.
>>कशी मुलाखत घेऊ नये याचं
>>कशी मुलाखत घेऊ नये याचं उदाहरण विक्रम गोखले
+१
कुणाच्या मुलाखतीत आठवत नाही पण त्या व्यक्तीलाच गोखले ब्रेक घेताना, 'तू काय बोलत होतास/कुठे थांबला होतास ते तूच लक्षात ठेव' अशा प्रकारची काहीतरी सूचना द्यायचे
एकूण विगो पकाऊ आहेत असं मला
एकूण विगो पकाऊ आहेत असं मला वाटतं. दुसरी बाजूमध्ये इतकं संथ चालायचं सगळं की विचारता सोय नाही.
आज नूरजहाँन मनात आहे तर तिची
आज नूरजहाँन मनात आहे तर तिची एक मुलाखत!
काय आदब, काय आवाज, काय दिसणं, सुंदरच.
1926 चा जन्म नूरजहाँनचा. स्वातंत्र्यपूर्व काळात ती हिंदी चित्रपटामधली सर्वात प्रख्यात नायिका- गायिका होती. पण फाळणी नंतर नवऱ्याबरोबर ती पाकिस्तानमधे गेली. तिची पुढची कारकिर्द तिथे झाली. पण तिच्या मनात इथल्या आठवणी जागत्या राहिल्या. पुढे 1983 मधे तिला भारतात आमंत्रण मिळालं, अनेक कार्यक्रम झाले. तेव्हा दिलिप कुमार यांनी घेतलेली ही मुलाखत
https://youtu.be/jrMoN4zg1G
57 वर्षीही ही नूरजहाँन "नूरजहाँन"च दिसली, ऐकू आली
मुलाखत उर्दुमधे आहे, काही शब्द अडू शकतात पण तरीही जरूर बघा.
छान माहिती मिळते आहे.
छान माहिती मिळते आहे.
राजू परुळेकरांचा कार्यक्रम फार सकाळी असे. एकदाच पाहिला. ते कुण्या लावणी गायिकेची मुलाखत घेत होते. काही होमवर्क केलेलं नाही, असं वाटलं.
सुधीर गाडगीळ मुलाखतकार म्हणून फार नावाजलेले आहेत. आमची पंचविशी या नावाने दूरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम असे.
ई टीव्ही मराठीवरच मधुराणी गोखले प्रभुलकरचा मुलाखतींचा कार्यक्रम असे. पुढे तो कविता पौडवालने फार चांगला चालवला.
मला शेखर गुप्ताचं वॉक द टॉक आवडायचं कारण इतरांना सहजी मिळणार नाहीत अशा व्यक्तींचा अॅक्सेस त्यांना होता. राजकारण्यांच्या मुलाखती चांगल्या वाटल्या. पण त्यातच ते चित्रपट अभिनेत्यांनाही बोलवायचे आणि गॉसिप करायचा प्रयत्न करायचे. अभिषेक बच्चनने त्यांचे असे प्रश्न फार चांगल्या पद्धतीने पॅडवर घेतल्याचं आठवतंय
छापील मुलाखतींचे दुवे चालतील
छापील मुलाखतींचे दुवे चालतील >>> धन्यवाद
अमरावतीचे प्रसिद्ध चित्रकार संजय गणोरकर यांनी एकेकाळी ‘सत्यकथा’ मासिकासाठी मुखपृष्ठं व रेखाटने केली. मुंबईत अनेक संधी असूनही ते तीस-पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या मूळ गावी परतले. तिथं त्यांनी अंध मुलांसाठी काम केलं. नंतर शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी मांडणी शिल्पं तयार केली. त्याची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रदर्शनं झाली. गेल्या वर्षी त्यांना ‘ग्रेस स्मृती पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्तानं घेतलेली त्यांची ही मुलाखत…
https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/6167
विक्रम गोखलेंच्या मुलाखतीत ते
विक्रम गोखलेंच्या मुलाखतीत ते समोरच्याला मधेच खटकन मध्यंतराकरता थांबवायचे ते आवडायचं नाही. मात्र मुलाखती सगळ्या मस्त होत्या. अविनाश खर्शिकरांची ऐका. फार विनोदी किस्से सांगितलेत त्यांनी. विजया मेहतांची पण फार सुंदर वाटली मला.
राजकारण बाजूला सारून इंदिरा
राजकारण बाजूला सारून इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारी ‘हटके’ मुलाखत.
फेब्रुवारी 1972 मध्ये ही मुलाखत झाली, तेव्हा इंदिराजी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. ‘पाकिस्तान’ तोडून त्यांनी ‘बांगलादेश’ नावाच्या एका नव्या राष्ट्राला जन्म दिला होता. आंतरराष्ट्रीय दबाव- विशेषत: अमेरिका आणि चीनचा दबाव- झुगारून त्यांनी फार अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली होती. आत्मविश्वासाने त्या मुसमुसल्या होत्या. त्यांना मुलाखतकर्ती भेटली, तीही त्यांच्यासारखीच. आधुनिक जगातील सर्वश्रेष्ठ राजकीय मुलाखतकार असा लौकिक प्राप्त केलेली स्टार पत्रकार ओरिआना फल्लाची. (अनुवाद : सदा डुम्बरे)
https://weeklysadhana.in/view_article/indira-gandhi-interview
इतर मुलाखती पाहिल्यानंतर
इतर मुलाखती पाहिल्यानंतर प्रतिसाद देईनच. सध्या जमत नाहीये.
मार्गरेट थॅचर बाईंच्या पाच सहा मुलाखती पाहिल्या होत्या. त्यांचेही व्यक्तीमत्व इंदिरा गांधीं प्रमाणेच, थोडे जास्त आक्रमक, वाटायचे. धारदार नाक, बोलणे टप्पोरे डोळे आणि देहबोलीतून जाणवणारा प्रचंड आत्मविश्वास किंबहुना वर्चस्व दोघीत समान होते. समकालीन तर होत्याच.
एकीकडे असे व्यक्तिमत्व आणि दुसरीकडे सभ्य सुसंस्कृत वागणे. दोन्ही देशांना त्या नंतर असे लक्षवेधी नेतृत्व मिळाले नाही.
बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ
बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मिळ मुलाखत. त्यांनी काही फार निर्भीड मते मांडलेली आहेत. गांधी हे ऑर्थोडॉक्सच होते ही वॉज नेव्हर अ रिफॉर्मर. त्यांनी फक्त 'हरीजन' काँग्रेसमध्ये यावेत म्हणून त्यांची बाजू घेतली. असे ते म्हणतात.
-
https://www.youtube.com/watch?v=Wf3VJCpNMqI
तेव्हा दिलिप कुमार यांनी
तेव्हा दिलिप कुमार यांनी घेतलेली ही मुलाखत
https://youtu.be/jrMoN4zg1G
Video unavailable आहे
https://youtu.be/jrMoN4zg1Gg
https://youtu.be/jrMoN4zg1Gg
क्षमस्व कॉपी करताना गडबड झाली.
breakfast with champions
breakfast with champions ashish nehra
One of the Best & Honest Interview Ever.
https://www.youtube.com/watch?v=m489zSRnkIk
क्रिकेटर्सना अश्या मुलाखतीत बघायला मजा येते. जरा मैदानाबाहेरचे कॅरेक्टर कळते. आशिष नेहरा ईतका फनी असेल असे कधी वाटले नव्हते. हे बघून मी त्याच्या कॅरेक्टरचा फॅन झालो
मी त्याला एक गंभीर व्यक्तीमत्वाचा माणूस समजायचो, तो ईतका धमाल आहे हे हा एपिसोड बघितल्यावरच समजले.
क्रिकेटची आवड असेल नसेल तरी आवर्जून बघा. धमाल आहे
दिलीपकुमार नूरजहा मुलाखत थोडी
दिलीपकुमार नूरजहा मुलाखत थोडी पाहिली. दिलीपकुमार जेव्हां वयाला शोभेलसे कॅरेक्टर रोल करू लागले ( अर्थात नायकाचे) तेव्हांही त्यांचा चेहरा टवटवीत होता. शेवटपर्यंत टवटवी राहिली. वय सुद्धा दिसत होते. त्या मानाने देव आनंद, आता जितेंद्र, अमिताभ बच्चन यांचे चेहरे खूप कोमेजलेले वाटतात. नूरजहांचा मेक अप असेल. पण टवटवी तिच्याही चेहर्यावर दिसते.
मार्गरेट थॅचर बाईंच्या पाच
मार्गरेट थॅचर बाईंच्या पाच सहा मुलाखती पाहिल्या होत्या.
>>>> लिंक देता का आचार्य, किंवा दुसरा काही दुवा .
राजकारण बाजूला सारून इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारी ‘हटके’ मुलाखत.>>> धन्यवाद हर्पेन, हे वाचेनच .
Richard Feynman, Bill Gates, रतन टाटा, इंदिरा गांधी आदींच्या मुलखाती पाहताना एक वेगळीच ऊर्जा मिळत राहते. किती लिंक देऊ असे झाले आहे.>>> येऊ द्या, लिंक्स .
सर्वांचे आभार, एकेक करत बघेन.
Pages