Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रात्री दोन वाजता कुणी कुणाला
रात्री दोन वाजता कुणी कुणाला बनवायला लावला?
पास्ता, मॅगी आमच्याकडे मी आणि
पास्ता, मॅगी आमच्याकडे मी आणि मीच बनवतो. त्यामुळे संध्याकाळीही घरचे ईतर ज्येष्ट सदस्य झोपले असताना मीच पोरांसाठी बनवला होता. (घरचे सगळे झोपले असतानाचा टाईम पोरांना फार आवडतो. स्वानुभव)
आणि रात्री परीने मला पुन्हा बनवायला लावला. बदल्यात मी आधी तिच्याकडून छान तेलमालिश विथ हेअरस्टाईल करून घेतली
रूपाली थँक्स फोर मटण सुप
रूपाली थँक्स फोर मटण सुप रेसिपी.
धन्यवाद सामो.
ऋन्मेष, पास्त्यात थोडेसे
ऋन्मेष, पास्त्यात थोडेसे कॉर्न घाल.मस्त लागतात.
ओके कॉर्न नोटेड. छान लागावेत
ओके कॉर्न नोटेड. छान लागावेत असे वाटतेय.
मला खरे तर पास्ता हल्लीहली पोरांमुळे आवडू लागलाय आणि मी खाऊ, बनवू लागलोय. आधी कधी बनवायचो वा खायचो नाही. त्यामुळे पास्तावर मॅगीसारखे प्रयोग केले नाहीत अजून फारसे.
मिसेस ला करोना झाल्या मुळे
मिसेस ला करोना झाल्या मुळे ती सध्या ऍडमिट आहे. त्या मुळे सध्या मुलांकरिता मी डोसा आणि चटणी प्रथमच बनविले आणि विशेष ते मुलांना आवडले, मेहनतीचे सार्थक झाले.
छान बनवलाय की पहिल्यांदाच.
छान बनवलाय की पहिल्यांदाच.
तुमच्या मिसेसची तब्येत कशी आहे आता?
तिला private हॉस्पिटल मध्ये
तिला private हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे, आता ती हळू हळू रिकव्हर होत आहे.
डोसा झकास दिसतोय. पेपर थिन.
डोसा झकास दिसतोय. पेपर थिन.
मस्त झालाय डोसा.. मिसेस घरी
मस्त झालाय डोसा.. मिसेस घरी आल्यावर त्यांनाही खाऊ घाला आणि इथे फोटो टाका
मला खरे तर पास्ता हल्लीहली
मला खरे तर पास्ता हल्लीहली पोरांमुळे आवडू लागलाय>>>>>> माझ्यासाठी ही लॉकडाऊन्ची देणगी आहे.
उदयगिरी, काळजी घ्या.मिसेस घरी आल्या की इथे कळवा.
पास्ता छानच दिसतोय.
पास्ता छानच दिसतोय.
मला वाटतं, खुप सारे बटर,चीज आणि क्रिम टाकले कि मस्त होत असावा. माझ्या कडून हे कंजूष सारखे टाकले जाते.
(No subject)
कालचा मेनू
कालचा मेनू
मस्त
मस्त
कोल्हापूर स्पेशल झणझणीत भरले
कोल्हापूर स्पेशल झणझणीत भरले गोळे अन मोदक रस्सा.
म्हाळसा यांचा मोदक रस्सा धागा बघितल्यापासून इच्छा होती तसे मम्मी ला बोलून दाखवले होते अन आज तिने सरप्राईज दिले. सारण अन मसाल्यात खूप फरक आहे पण त्यांच्या अन मम्मीच्या.
कधितरी म्हाळसा पद्धतीने पण करायचे आहे☺️
आहा मस्त बेत. व्हीं बी
आहा मस्त बेत. व्हीं बी मम्मीची पा. कृ.टाक ना.
धन्यवाद मृणाली.
धन्यवाद मृणाली.
आज झणझणीत मिसळ केली होती,
आज झणझणीत मिसळ केली होती, फोटू काढला नै
थेट पोटात
@VB मस्तच दिसतोय मोदक रस्सा..
@VB मस्तच दिसतोय मोदक रस्सा.. तुमच्या पद्धतीनेही करून बघेन लवकरच
देवकीताई, धागा काढला
देवकीताई, धागा काढला मुद्दाम, कारण मलाही फायदा होईल कधीतरी
https://www.maayboli.com/node/76565
म्हाळसा धन्यवाद, तुमच्या पाकृमुळे बर्याच वर्षांनी मम्माने बनवले गोळे,
आम्ही गोळेच म्हणायचो / म्हणतो याला.
धन्यवाद व्हीं बी ...ata
धन्यवाद व्हीं बी ...ata करायला कधीचा मुहूर्त लाभतो ते पाहू.
लोणचे करायला कारले मीठ हळद
लोणचे करायला कारले मीठ हळद लावून ठेवले होते
त्याचे पाणी , तसे प्यायला मस्त वाटले , 2 च चमचे पिले , मीठ फार आहे , नुसती हळद लावून पाणी निघत नाही का ? ते पाणी सगळे पिता येईल
पुढल्याखेपेस थोडेसेच मीठ
पुढल्याखेपेस थोडेसेच मीठ लावून पहा.मग चांगले लागेल.
आईने आज बनवलेली मटन बिर्याणी
आईने आज बनवलेली मटन बिर्याणी आणि चिकन करी.
मला नुसताच फोटो. उदास बाहुली.
चिकन करी कोल्हापूरी लाल तिखटाची. वर्षभराचा बनवून ठेवते. माझ्यासाठी पण बनवला होता.
मी उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणार होते ना...परत उदास बाहुली.
बिर्याणी व चिकन करी काय छान
बिर्याणी व चिकन करी काय छान दिसते आहे.
मृणाली, रंगच सांगतोय की
मृणाली, रंगच सांगतोय की कोल्हापूर तिखट आहे
हो ना...धन्यवाद..
हो ना...धन्यवाद..
आता कधी कोरोना जाणार अन मी कधी सांगलीला जाऊन आईच्या हातचे बनवलेले खाणार........
Wow Muttun biryani slrrp
Wow
Muttun biryani slrrp
अय्यो काय भारी आहे!
अय्यो काय भारी आहे!
जाल जाल माहेरी लवकर!
Pages