खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

VB , मृणाली पु-या बघून खाव्याशा वाटताएत.. आणि नंतरच्या फोटोत पनीर आहे का?

नाही.
अंड आहे, फोडून वाली रस्साभाजी.
Happy

अच्छा, मस्त दिसतेय. कशी केली? - हे अंड्याच्या रश्श्यासाठी विचारतेय,

मी हे टाके पर्यंत व्हि बी ने दुधीची भाजी पोस्ट केली. तिची भाजी पण चांगलीच आहे. पण मी रेसिपी नाही विचारणार ( for obvious reasons मला दुधीची भाजी एवढी आवडत नाही. दुधी हलवा, खीर , पराठा, कोफ्ते अशा ऑप्शन असताना मी दुधीची भाजी नाही करत. भरीत पण आवडतं)

आम्ही मागचे 6-7 महिने भाजी मार्केट ला जात नाही आहोत.
सोसायटीच्या खाली भाजीवाला आला तर ठिक नाहीतर शेवरस्सा, सोयाचंक्स, बटाटा,अंडी असले काही बनवते.

आज बनवले बेसनगट्टे रस्साIMG_20200917_145959.JPG

थँक्स
दुधीची साले अन आतला गर वेगवेगळा अगदी थोड्या तेलात परतून घेतल्या, त्याची पेस्ट केली, त्यातच छोटा कांदा, चार लसूण पाकळ्या, छोटा चमचा जिरे घालून पेस्ट केली.
कढईत तेल तापवून हिंगाची फोडणी केली त्यात ती पेस्ट घातली, नीट परतून त्यात तिखट मीठ हळद चिरलेली दुधी घालून परत परतून गरम पाणी घालून शिजवली.

अच्छा, मस्त दिसतेय. कशी केली....

सोपीच आहे.
आले-लसूण पेस्ट, कांदा ,टोमॅटो, मिरची पावडर,छान परतून घेऊन मग पाणी टाकून, उकळी काढून, अंडी फोडून टाकून,दहा मिनिटे शिजू द्यायचे.(तेल,मीठ,हळद टाकून)
अंडी शिजली की भाजी तयार, गरम गरम चपातीसोबत खायचे। Happy

VB छान रेसिपी
मी करत असते वेगवेगळ्या प्रकारे दुधी..
पण ते सालं कशी लागतात ग्राईंड केल्यावर?

Lol VB

धनुडी☺️
मृणाली, साल नीट फाईन पेस्ट झाल्यावर वेगळे असे लागतच नाही, छान मसाल्यासारखी चव येते

मृणाली,व्हीबी, भाज्या मस्त दिसताहेत.

व्हीबी,छान दिसतेय ग भाजी आणि सोपी पण आहे.नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही करून बघेन.तशी ती मोदकाची आमटीपण करायची आहेच.

मस्तच

दुधीची साले अन आतला गर वेगवेगळा>>>
आतला गर म्हणजे आतला दुधी ना??

छान आहेत सगळे पदार्थ. अंड्याचे फोडून कालवण हिरव्या रस्स्यात करायचे, खूप भारी लागते. कांदा खोबरे भाजून घ्यायचे, त्यात हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर, हळद, आले लसूण घालून वाटायचे आणि मग त्या ग्रेव्हीत अंडी फोडून घालायची.

अंड आहे, फोडून वाली रस्साभाजी.
>>>>>
ओह प्लीज रस्सा भाजी बोलू नका Proud

बाई दवे, आमच्याकडे अंड्याचे कालवण बोलतात.
अंडे नसल्यास नुसतेच कांद्याचे कालवण बोलतात. त्यात मस्त भावनगरी गाठ्या टाकून खायचे गरमागरम...

सगळे पदार्थ मस्त मस्त. व्हिबी आता दुधीची भाजी अशी करून बघणार. पिझ्झा बॉम्ब , नावच भारी आहे, लगे हाथ रेसिपी पण द्या.

उत्तप्पा

वर्णिता, एवढया लवकर पूर्ण जेवण, मस्तच

Pages