खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजी वेगळी बनवून तव्यावर टाकायची??
जस्ट क्युरीसीटी म्हणून विचारतेय, कुठल्या भागात बनवतात अशी इडली?

तेलात थोडे कांदा टोमॅटो परतवा , तो त्याच तव्यात पसरवा , मग त्याचे तव्यातच 3-4 वाटे करा, त्यावर डाळीची चटणी असल्यास पसरवा , एकेक वाट्यावर थोडे थोडे इडली बेटर घाला व थोडा वेळ झाकून ठेवा , बेटर एकदाच स्पॉट घालायचे , जास्त पसरवायचे नाही

3 , 4 छोट्या इडली तयार होतील , एका बाजूला ते मिश्रण लागलेले व एक बाजू पांढरी

https://youtu.be/1qFtR5y9E6w

हैदराबाद special आहे.. आधी भाजी वेगळी बनवून घे.. पॅन वर तेल टाकून ती भाजी पसरव मग त्यावर पीठ घाल.. एका पेक्षा जास्त इडली करावी लागतील ना.. म्हणून..

सगळ्यांच्या एक से बढकर एक पाककृती बघून मला राहवलं नाही मग टाकले जेवणाचे फोटो इथे..

mutton paya soup.jpeg

मटण पाया सूप

chicken lollipop.jpeg

चिकन लॉलीपॉप

ravas thali.jpeg

रावस रस्सा, रावस फ्राय,
तांदूळ, गहू, बाजरी आणि नाचणीची मिक्स भाकरी

मस्त पदार्थ एक एक. तोंडाला पाणी सुटलं.
भाकरी तर माझी ऑल टाईम फेवरेट. पण बनवता येत आणि खायला मिळत नाही.माहेरी गेल्यावरच मिळते खायला. Happy

केशर काजूकतली मस्त दिसतेय वैदेही. रुपाली छान मेनू.
श्रवु तू सांगत्येस ते उत्थप्प्या सारखं लागेल का? कि वेगळी लागेल चव? करून बघायला पाहिजे

धनुडी नेहमीप्रमाणे कांदा टोमॅटो तिखट भाजीवर केले तर उत्त्तपम सारखे लागेल. पण जर पारंपरिक पद्धत म्हणजे त्या भाजीत मिश्र डाळीची पूड घालायची असते..तर वेगळे छान लागेल..
मी फारसे नाही बनवत..माझ्या घरी स्टिम केलेली गरम गरम इडलीच आवडते..आणि मला तर काय सगळे शॉर्टकट मारायची सवय..

IMG_20200901_235609_400.jpg

Aloo paratha
Curd
Mint dip

नेमका करपलेल्या पराठा फोटो साठी घेतला गेला, सारणात मस्त किसलेलं चीझ होतं.. कष्टाचं चिज झालं

काजूकतली मस्तच... माझी आवडती मिठाई
@किल्ली - छान जेवणाचा बेत...

धन्यवाद श्रवू, मृणाली, मानवजी, धनुडी, लताकुंर.

थँक्स जाई.

रूपाली हो मटन सुप कसे बनवले सांगा.
माझी एक पद्धत आहे, तुमचे काय वेरीएशन आहे ते कळेल.
आमच्या कडे आवडते सगळ्यांना.
Happy

धन्यवाद जाई..
सॅण्डवीच खूप छान दिसतेयं.. मृणाली.
आज जमलं तर नक्की टाकते पाया सूपची रेसिपी..

IMG_20200904_134651.JPG
शेवरस्सा,दोडक्याची भाजी, रस्सम राईस

मटण पाया सूप

साहित्य -१) बोकडाच्या पायाचे तुकडे ( चार पाय ),
२) १ चमचा आलं - लसूण पेस्ट
३) १ चमचा आलं - लसूण तुकडे ( चिरून )
४) एक मोठा कांदा ( बारिक कापून)
५) कांद्याची पात ( लहान जुडी)
६) दोन हिरव्या मिरच्या
७) एक चमचा लिंबूरस
८) एक चमचा व्हिनेगर
९) जीरे ( १ चमचा)
१०) काळीमीरे ( ५ ते ६ )
११) एक चमचा लाल मिरची पावडर
१२) लहान चमचा हळद
१३) एक चमचा धणे पावडर
१४) मीठ
१५) २ ते ३ चमचे गायीचे तूप किंवा तेल

‌कृती - प्रथम बोकडाच्या पायाचे तुकडे स्वच्छ धुवून कुकरमधे चार ते पाच शिट्टया घेवून शिजवावे. तेलावर किंवा तुपावर ठेचलेले जीरे, काळमिर्‍याची पूढ घालून हिंगाची फोडणी घालावी. नंतर आलं लसूण तुकडे, चिरलेली मिरची टाकावी त्यांनतर चिरलेला कांदा घालून थोडा वेळ परतवावा. कांदा थोडासा गुलाबी झाल्यावर चिरलेली कांद्याची पात घालावी. नंतर लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर , आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. वरिल मिश्रण परतून झाल्यावर शिजवलेले बोकडाच्या पायाचे तुकडे टाकावे. त्यावर व्हिनेगर व लिंबाचा रस टाकावा व चवी पुरते मीठ टाकून हवे तेवढे जरा कोमट केलेले पाणी घालावे. चार ते पाच कुकरच्या शिट्टया घ्याव्यात. सूप तयार झाल्यावर वरून चिरलेली कोथिंबिर पेरावी.

जाई, मृणाली तुमच्यासाठी रेसिपी..

धन्यवाद रुपाली
वेगळा बाफ काढून त्यात पोस्ट करा फोटो आणि रेसिपी म्हणजे लगेच मिळेल
इथे प्रतिसाद वाढले की हरवून जाईल

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 September, 2020 - 21:21
मस्त मांसाहार! मन भरले बघूनच Happy

आखरी पास्ता
एक्स्ट्रा अमूल बटर मार के..
आणि पिझ्झासोबत आलेली मिर्चमसाला पाकिटे त्यावर हलकेच शिंपडली..
एक लंबर.. पोरं तुटून पडली Happy
संध्याकाळी ताट चाटून पुसून साफ केल्यावर रात्री दोन वाजता पुन्हा बनवायला लावला

Pages