खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!

अळूवडी..बासुंदी..पाणीपुरी.. सामोसे.. सगळेच भारी..

मंजूताई ..कालच्या ताटात..खोट्टा..मडगने.अळूवडी.. बटाटयाचे काप ..भेंडी भाजी..सांबर..डाळ भात.. फोटो काढेपर्यंत सरमिसळ होईल म्हणून ते ताटात घ्यावे लागले.. नाहीतर ते केळीच्या पानातच वाढले होते सगळ्यांना..

हाहाहा
गोड खीरी, बासुंदी प्राणप्रिय.
पाणीपुरी तर फर्स्ट लव्ह Happy

आम्ही सांबार पोहे खातो, तर्र्री पोहे कधी खालले नाहीत.>> मी सांबार पोहे कधी खाल्ले नाहीत.. पुढच्या वेळेस करून बघेन.. माझा नवरा ही तर्री एकदम भन्नाट बनवतो..मलाही जमत नाही तशी.. त्याच्याकडून सविस्तर कृती घेऊन पाकृ मधे लवकरच टाकेन Happy

तर्री पोहे मस्त, मला आवडतात. पण आम्ही मुद्दाम तर्री करत नाही. कढण किंवा उसळीची तर्री घालून खायचे पोहे.
आमच्या ऑफिसच्या इथे हा भन्नाट प्रकार मिळायचा. पोह्यांवर मिसळ तर्री किंवा सांबार किंवा चटणी टाकायची, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर अन मस्त लिंबू पिळून खायचे. बहुतेक पब्लिकचा हाच नाष्टा असायचा.

Pages