खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा "फु स" एक वेळ परवडला. तो इतरांकडून आला असल्याने त्यावर इग्नोरास्त्र वापरता येते परंतु "भला उसकी कमीज मेरे कमीज से ज्यादा सफेद कैसी?" अशी स्वतःच्याच मनाने उचल खाल्ली आणि "उसको जमताय तो मेरेकू क्यूँ नहीं।" अशी परिस्थिती आली तर कठीण होते.

केळ्यांचे म्हणजे कैर किंवा करीर (Capparis decidua)
च्या बेरीसारख्या फळांचे लोणचे.
हे रानभाजी प्रकारात मोडते.
कच्या बेरीजची अत्यंत चवीष्ट भाजी व लोणचे बनते.
तर पिकलेली लाल रंगाची फळे खाण्यासाठी वापरली जातात. हिरवी फळे वाळवून करी बनवण्यासाठी वापरली जातात. सुक्या बेरीची पावडर मीठासोबत घेतल्याने पोटदुखीमध्ये त्वरित आराम मिळतो.

लोणचे अगदी मिरचीच्या लोणच्याच्याच कृती ने करायचे. मोहरीच्या डाळीचा मसाला घालून.

छान!
हे आमचे कालचे शिल्लक. पुऱ्या ताज्या आहेत.
या मदत करायला ..

IMG_20220403_151036.jpg

विचारलं सासूला.. एव्हरेस्ट चं तीखालाल, आगरी मसाला आणि गोडा मसाला घातलाय म्हणाली.. कमी उजेडात फोटो काढलाय म्हणून मटण रस्सा वाटत असावा

वाहते पान ठेवले तर जुने फोटोज उडून जातील ना... असे कसे चालेल... मी तर आठवड्यातून एकदाच बघतो सगळे मेनू.. मजा येते...

>>>मी तर आठवड्यातून एकदाच बघतो सगळे मेनू.. मजा येते...
मग तुम्ही सर्व फोटोंचे पर्सनल कंपायलेशन करत जा ना त्यासाठी, माबोचा डेटाबेस कशाला वेठीस धरायचा? Wink

Pages