खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी ताई, सिंपल आहे.
चपाती बनवताना मधे चीज स्लाईस ठेवून लाटायचे.
तूप टाकून शेकायचे. ती चीजचपाती आमच्यासाठी नाही.
फक्त मुलांसाठी. आवडीने खातात. त्यांच्या आवडीची भाजी नसली तर नुसती च खातात.

आईने आज बनवलेली मटन बिर्याणी आणि चिकन करी.
मला नुसताच फोटो. उदास बाहुली.
>>>>

कसली खतरनाक दिसतेय बिर्याणी... नुसता फोटो बघूनच मन चटक मटक झाले...

चपाती बनवताना मधे चीज स्लाईस ठेवून लाटायचे.
तूप टाकून शेकायचे
>>>
हे ट्राय करायला हवे
आमच्यकडे दोन्ही मुले एकाचवेळी दोन तीन चीज स्लाईस नुसत्याच मजेत खातात. चपातीही खाल्ली तर बरेय

नुसता फोटो बघूनच मन चटक मटक झाले...

होना.. बिचारी मी... Proud

आमच्यकडे दोन्ही मुले एकाचवेळी दोन तीन चीज स्लाईस नुसत्याच मजेत खातात....

माझी मुले पण असच करतात. फ्रिज लौक करते मी, मग मुलीला उघडता येत नाही. Happy
चपातीत टाकून पोटभरीचे होते ना...

@मृणाली मस्तच.. तुम्ही रस्सम पावडर घरी करता कि कसे? घरी करत असाल तर रेसिपि प्लीज..

@म्हाळसा बिर्याणी एकदम लाळ गाळू आहे. बिर्याणीची स्टेप बाय स्टेप रेसिपी लिहा न.

आमच्यकडे cheese butter दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत चं टिकते.. Proud Proud Proud

@श्रवु
<<शीतल मोदक बघूनच तोंडाला पाणी सुटलंय.. आणि मोदक फोडून अजून जळवतेयस..त्या फोडलेल्या मोदकात वरून मस्त पैकी तुपाची धार सोड..मी पटकन खाऊन टाकते..>> ये तू माझ्याकडे मग करते पुन्हा.

मस्त स्पॉंजी ढोकळा दिसतोय.

तुम्ही रस्सम पावडर घरी करता कि कसे? घरी करत असाल तर रेसिपि प्लीज

रस्सम पावडर अशी वेगळी नाही बनवत मी.
पण घरीच बनवलेले जीरे पावडर,मीरे पावडर आणि हिंग मस्ट आहे. बाकी रस्सम रेसिपी लिहिली होती तीच आहे.

ढोकळा, चीझपोळी यम्मी, वर्मिसिल्ली उपमा छान दिसतोय. पहिल्यांदाच नाव ऐकलं. रव्याच्या शेवया ना ह्या की वेगळ्या असतात.

वर्मिसेली ओरिजिन बहुतेक इटालियन आहे.
तामिळ लोक टिपीकल्ली वर्मीसिल्ली म्हणत असावेत.

टिपीकल्ली वर्मीसिल्ली Lol

माझे तामिळ उच्चार इतके ठिक नाहीएत हो.
मी जेव्हा ईथे तामिळ बोलते तेव्हा हसतात ईथे मला..तरीही मी बोलते Proud

आम्ही बॉम्बिनो शेवया पाकीट आणून त्या शेवयांचा उपमा करतो. आजच केला होता. साबांचा मुलगा आणि माझी मुलगी नाक मुरडतात. तरी करतेच मी अधेमधे.

यम् दिसतय...
रात्रीचा स्वयंपाक अजून व्हायचाय...छोटी भूक लागलीए खरं....सूप बघून वाढली.... Happy

Wow
म्हाळसा , amazing
मला खायला कधी बोलवताय
इकडे पार्सल पाठवून द्या नाहीतर

मस्त वेफलस...

आमच्यकडे इडली मशरूम चिल्ली

IMG-20200911-WA0000.jpg

मला खायला कधी बोलवताय>> किल्ली, तडक नीघून यावे:)
थॅंक्स वर्णिता - ही वाॅफल मेकरची कमाल आहे

@म्हाळसा, माझी मुले काही विदेशी मुलांचे गमतीदार विडिओ बघत असतात. त्यात पाहिले होते. Waffle बनवताना..
काय मटेरियल असते? आणि ते थोडे क्रिमी लिक्विड डायरेक्ट ओततात का waffle maker मधे?

Pages