कुठे थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तर कुठे नळ उघडे ठेवून अक्षरशः हजारो लिटर पाणी फुकट चाललंय...
कुठे "टाकाऊतून टिकाऊ" तत्वावर कचर्यातून सौंदर्य शोधलं जातंय तर कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच नैसर्गिक सौंदर्य नष्ट करतोय...
कुठे सौरउर्जा, पवनचक्क्यांसारखे अपारंपारिक उर्जा स्त्रोत अधिकाधिक कसे वापरता येतील ह्यावर प्रयत्न चाललेत तर कुठे अजूनही ओली लाकडे जाळून प्रदुषण वाढतंय ...
एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर दुसरीकडे स्वार्थापायी किंवा अज्ञानामुळे चालू असलेली पर्यावरणाची अपरिमीत हानी...
जरा उघड्या डोळ्यांनी आणि सरसावलेल्या कॅमेर्याने हा विरोधाभास टिपायचा प्रयत्न करूया ?
गणेशोत्सव २००९ - फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक
*********************************************************
स्पर्धेचे नियम :
१. ह्या स्पर्धेसाठी
दोन (२) छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे.
छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: अपारंपारिक उर्जा स्त्रोत, उर्जेचा तसेच साधनसंपत्तीचा पुर्नवापर, वृक्षारोपण ई. (renewable energy, recycling, tree plantations, water conservations, etc.)
छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: प्रदुषण, पर्यावरण हानी, उर्जेचा गैरवापर ई.
(pollution, deforestation, wastage of energy & water resources, garbage dumping, etc.)
२. दोन्ही छायाचित्रांचा परस्पर संबंध असणे गरजेचे नाही. मात्र छायाचित्रांच्या माध्यामातून योग्य तो संदेश दिला गेला पाहिजे. छायाचित्रांचा मूळ उद्देश हा पर्यावरणाबद्दलची जागरूकता हा असावा.
३. दोन्ही पैकी फक्त एकाच विषयावर पाठवलेले छायाचित्रं बाद ठरवले जाईल.
४. दोन्ही छायाचित्रे काढलेल्या स्थळाचे नाव देणे बंधनकारक आहे. शक्य असल्यास थोडी माहिती पण द्यावी.
५. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.
६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम छायाचित्र एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.
७. ह्या स्पर्धेत मतदान हे निनावी पद्धतीने घेतले जाणार असल्याने छायाचित्रावर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.
८. छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
९. एका आयडी तर्फे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
१०. छायाचित्रं स्वत:च काढलेलं असावे.
११. छायाचित्रं आधी मायबोलीवर प्रकाशित झालेलं नसावे.
१२. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
*********************************************************
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
*********************************************************
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना
sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : paryavaran असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी जास्तीत जास्त ७५० x ५०० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी आणि छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
*********************************************************
आलेल्या प्रवेशिका: