Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरली शिमला मिरची
भरली शिमला मिरची
उकडला बटाटा, कॉर्न किस , कांदा , सुके खोबरे किसून , बेसन परतून मिश्रण करून भरले
@मानव पृथ्वीकर सर, धन्यवाद.
@मानव पृथ्वीकर सर, धन्यवाद. श्रवुतै रॉकेट इडलीसाठीची ती पाने कसली आहेत? हेमाताई पुरणपोळ्या अगदी सुरेख दिसताहेत. चवीला पण अप्रतिम झाल्या असणार.
शिमला मिरची मस्त दिसतीए,
शिमला मिरची मस्त दिसतीए, खावीशी वाटतीये बघून.
वाटीतली कढी आहे का?
ममो,पुरणपोळ्या एकदम सुरेख !
ममो,पुरणपोळ्या एकदम सुरेख ! शुक्रवारी मीही केल्या होत्या.पण मैद्याच्या.पाण्यात भिजवलेली कणिक परत पीठ घालून मळली का?
मृणाली,ब्लॅककॅट ताटं मस्तच.
Blackcat ताट मस्त
Blackcat ताट मस्त
श्रवू, रावस म्हणजे मासा का?
श्रवू, रावस म्हणजे मासा का?
कढी आहे
कढी आहे
पुरणपोळ्या कसल्या लुसलुशीत
पुरणपोळ्या कसल्या लुसलुशीत दिसतायत. आता कराव्याच लागणार.
विबीचे मटणाचे ताट मला दिसलेच नाही
मानव इडली बॅटर सेमच आहे.. आणि
मानव इडली बॅटर सेमच आहे.. आणि हा गावचा उकडा तांदूळ मस्तच लागतो माशाच्या कढीबरोबर..
मंगलोर वरून केरळ फक्त ७ तासाचे अंतर आहे..तर थोडाफार सारखेपणा .. केरळ ला माशाच्या कढीला ghasshi म्हणतात..
कमला ती पाने फणसाची आहे..
मृणाली रावस मासा आहे तो..
Blackkat भरली मिरची.. मस्त दिसतेय.
मनीमोहोर पुरणपोळी मस्त खुसखुशीत दिसतेय. मला खूप आवडते..
पोहे (नुसतेच, साधेसुधे)
पोहे (नुसतेच, साधेसुधे)
शनिवारचा गृहपाठ. : एकदम सुपर
शनिवारचा गृहपाठ. : एकदम सुपर टेस्टी. सोया सॉस, विनेगार, टोमॅटो केचप घालून केलेली चिनी व्हेज रेसिपी. एक एक लाल, पिवळी, हिरवी ढोबी मिरची, कोबी, गाजर, दोन बटाटे, आल, लसूण, दोन कांदे, कांदा पात, गाजर, कोबी आणि काजू (मूळ रेसिपीत शेंगदाणे आहेत, शिवाय मी साखर, थोडी तबास्को आणि ३ लहान लाल मिरच्या अॅड केले ).
तज्ञ मंडळींनी एकदम हॉटेलसारखी चव अशी पावती दिली. शिवाय वन डिश मील सारख. फक्त भात टाकला की संपूर्ण जेवण तयार. आबाल वृद्धांना आवडेल ही माझी गॅरंटी. मला एकदम बालवर्गातून पाचवी सहावीत प्रमोशन मिळाल्याच फिलींग आलं.
(रेसिपी संजीव कपूर Kung Pao यू ट्यूब वर)
दिसतेच आहे मस्त.
दिसतेच आहे मस्त.
छान दिसतेय
छान दिसतेय
असं चिनी भोजन घरच्याघरी जमू लागले की मग चिनी मालावर पुर्ण बहिष्कार शक्य होईल
(No subject)
मृणाली मस्त पोहे आणि थाळी
मृणाली मस्त पोहे आणि थाळी दोन्ही.
विक्रमसिंह मस्तच दिसतय.
पुपो बद्दल सगळ्या ना थँक्यू.
पाण्यात भिजवलेली कणिक परत पीठ घालून मळली का? >> देवकी , हो मळली परत पण चटकन होते आणि खूप छान होते. फक्त कणिक भिजवताना थोडी घट्ट सर भिजवायाची म्हणजे गोळ्याला वरून जे पाणी लागलेलं असत त्यात ती परफेक्ट सैल होते. तसेच मळताना तेल आणि मीठ ही घालायचं नेहमी प्रमाणे.
मृणाली मस्त पोहे आणि थाळी
मृणाली मस्त पोहे आणि थाळी दोन्ही.
विक्रमसिंह काय टेम्प्टींग दिसतंय ... लाॅकडाऊन वहिनींना फळलंय...
श्रवू किंवा अजून थोडी
श्रवू किंवा अजून थोडी दक्षिणेकडील मंडळी, औठेंटिक सांबारची रेसिपी लिहिणार का? माझं सांबर जरा वरणाकडेच जास्त झुकत.
ते घरी सांबर पावडर सुध्दा करून बघितलीय पण जरा जमलं नाही बहुतेक.
आपलं तयार सांबर पावडर वापरूनच करेन.
तुम्ही कसं करता सांगाल का?
तुम्ही कसं करता सांगाल का?थोडक्यात
आमच्या टिपिकल तामिळ घरमालकिणी
आमच्या टिपिकल तामिळ घरमालकिणी कडून शिकलेली मुरूंगकाय(शेवग्याच्या शेंगा) सांबार रेसिपी.
साहित्य.1.तुर डाळ १ वाटी
2.३ टोमॅटो
3.8-9 सांबर ओनिअन्स(शेलोट्स) नसतील तर एक मिडीयम कांदा
४.3 लसूण पाकळ्या
५.मिरची पावडर
६.सांबार पावडर
७.हळद
८.हिंग
9.चिंचेचा कोळ
१०.शेवगा
११.जिरे, मोहरी, मीठ
क्रुती :- कूकरमध्ये तूर डाळ, 4-6 छोटे कांदे,3 टोमॅटो,3 लसूण पाकळ्या टाकून 3 शिट्ट्या करून घ्या.
दुसरे भांडे गैस स्टोव्ह वर ठेवा. फोडणी ला तेल टाका, तेल तापल्यावर मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, कांदा, हळद , शेवगा टाका. जरा परतून घ्या मग चिंचेचा कोळ,मिरची पावडर, सांबार पावडर,मीठ टाकून उकळून घ्या, चिंचेचा रॉ स्मेल जाईपर्यंत. मग पाहिजे तितके पाणी टाकून उकळू द्या. कोथिंबीर टाका.गैस बंद करा.
हे मिश्रण कूकरमध्येच शिजवलेल्या डाळीत टाका.एक शिटी करून घ्या.
सांबार तयार. गरम गरम भाताबरोबर खा.सोबत आप्पलम (पापड)असेल तरी बास.
मी घरीच बनवते सांबार पावडर.
मी घरीच बनवते सांबार पावडर. आधी एवरेस्ट ची वापरायचे.
बाकी कुणाची दाक्षिणात्य सांबार बनवायची वेगळी पद्धत. असेल तर सांगा.
एवहरेस्ट पेक्षा बादशाह ची
एवहरेस्ट पेक्षा बादशाह ची सांबर पावडर अधिक टेस्टी असते... आणि पावभाजी मसाला पण बादशाह चा च....
माझी सांबार रेसिपी
1 . शिजवलेली तुर डाळ 1 वाटी
2. भोपळा , कोहळा , वांगे , बटाटा , थोड़े मटार ( मिळतील त्या भाज्या.. पण या असतील च असे पहा )
3. तेल
4. बादशाह चा सांबार मसाला आणि लाल मिर्ची पावडर
5. लिम्बाईतका चिंचेचा कोळ
6. राई, जीरे , थोड़े मेथी दाणे , 1 मोठा कांदा बारीक चिरुन , 2 चमचे आले लसुन पेस्ट
7. मीठ
8. 15 ते 20 कढ़ीपत्ता ची पाने
9. 1 लहान चमचा साखरेचा पाक ( नसेल तर साखर ही चालेल )
◆ तेल तापवून त्यात राई , जीरे, हींग , मेथी दाणे फोड़णी करून त्यात कढ़ीपत्त्याची पाने घालावित
◆ आता त्यात आले लसुन पेस्ट टाकून लालसर झाली की चिरलेला कांदा घालून तो सोनेरी वगेरे होउ द्यावा.
◆ आता त्यात सर्व भाज्या टाकून मस्त परतून घ्याव्यात.
◆ मग त्यात सांबार मसाला आणि थोड़ी लाल मिर्ची पावडर टाकून यथेच्छ परतून घ्यावे .
◆ शिजवलेली डाळ ,चिंचेचा कोळ , मीठ , साखर पाक आणि हवे तितके पाणी घालून संबार उकळू द्यावे.
【 सखरेच्या पाकाने चव अजुन खुलून येते 】
शेवगयाच्या शेंगा विसरले त्या
शेवगयाच्या शेंगा विसरले त्या असल्याच पाहिजे सांबारात
तुम्ही कसं करता सांगाल का?>>>
तुम्ही कसं करता सांगाल का?>>>>
तूरडाळ कुकरमधून शिजवावी.एका भांड्यात लाल भोपळा,बटाटा,शेवग्याच्या शेंगा(मस्ट),टॉमेटो,कांदा एकत्र शिजवून घेणे.शिजल्यानंतर डाळ घालून एकत्र करणे.चिंचेचा कोळ+गूळ घालायचा. कढईत खोबरेल तेल घालून हिंग+राई+३-४ मेथीदाणे+ कढीलिंबाची फोडणी करायची.कढईखालचा गॅस बंद करून तेलात मिरची पावडर+ सांबार मसाला घालायचा.ही फोडणी शिजलेल्या पदार्थात घालून उकळी काढणे.सांबार मसाला मी घरीच बनवते.
अनिश्का, तुम्ही दक्षिणेकडची
अनिश्का, तुम्ही दक्षिणेकडची सांबार रेसिपी म्हणताय का?
इथे होसुर मधे आणि माझ्या सासरी (आंध्रप्रदेश)गुळ आणि साखर अजिबात घालत नाहीत सांबर मधे. अगदी कोणत्याही भाजीत.
मृणाली दक्षिणीतिल गुरुआयुर
मृणाली दक्षिणीतिल गुरुआयुर टेम्पल मध्ये एक ओळखीचे होते त्यांनी संगितलेले
सांबर मसाला ची रेसिपी लिहा
सांबर मसाला ची रेसिपी लिहा प्लीज
May be प्रसादाच्या सांबार मधे
May be प्रसादाच्या सांबार मधे घालत असतील गोड.
बंगलोर आणि केरळमध्ये
बंगलोर आणि केरळमध्ये खाल्लेल्या sambharat गोड चव होती.इथे मुंबईत शेट्टीच्या हॉटेलमध्ये साखर असतेच.खूप गोड होतच नाही.
एकीने मला सांगितले होते की थोडासा कांदा+ खोबरे भाजून सांबार मध्ये घाल छान लागते.खरेच आहे ते.
मी टिपिकल तामिळ घरी बनवतात ती
मी टिपिकल तामिळ घरी बनवतात ती पद्धत सांगितली, होटेल च्या रेसिपीज माहिती नाहीत.
पुण्यात पण होटेल मधे सांबार गोड खाल्ले आहे.
सांबार पावडर रेसिपी
सांबार पावडर रेसिपी
● 1 n 1/2 tablespoon चना डाळ
● 1 n 1/2 tablespoon उडद डाळ
● 1 tablespoon तूर डाळ
● 8-12 सुक्या लाल मिरच्या
● 4 tablespoons धणे
● 3/4 teaspoon मेथी दाणे
● 2 teaspoon जिरे
● 2 स्प्रिंग कडीपत्ता
● 1/8 teaspoon हिंग
● 1/4 teaspoon हळद
सगळं छान भाजून घ्या.
गार झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राईंड करा.
सांबार पावडर तयार.
इतर भाज्यांमधे पण हा मसाला घालू शकता.
Pages