खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही भाकरीचं पुडींग बनवणार होता ना.. >> हो, हो बनवणार ना. गेल्या शनिवारी भरली वांगी केली. मस्त जमली. (मधुरा सौजन्य)
माझ अजून डेरिंग होत नाहीये, तज्ञ मंडळींना पुडिंग बद्दल सांगायच. :). चला या शनिवारी नक्की.

साबुवडे भारीच. मृणाल.
म्हळसा तुमचं भाकरीचे पुडिंग एवढं डोक्यात फिट्ट बसलय , मी काल शिळी भाकरी कुस्करताना आधी पुडिंग करू असंच मनात आलं होतं Lol

Happy मुलीला तासभर भरवून झाल्यावर प्लेटींग करायला पेशन्सच नव्हता, ताट घेतले आणि घाईत फोटो काढला,पुढल्या वेळी अगदी सजवून काढेन हो फोटो.

पुलाव , केक छान, उपवासाचे ताट बघूनच पोट भरले.
अस्मिता, धन्यवाद , तो टेबलक्लॉथ म्हणजे लग्नातली शाल आहे . :

Pages