खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तप्पा >> अच्छा , त्यावर कांदा बिंदा घातला नाही त्यामुळं ओळखता नाही आला.
मी डायरेक्ट जेवते त्यामुळं लवकर Happy :.

IMG_20200911_120207__01.jpg
दुपारचा कलरफुल मेनू Happy
लाल भोपळा पराठा, बीटाची भाजी, मुगाचे वरण, भात, लोणचे, ठेचा, दही, सॅलड

नुसते खाल्ले तर डिटोक्स

कापून , शिजवून , बचकभर तेल घालून , फ्राय करून खाल्ले तर ते आणि लाकडाचा भुसा एकच

वर insert file ऑप्शन दिसतो का? असेल तर तो वापरा send to text ऐवजी.

जर मायबोली App वापरत असाल तर insert file हा ऑप्शन ही दिसत नाही बहुतेक. Web browser वापरा फोटो देण्यासाठी.

मस्त च

लावण्या, अहो ईतका खटाटोप करुन फोटो टाकलात तर आता का काढुन टाकला.
छान होता की.
दुसर्यांबद्द्ल जास्त विचार करायचा नाही.
तसेही इथे सगळे आपलेच आहेत, तुम्हाला प्रोत्साहनच देतील

Pages