चंपक यांचे रंगीबेरंगी पान
झ्येंडा !!!
गेल्या आठवड्यात झेंडा चित्रपट पाहिला..! एका पुनःस्थापित होउ इच्चिणार्या राजकीय नेत्याची छबी काळी करण्याचा प्रयत्न आहे असे वाटले. पण त्यात सामान्य कार्यकर्त्यांची जी घुसमट दाखवलीय...ती लाजवाब! प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने अगदी मनाला भिडले.
सगळे नेते सारखेच! कार्यकर्ते वापरुण घेणे अन सत्तेत सहभाग फक्त जवळच्या लोकांनाच देणे, हा एकजात धंदा! कार्यकर्त्यांना पण त्या वयात काही अक्कल नसते! नुसती मेंढरं, कुणी पण हाका.
शेवटी जेंव्हा नेत्याचे पण पाय मातीचेच आहेत, हे लक्षात येते, तोवर कार्यकर्त्याची माती झालेली असते!
पद्मभुषण माननीय श्री बाळासाहेब विखे पाटील
माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हार्दिक अभिनंदन!
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43013:2...
लोणीत जल्लोष!
राहाता - पद्मभूषण पुरस्काराने विखेंना सन्मानित केल्याचे वृत्त येताच लोणीसह शिर्डी, राहाता भागात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी झाली. लोणीत विखेंच्या अभिनंदनास कार्यकर्त्यांची रीघ लागली.
आरोग्य सेवेची नाडी...!
काल मायकेल मुर चा डॉक्युमेंटरी कम चित्रपट असलेला सिको SICKO हा माहितीपट पाहिला. आरोग्य विमा कंपन्यांच्या कारभाराचा उत्तम पंचनामा त्यात केलेला आहे. मी २००२ पासुन परदेशात असल्याने अनेक प्रकारे हे अनुभव 'सहन' केले आहेत. विद्यार्थी म्हणुन असताना सोशल सिक्युरिटी नसताना केवळ पैसे भरा अन कव्हरेज काहीच नाही असा मामला. चार वर्षे नियमीत ग्राहक असुनही, जेंव्हा एकमेव वेळी डॉक्टर कडे जाणे झाले तर, तो आजार (तळपायाला झालेले इंफेक्शन!:)) कव्हर होत नाही असे ऐकावे लागले!
गुर्हाळ!
श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:
सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.
१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.
सिडनी फेस्टीवल.. भारतीयत्वाचा जय हो!
लेखन प्रकल्पासाठी सहभागाचे आवाहन
Dear Friends,
I am embarking on a new literary project. This is a Marathi book with "20*20" as the title. Apart from the usual 20/20 or 6/6 perfect vision or "India 2020" vision, the title is so because I am going to compile 20 stellar profiles of young budding Marathi administrators along with 20 implementable and practical ideas collected from Marathi folks for betterment of India. Hence the name of the book is "20*20".
ग्रंथाली वाचक चळवळीच्या उपक्रमांची माहिती
सप्रेम नमस्कार
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे.
या स्पर्धीची प्रश्नावली सोबत पाठवत आहे.
आपल्याला आवडेल, मजा येईल.
त्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
आपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.
जास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.
आपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.
प्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या जयंती निमित्य जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
"जिजाऊ जयंती" निमित्य आणि "राष्ट्रीय युवक दिन" निमित्य हार्दिक शुभेच्छा, आणि सर्व युवकांना जिजाऊ.कॉम तर्फे एक आवाहन
हि एक मनापासून घातलेली साद आहे आपला थोडा वेळ हे वाचण्यासाठी द्यावा. मला खात्री आहे आपल्यातला मराठी माणूस जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच ह्याची मदत होईल.
नववर्षाची (पुस्तक) भेट!
Pages
![Subscribe to RSS - चंपक यांचे रंगीबेरंगी पान](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)