खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हमारे यहाँ पावभाजी का बेत आहे. फोटो टाकता येत नाही. ( टाकायची इच्छा नाही, कृपया कसे टाकायचे सांगू नका.)

एकदा मी कढईत खाली मीठ पसरवून स्टीलच्या भांडयात केक बनवला तो मधे खोल खोल होत गेला.
नवर्याच्या वाढदिवशी हौशीने बनवलेला, संध्याकाळी 6.30ला नवरा ऑफिसातून येणार होता. 6 वाजता केक रेडी होता.
मी आणि मुलं खूप एक्साईट होतो सरप्राइज द्यायला पण माझ्या केक ने मलाच सरप्राईज दिले. केक बघून वाटल मुलांचा हिरमोड होणार पण जरा विचार केला , घरात थोडे चोकलेट्स, बिस्किटे होती, ती वापरली आणि सजवला. मुलं खुष.IMG_20200814_171141.JPGIMG_20200814_171125.JPG

मटण, रस्सा अन भाकरी

IMG_20200815_213435.jpg

Screenshot_20200816-132351_Gallery.jpg

तांदुळाची भाकरी,चवळीची उसळ,दही,सांडगी मिरची,पापड,कुरडई.
माझा या धाग्यावर प्रचि टाकायचा पहिलाच प्रयत्न.
माबोवर घरी पाव,केक इ. करणारे सगळे जण एकसोएक सुगरण आहेत. पण उगाच प्रतिसाद वाढायला नकोत म्हणून रोज प्रतिसाद देत नाही.

@कमला, अगदी साधं जेवण असलं तरी छान वाटतं. चवळीची उसळ छानच दिसतेय.

रॉकेट इडली पहिल्यांदा ऐकले, पाहीली. फक्त आकारात फरक असतो की आणखी काही?

आणि ती केरळची थाळी वाटतेय. मला सवय आहे हा उकडा तांदळाचा भात खायची.

मस्तच बेत सगळयांचे. मंजू आणि श्रवू दोघींच्या इडल्या भारी दिसतायत.

श्रावण महिन्यात एकदा तरी पुरणपोळ्या व्हायलाच हव्यात. म्हणून आज केल्या. ह्या वेळेस कणकेचा भिजवलेला गोळा मी पाण्यात टाकून ठेवला होता दोनेक तास. पण मस्तच झाल्या पोळ्या त्या कणकेच्या. आता नेहमी असंच करणार.

IMG_20200816_141505.jpg

Pages