Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिंकी मी ४ विंडो एकदाच ओपन
पिंकी मी ४ विंडो एकदाच ओपन करून wfh करतेय..त्यामुळे तेवढे जमत नाही आहे..
काकडीची तवसोली... कोकणात
काकडीची तवसोली... कोकणात सांदण....धोंडस म्हणतात..
नवीन Submitted by श्रवु् on 31 July, 2020 - 15:50
>>>>>>>>>
श्रवू नॉस्टेल्जिक केलेत हो. बरेच वर्षे झाली हे खाऊन. तेव्हा आज्जी खूप छान करायची. तो हळदीच्या पानांचा वास नुसता नाकात शिरला की भूक चाळवायची. ..
पाकृ जमल्यास लिहा खरेच. आईला पुन्हा आठवण करून देता येईल. थोडक्यात महत्वाचे लिहा जमेल तसे. आणि मराठी टायपिंगचा प्रॉब्लेम असल्यास मला द्या ईंग्लिशमध्ये लिहून. मी करतो रपरप टाईप
आणि हो धागा काढायला शून्य हिंमत लागते
नक्की प्रयत्न करेन..
नक्की प्रयत्न करेन..
श्रवु, तुमच्या सगळ्या रेसिपी
श्रवु, तुमच्या सगळ्या रेसिपी चांगल्या आहेत, अन लिहा हो बिनधास्त, विचार नाही करायचा जास्त. एकदा लिहून बघा, मग नंतर कश्या भराभर धागे काढाल.
इकडे लिहिलेल्या नंतर शोधणे कठीण होईल म्हणून लिहाच वेगळा धागा काढून☺️
बाहेर मस्त पाऊस आणि गरमागरम
बाहेर मस्त पाऊस आणि गरमागरम होममेड पॉपकॉर्न.
श्रवू काकडीची तवसोली खोबरे
श्रवू काकडीची तवसोली खोबरे वडी सारखी दिसतीए,चव कशी असते?
@श्रवु् , @झंपी
@श्रवु् , @झंपी
खूप धन्यवाद ! KERA , KPL दोन्ही ऍमेझॉन वर दिसत आहेत , ते वापरून पाहतो फक्त खूप जुने नको मिळायला ..
पुण्यात एक लाकडी घाना आहे , ideal कॉलनी जवळ , का कोण जाणे पण ते नाही फार आवडले , खोबरेल तेल तरी ..
परत एकदा धन्यवाद !
अजून काही माहिती असेल तर जरूर सांगा ...
चिन्मयी ,पॉपकॉर्न घरी कसे
चिन्मयी ,पॉपकॉर्न घरी कसे केलेत ?
जाई, बाजारात साधे सुके
जाई, बाजारात साधे सुके मक्याचे दाणे मिळतात ते आणलेत. जाड बुडाच्या पातेल्यात थोडंसं तेल गरम केलं. त्यात मीठ, हळद , थोडं लाल तिखट घातलं. मग थोडं ढवळून मक्याचे दाणे टाकले. एकत्र पुन्हा ढवळून वर घट्ट बसेल असं झाकण ठेऊन दिलं. २-३ मिनीटात पॉपकॉर्न तयार. फाटफाट आवाज येतो खूण म्हणून. तो बंद झाला की झाकण काढायचं.
ओह ! सोपं आहे हे
ओह ! सोपं आहे हे . थँक्स
मृणाली..तवसोलीची चव मस्त
मृणाली..तवसोलीची चव मस्त लागते ..ज्यांना गोड आवडते ..त्यांना नक्कीच आवडेल..
चिन्मयी पॉपकॉर्न मस्त दिसतायत
चिन्मयी पॉपकॉर्न मस्त दिसतायत..मुसळधार पडणारा पाऊस..गरम गरम पॉपकॉर्न..आणि एकदा कॉमेडी मूवी .. हेराफेरी.. चमेली कि शादी ..किंवा समीर विशाखाच एखादे प्रहसन..भन्नाट ..
ACT-II पाकिटातून केलेले
ACT-II पाकिटातून केलेले पॉपकॉर्नही बरे लागतात. आमच्याकडे करतात अध्येमध्ये. कसे ते मी बघायला विचारायला गेलो नाही. ओवनमध्येही होतात वाटते.
सुके मक्याचे दाणे तेल मीठ
सुके मक्याचे दाणे तेल मीठ तिखट लावून कुकर मध्ये टाकावेत , कुकरला नुसते वरून टोपण ठेवावे , खालून जाळ लावा
तयार पाकिटेही मिळतात , त्यात मक्याचे दाणे तेल लावून पैक केलेले असतात , ते कुकरमध्ये तापवा
दाणे घालण्यापूर्वी कुकर गरम असताना थोडे बटर घातले की बटर फ्लेवर चे पॉपकॉर्न मिळतात , एखादे चॉकलेट वितळून त्यात दाणे घालून पॉपकॉर्न केले तर चॉकलेट फ्लेवर चे तयार होतात,
खेडोपाडी नाग पंचमीला चिरमुर्याच्या भट्टीत ज्वारी पिशवीत घालून देतात , मग ते लगेच त्याचे भट्टीत लाह्या करून देतात , मक्याच्याही देत असावेत
चिन्मयी, माझी मम्मी
चिन्मयी, माझी मम्मी ज्वारीच्या लाह्या करते. थोडावेळ मिठाचे पाणी लावून सुकवून घेते. मग कढई गरम करून त्यात हे ज्वारी दाणे घालून झाकायचे. मधेच एकदा हलवून मग आवाज कमी झाला की उतरवायचे. मस्त होतात
VB मला खूप आवडतात ज्वारीच्या
VB मला खूप आवडतात ज्वारीच्या लाह्या. नागपंचमीला नैवेद्य असतो आमच्याकडे त्याचा. दुध,दही,तूप साखर आणि आंब्याची साठं घालून. वर्षभर ती चव रेंगाळते जीभेवर.
चीज पॉपकॉर्न कसे बनवायचे काही आइडिया आहे का कुणाला? मल्टिप्लेक्सला मिळतात तसे.
व्हेज चायनीज पुलाव
व्हेज चायनीज पुलाव
छोले
शिरकुर्मा
छोले..शीरखुर्मा ..व्हेज पुलाव
छोले..शीरखुर्मा ..व्हेज पुलाव..मस्त मेनू आहे.. हे छोले .. अमृतसरी छोले आहेत ना.. आपल्या माबो वरचे.
मटण बिर्याणी आणि मटण पुलाव
मटण बिर्याणी आणि मटण पुलाव यामध्ये फरक असतो की दोन्ही सेम असतात?
मायबोली छोले
मायबोली छोले,
मटण बिर्याणी साठी शिजलेला भात
मटण बिर्याणी साठी शिजलेला भात वापरतात.. आणि मटण पुलाव मध्ये मटण थोडे शिजल्यावर त्यात तांदूळ घालून पुलाव करतात.. कदाचित ह्यापेक्षा काही वेगळाही फरक असू शकेल..
हो,
हो,
बिर्यानी 2-3 स्टेप
पुलाव - आधी तुकडे व मसाला शिजवून त्यातच तांदूळ घालणे
ब्लॅककॅट, मस्त मेन्यु! मी पण
ब्लॅककॅट, मस्त मेन्यु! मी पण नेहमी करते शिरखुर्मा आज कशी काय विसरले ...
ब्लॅककॅट , छान मेन्यू
ब्लॅककॅट , छान मेन्यू
आज बिर्याणी नाही का केलीत ?
मंजूताई हीच आहेत ना केनाची
मंजूताई हीच आहेत ना केनाची पाने, खात्री करून घेते...आज सोसायटी च्या ग्राउंड वर बघितली.. म्हणजे जेव्हा हवी तेव्हा काढून आणता येतील..
मंजूताई दिवस कुठे संपला आहे.
मंजूताई दिवस कुठे संपला आहे. बनवून टाका ..शीरखुर्मा .. देर आये..दुरुस्त आये ..
श्रवु, हो हीच पाने.... ह्या
श्रवु, हो हीच पाने.... ह्या दिवसात कुठेही दिसते काल परत केली होती भजी शेजारच्यांची भांडी द्यायची होती त्यात घालून दिली.
दूध व शेवया घरगुती घेते त्या ह्यावर्षी घेतल्या गेल्या नाहीत दोन्ही नाही.
आमच्याकडेही आज हाच विषय होता.
आमच्याकडेही आज हाच विषय होता. लॉकडाऊन नसते तर मुंबईहून मटण आणि शीरखुर्मा आले असते.
शीरखुर्मा गोड आणि ड्रयफ्रूट्स वगैरे घालून हेवी असल्याने माझ्या विशेष आवडीचा नाही. पण ईदचे पोसलेल्या बकरयाचे मटण फार आवडीचे. कच्चे मटणही बरेच ओळखीचे मुसलमान देतात. ते चरबीयुक्त मटणाची चव नेहमीच्या बकरयापेक्षा काही खासच असते.
आमच्या कडे आज ईद स्पेशल खीर
आमच्या कडे आज ईद स्पेशल खीर आणि चिकन बिर्याणी.
अमृतसरी छोले वर आणा कुणीतरी
अमृतसरी छोले वर आणा कुणीतरी किंवा लिंक द्या plz
काय एकेक पदार्थ आहेत..
बस जलते रहो(धाग्याचं ब्रीदवाक्य)
Pages