खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा उभा चिरून, खोबरे, धणे, लाल मिरच्या सर्व तव्यावर भाजून वाटण बनवावे ........ खतखत्यात कांदा भी घालत आमच्याकडे.बटाटा , केळी,सुरण,लालभोपla,थोडी गवार,एकत्र शिजवायचे.खोबरं चिंच एकत्र वाटून शेवटाला त्यात तिर्फळे ghastaychi.ते वाटण या भाजीत घालायचे.गूळ ghalayache . गॅस बंद केल्यावर खोबरेल telàchi धार सोडून मुरू द्यायचे.
काही जण यात थोडीशी शिजवलेली तूरडाळ घोटून घालतात.

थोडक्यात उरलेल्या kinvà urvalelya bhajyanchà हा टेस्टी प्रकार आहे.

सगळ्यांचे मोदक सुरेख! आणि नैवेद्याची ताटं ही छान.
मी " खदखदलं" ऐकलंय आमचे फॅमिली फ्रेंड्स होते, ती काकू करायची खदखदलं मिक्स भाज्या, मक्याचे कणीस घालून. मस्त टेस्टी एकदम

श्रवू थँक्स.
कशाकशात घालतात? चव कशी असते?

मृणाली..तिरफळे माशामध्ये पण घालतात.. खास करून बांगड्यामध्ये.. बांगड्या हुमन किंवा आंबट असे म्हणतात त्याला .. गोवा स्पेशील..

माझ्या आजोळी होन्नावरला श्रावणात कांदा लसूण खात नाहीत.. त्यावेळी कुठल्याही आमटीत असे चेचून घालतात..एक वेगळाच छान सुगंध येतो..

झणझणीत मोदक रस्सा
>>>
हायला.. हि तर स्पर्धेची ॲवार्ड विनिंग एंट्री होती. तुम्ही भाग नाही घेत आहात का स्पर्धेत?

पाफा - धागा काढायचा विचार आहे.. दोन एक दिवसात काढेन Happy
ऋ,च्रप्स - स्पर्धेसाठी सविस्तर रेसिपी लिहावी लागेल ओ.. मला तर रेसिपीसोडून इतर फाफटपसाराच लिहायला आवडतो.. त्यामुळे स्पर्धेत भाग घ्यायचा विचार नाहीए Happy पण धागा नक्की काढेन

शनिवारचे होमवर्क. मधुरा रेसिपी आणि इतर अभ्यास करून.
तज्ञ लोकांनी पाचवीचा पेपर म्हणून ८/१० मार्क व दहावीचा असेल तर ३/१० असे मार्क दिलेत. बालक मंदिरातील विद्यार्थी खूष आहेत.
IMG-20200823-WA0050[1].jpg

चांगले तर दिसताहेत, कळ्यांचा आकाराची सुगरण लोकांच्या मोदकाशी तुलना न केल्यास. खूप छान सुबक जमले तर खुष व्हावे, नाही जमले तर त्यात काय एवढं? इतके कष्ट करून सुबक करून शेवटी कचकन तुकडा पाडून कचा कचा चावूनच खायचे आहे ना.

साबुदाणे वडे, तिखट मोदक सगळेच मस्त..

विक्रमसिंह मोदक छान तर दिसतायत.. अजून एक दोन वेळा ट्राय केलं तर दहावीच्या पेपरला ८/१० मिळतील.. तुम्हाला एक नवीन आयडिया सांगते.. मोदक एकदम नेमीप्रमाणेच करायचा फक्त कळ्या नाही करायच्या नुसता वरती टोकदार नाक करायचे.. आणि मोदकावर टूथपिक ने खोलवर रेषा मारायच्या. इतक्या सुंदर रेखीव कळ्या होतात.. मी असेच करते.. पण हाताने कळ्या केल्याचं समाधान वेगळेच असते..

विक्रमजी, तुमचे कवतिक... हातभार लावूनतुमचा भार कमी केलेला दिसतोय ...image_0.jpeg
हे आमचे डिकन्स्ट्रेकटेड मोदक!

हातभार लावूनतुमचा भार कमी केलेला दिसतोय ...>> नाही हो. १०० % सेल्फ मेड. फक्त सारण मात्र तज्ञ लोकांनी आधीच करून ठेवलेले वापरले. त्यांनी सेफ्टी म्हणून स्वतः तळलेले मोदक केले होते आधीच. (भिडू फारसा विश्वासू वाटत नसावा) Happy

IMG_20200826_144046.jpg तुरीची उसळ

Pages