खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी विचार करतोय रविवारी केलेल्या उचापत्यांचा एक धागाच काढावा.
चिक्खेन बिर्यानी व चिक्खेन रोस्ट इन अ‍ॅप्पेपॅट्र (हो हो इंग्रज अस्सेच बोलतात)....एकत्रच
झलक.......
IMG_20200920_121302.jpgIMG_20200920_121411.jpgIMG_20200920_121924.jpgIMG_20200920_122126.jpg

IMG_20200923_172803.jpgतळणीचे मोदक

सगळे मांसाहारी स्टार्टर्स तोंलासु आहेत
त्या चिकन आप्पेपात्राचा काढा नवीन धागा.. पैसे नाही पडत Happy

सगळ्यांचे सगळे पदार्थ भारी एकदम तोंपासु.. लावण्या तुम्ही कुठला फोटो टाकला होता.. मी बघितलंच नाही.मी नवीन ४९ नवीन पोस्ट बघूनच आले.. आप्पेपात्रातले चिकन मी पण करून बघणार आहे..

कोणी तळलेला मासा का नाही टाकला..का कोणास ठाऊक आज मला फिश फ्राय खायची खूप इच्छा झाली होती.. ऑफिसमधून रात्री ८-०० वाजता आल्याने, मासे नाही आणता आले.. त्यात जबरदस्त पाऊस..ट्रॅफिक जॅम.. ट्रेन बंद..अशावेळी आईची खूप आठवण येते..

मस्त मोदक. सातारी कंदी पेढे तर जबरदस्त दिसतायत.

मी विचार करतोय रविवारी केलेल्या उचापत्यांचा एक धागाच काढावा.>> जेम्स बाँड माझ पण सॅटरडे होमवर्क फेमस झालय. आता पब्लिक डिमांड असते. उद्या फोटो टाकीन.

कंदी पेढे म्हणजे इंद्रदरबारातील पक्वान्न.. अहाहा... रेसिपी टाका.

<<चिक्खेन बिर्यानी व चिक्खेन रोस्ट इन अ‍ॅप्पेपॅट्र (हो हो इंग्रज अस्सेच बोलतात). >> Proud Proud Proud

आगयाया... राडाच कि!!! लय भारी दिसतय, सोडून टाका धागा..

First time made frosting cake, a chocolate truffle cake

राहिलेला..

IMG20200919162526 (1).jpg

भाकरीचे लाडू मस्त दिसतायत ...शीतल तुम्ही मागे पण अशाच एका लाडूचे फोटो टाकले होते..ते पोळीचे होते वाटते..ते पण मस्त होते..

माझ पण सॅटरडे होमवर्क फेमस झालय. आता पब्लिक डिमांड असते. उद्या फोटो टाकीन.
महाराज लवकर टाका फोटो.....वाट बघायले सगळे :))

हे केक वगैरे चे फोटो टाकणारे एकजात सगळे माझे दुश्मन आहेत असे मी जाहीर करतो.
तळणीचे मोदकही छान आहेत. जनरली उकडीचे मोदक पश्चिमेकडे नी तळणीचे मोदक उत्तरेकडे (म्हाराष्ट्राच्या)

कोणी तळलेला मासा का नाही टाकला>>
श्रवु, तुमच्या साठी.

या शनिवारी केला होता सुरमई फ्राय.

IMG-20200924-WA0017.jpg

लटांकुर .मासा मस्त आवडला..पोटभरून बघून घेतला.. सॉरी हा तुमचे नाव नीट लिहायला जमले नाही.. मृणाली मला २.५ आणि तुला ०.५ मासा..

modak.jpgpasta.jpgchitranna.jpg गेल्या काही दिवसात केलेले पदार्थ. तळणी चे मोदक. साग्रसन्गीत पास्ता :). आणि lemon rice (हळद विसरली आहे Happy )

Pages