खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना , मला पण असच वाटतयं, डोरेमॉन सारखे काही तरी गेजेट मिळावं म्हणजे मोबाईल मधले पदार्थ डायरेक्ट ताटात:फिदी:

तर्री..पोहा.. मस्तच लागतात.. मी डबल मेहनत घेत नाही.. उसळ केलेली असताना .. पोहे करायचा माणिकांचन योग आला तरच.. पण मी कधी कधी पोपट पोहे करते.. पोपट घरात असेल तर.. आपली राधाक्का पोपट पोहे.. चणा पोहे.. असे काय काय बोलायची .. तेव्हा नवीन काही तरी करून बघू म्हणून केले.. ( पोपट म्हणजे हिरवा पावटा) मलाही यु टयूब बघूनच कळले..

आज माझ्याकडे पण कांदे पोहे होते.. पण वि बी ने एवढे सगळे वर्णन केल्यावर घशाखाली उतरत नव्हते ..तरीपण खाल्ले . न खाऊन सांगते कोणाला.. आपलेच दात.. आणि आपलेच पोहे..

हाय राम! जेवणाच्या आधी ह्या धाग्यावर येण्याचं पाप केलं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. काय एकसोएक पदार्थ. सगळ्यांना दंडवत. अळूवड्या, (२ वेळा) , सामोसे, पा पु, नेवैद्याची ताटं, बासुंदी, तर्री पोहे! आणि अजून काय काय. हि आलीच खापरोळी खुपच मस्त

देविका , खापरोळी भारीयं .
मला आवडतेच , आता माझ्या लेकाला पण आवडायला लागली आहे .
नारळाचे डोसे कर म्हणून मागे लागतो Happy .

श्रवु, मडगने व देविका खापरोळीची थोडक्यात रेसिपी लिहा.
आमचे नागपुरी तर्री पोहे मस्त दिसतात20200806_140046.jpg

देवकी बारा कोसावर भाषा बदलते ना.. तसेच कारवार गोवा पट्टयांतून पुढे येताना ते मनगने च मडगाणे झाले .. त्याला गॉडशें किंवा पायसम असे हि म्हणतात..

स्वस्ति, रिक्षात फिरून मज्जा आली. पण एका खड्ड्यात रिक्षा अडखळली. भाज्या परततो व पोळी/दोसा/धिरडं उलटतो.
मनगळे पाहुन आले रिक्षा वळवून. मस्त रेसिपी!

मग मंजूताई धक्क्यातून सावरा आता स्वतःला आणि एखादा पदार्थ येऊ द्या..माबोवर.. गोड बरं का ? किंवा तुम्हाला कोणी सवाष्ण म्हणून पाठवलेल्या डब्याचा..

मला जमेल असा काहितरी नविन हटके पदार्थ सुचवा. शनिवारी सकाळी वेळ आहे.
नाहीतर पालकाची भाकरी करायचा विचार आहे.

पालकाची भाकरी करायचा विचार आहे.>>
एवढा नेक इरादा असताना दुसऱ्या पदार्थाबद्दल का विचारताय? पालकाची भाकरी, ठेचा आणि झुणक्याचा बेत होऊ द्या फक्कड.

मला त्यांच्या भाकरी पुडिंग सकट होऊ न शकलेल्या माजी सासूबाई हि खूप आवडल्या>> वर्तमानातल्या सासुबाईही जबरदस्त आहेत.. त्यांचेही किस्से येतीलच Happy

भगिनींनो,
गप्पा कमी मारा, फोटो टाका फोटो. Light 1

Pages