खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

रुचातै मुग धिरडं/डोसा/चिला भारीय.
दही-पुदीना चटणी बरोबर तर अप्रतिम लागतो.

देवा लिहीत लिहीता तर मृ तैनी ताटच आणलं वाढुन.

शनिवारचे होमवर्क : पपईची भाकरी. (अंजली यांच्या रेसिपी वरून)
IMG-20200927-WA0021.jpg
छान झाली होती.
तज्ञ मंडळींनी पपईचा रस वापरून गोड पोळीही केली.(मी काढलेल्या रसावर आपली पोळी भाजून घेतली. Happy )

श्रवु, देवकी, मृणाली सगळ्यांना धन्यवाद.
जेम्स बॉण्ड पुदिना नाही पण माझ्या फेव्हरेट नारळ कोथिंबीर चटणी सोबत मला खायला आवडले असते पण ते बनवायचा पेशन्स नव्हता.
गरम गरम सॉस सोबत खाऊन घेतले. मला फक्त ऋचा म्हणा.

खाल्ल्यानंतरही परत भूक लागते हे फोटो व रेसेपीज बघुन. एकेक जण कमाल आहेत. अप्रतीम सादरीकरण व चविष्ट जेवण.

वर्णिता, कारल्याच्या भाजीची रेसेपी प्लीज द्याच.

जेम्स बॉण्ड यांना मनःपूर्वक धन्यवाद . त्यांनी अतिशय क्रमवार पद्धतीने फोटो कसा टाकायचा ते सांगितले आहे . ती पद्धत वापरून फोटो टाकायला जमले . बरेच दिवस प्रयत्न करत होते फोटो टाकायचा .

रूचाचे धिरडे , mrunali चे ताट , विक्रमसिंह यांची भाकरी आणि हा अश्विनी यांचा बटाट्यावड्याचा टॉवर ,
यम यम .....

आठवड्याने आले तर खाउगल्लीला केवढी गर्दी ! सगळ्यांचे पदार्थ यम्मी यम्मी दिसतायत.
शीतल केव्हाही ये. वेलकम.
रश्मी .. >> नेहमीसारख्याच केल्यात कारल्याच्या चकत्या. मीठ लावून थोडा वेळ ठेवायच्या. मग घट्ट पिळून घेऊन , तेलात मोहरी, हिंग,हळद,लसूण, लाल तिखट घालून परतायच्या. वरून तीळ, शेंगदाण्याचे कूट, साखर घालून परत कुरकुरीत होईपर्यंत परतायच्या.

@मृणाली, सातू(सू)चे पीठ?

सातूचे पीठ माझ्या सासूबाई पाठवतात, त्यामुळे मी त्याला सासूचे पीठ म्हणतो. Lol

मस्त दिसताएत ताजं ताजं भरले गिलके/घोसाळे..

देवकी, ते हेल्दी मिक्स आहे.
12 प्रकारचे धान्य, कडधान्ये, सुका मेवा भाजून,दळलेले पीठ.
बनवताना गुळ आणि पाणी घालून ते मिक्स..
आठ महिन्याच्या बाळाला सुरु करतात..
इकडे मोठी माणसे थोडे लिक्वीड टाईप बनवून पीतात (मी नाही पीत) मुलांचा नाष्टा. Happy

सासूचे पीठ Lol

माझ्या सासूबाई मिरची पावडर पाठवतात (गुंटुर मिरची)
सासूचे तिखट म्हणू काय मग Lol

Pages