आयपीएल २०२३

Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03

आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काय बोअर मारता राव इथे येऊन तेच तेच. सिरियसली. कंटाळा पण येत नाही. पथेटिक.

मस्त झाली मॅच. म्हणजे पारडं कधी इकडे जड तर कधी तिकडे.
अगदी मागच्या सिजन पर्यंत वाटायचं स्पिनर लोकांचे काही खरं नाही आणि अर्थात तशीच ट्रीटमेंट पण मिळाली त्यांना. पण स्पिनर लोकांनी जाम गेम अप केलाय. कृणाल पंड्यानी सुरेख केली बॉलिंग आज. मला वाटायला लागलं होतं की टायटन्स चेज स्पेशिलस्ट आहेत आणि आधी येउन मोठा स्कोअर बिल्ड करण्यात कमी पडतील. कमी पडलेच पण नंतर येउन बॉलिंग/फिल्डिंग मध्ये भरुन काढलं. शेवटच्या ३-४ ओवर मजा आली बॉस. सॉलिंड टाईट ठेवली बॉलिंग शमीनी. शर्मा, नूर अहमद दोघंही भारी! के एल फॉर्म मध्ये होता आणि एकदा चुकून एक पेस जास्त असलेला बॉल टाकला त्याला शर्मानी तर त्यानी तो तडकवला. लग्गेच दुसर्‍या बॉलला पेस ऑफ. सगळे स्लो आणि वाईड टाकले. झिरो एरर्स! मान गये!
लो स्कोअरिंग आणि बोअरिंग म्हणता म्हणता चुरशीची झाली मॅच.

प्रभसिमरनची विकेट पाहिली का? मस्त बॉल टाकला अर्जुननी. चांगला पेस आणि टोटली ऑकवर्ड लेंत म्हणतात त्या टाईप वाटला. कसा खेळावा नेमका अशी शंका निर्माण होते आणि चूक होते. तेच झालं सिंघचं. म्हणजे बॉल हातातून सुटला तेव्हा दिसत होतं सीम वरुन एकदम मस्त सुटलाय ते. पेस आणि लेंत खत्रा होती. लवली बॉल!! गूड गोईंग किडो! Happy

बुवा क्लिक बेट दुसरे काय हो.

शमी, शर्मा, नूर अहमद तिघांनीही सुरेख बॉलिंङ केली. राहुल पेसची वआट पाहात होता त्याचा पार पोपट केला. एकदम परफेक्ट एक्सिक्यूशन होते. मजा आली.

अर्जून कंप्लीटली लॉस ऑफ प्लॅन झाला राव . पण त्या ओव्हर मधला तो वाईड बॉल स्विंग आला ते पाहिले का ? ह्या स्टेज ला ऑक्वर्ड जंपमूळे तिल्टेड डिलीव्हरी अँगल मूळे स्विंग होतो का ?

वानखेडे आहे. चेसिंग टीम नेहमीच गेममधे असते. मुंबईची बॅटींग डीप आहे.

अर्जूनची बॉलिंग बरीचशी तरूण इरफान सारखी वाटते. रन-अप वॉबली आहे पण (अनलाईक इरफान) - गांगुलीसारखा.

किशन सोन्यासारख्या संधीची माती करतोय. पंतच्या अनुपस्थितीत त्याला इंडियन टीममधे स्थान पक्कं करता आलं असतं.

कसली कडक ओव्हर टाकली अर्शदीपने. >> परत पेस पण वाढलाय सध्या. मुंबई ने बॉलिंग च्या शेवटच्या सहा ओव्हर्स मधे मॅच घालवली. ग्रीन नि रोहित खेळत असताना ग ग्रीन ने पण थोडं सुटायची गरज होती. बाकी कुरान स्टंप्स एक्स्पोज करून ऑफ ला मारतो हे जगजाहिर आहे. पण पॉईंट ला डीप मधे फिल्डर का नव्हता मग ? परत तुम्ही ऑफ च्या बाहेर फुल लेंग्थ ठेवणार हे धरलय तर थर्ड मॅन ला कोणी नको का , पेसर च्या एजेस लागून जाणार त्यासाठी ? काय नक्की फिल्ड लावली होती देव जाणे !

मी आज सचिन तेंडुलकर स्टॅंडमध्ये होतो. फिल्ड सेटिंगविषयी असामीशी अगदी सहमत आहे. '२००+ पिच आहे तर कमीत कमी धावा जातील असं बघू आणि मग चेसमध्ये मारून काढू' असा एकंदरीत सगळ्याबद्दल ॲटिट्यूड वाटला. अर्शदीप वॉज टू गूड द होल टाईम. इंटेंट आणि इंटेलिजन्स कायम त्याच्या बॉडी लॅंग्वेजमध्ये होता. भारतासाठी तो एक ॲसेट आहे. तो झहीरइतका चांगला किंवा त्याहून पुढे होऊ शकतो हे माझे (अण्णा पावशीय नसलेले) भाकित ऑन रेकॉर्ड नोंदवतो. टिम डेव्हिड मस्त कॅरॅक्टर आहे. गर्दीशी त्याची वेगळीच मजा चालू होती. आमच्या समोरच लॉंग ऑनला होता. अर्शदीपही होता. लिव्हिंगस्टनही होता. अर्जुनही होता.

जाता जाता, दहानंतर लाऊड स्पीकर नाही हा नियम मुंबईत लागू असल्याने संध्याकाळच्या गेमचा शेवटचा सव्वा तास फारच सपक वाटू लागतो.

लखनौ ने आज चेस करताना अक्षरशः शेण खाल्ले. सहा ओव्हर मध्ये 30 रन (8 विकेट हातात असतांना) काही रिस्क न घेता - फक्त सिंगल -डबल करूनही करता आले पाहिजेत.

द्रविड आणि इतर थिंकटॅंकला अजूनही जर राहुल भारताचा पुढला कसोटी / ODI कप्तान वाटत असेल तर कठीण आहे आपलं.

>>गर्दीशी त्याची वेगळीच मजा चालू होती.

हो बऱ्याच खेळाडूंना आवडते असे प्रेक्षकांशी इंटरॅक्ट करायला पण आपले लोक कधी कधी ओव्हर करतात.... स्पेशली बाहेरच्या खेळाडूंना काही विचित्र नावाने हाका मारणे वगैरे!!

अरे कोहलीला का कॅप्टन केलं परत फाफ असताना? what did I miss? >>>

बुवा, फाफला इंज्युरीमुळे फिल्डींग करता येत नाहीये, त्यामुळे गेल्या मॅचपासून कोहली कॅप्टन आणि ते फाफला इंपॅक्ट प्लेयर सबने रिप्लेस करणार अशी स्ट्रॅटेजी आहे.

काय अरे!
वाया घालवत आहेत, फाफ आणि मॅक्सची मेहनत. काहीच जमेना ह्यांना.

१९० तगडा स्कोअर आहे. मॅच दुपारी आहे, त्यामुळे दवाचा प्रश्न नाही. आरसीबीची बॉलिंग सॉलिड आहे. रॉयल्सना खूप चांगली बॅटींग करावी लागेल.

ओ मॅन!!
टोटली बीट!!!!
काय बॉल! सिराज!

पडिक्कलचा हसरंगाला मारलेला लेटकट ‘क्लासिक’ मोड मधला होता. ऑल्मोस्ट डीके च्या हातातून काढला. जैस्वाल-पडिक्कल ची बॅटींग बघायला मजा येतेय.

कोहलीला म्हणा ड्रामा कमी कर जरा. तरी बरं आज बदक झालं त्याचं. कॅच घेतला जैस्वालचा तर लगेच स्टँड्स कडे बघत फ्लाईंग किस सोडत होता. अनुष्का आहे तिथे.
हौ इम्मचुअर. Grown ass men behaving like high school kids!

Pages