नमस्कार,
सध्या कंपनी मध्ये Go Green Go Green चे वातावरण आहे. त्यासाठी कंपनीत एक गट तयार केला आहे. आणि आता सर्वांना t-Shirt वर "पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे. यासाठी आपली मदत आवश्यक आहे.
- वाक्य शक्यतो मराठीतच पाहिजे आहे.
मला आतापर्यंत मिळालेली वाक्ये:
१) हिरवा साज, हिरवा बाज
भूमाईची राखू लाज
२) झाडे लावा झाडे जगवा...
३) कमीत कमी पोल्युशन
हेच उत्तम सोल्युशन
४) झाडे लावा आणि झाडे जगवा
पुढच्या पिढीला द्या स्वच्छ हवा
५) निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका
६) प्रायोगिक :
आणि झाडे नग्न झाली
ऐतिहासिकः
इथे गवताला भाले फुटतात
रोम्यांटिक :
झाडे लावा , झाडे जगवा , झाडे वाढवा , आडोसे मिळवा
सामाजिकः
मेधाने लावली झाडे चार
झाडाला पाणी देई सरदार
नरेंद्र त्यांचा राखणदार
हिरवे झेंडे नर्मदेपार
लोककला:
सोसंना गं ऊन बाई श्रावणाचं,
काळिज म्हणायचं का रावणाचं,
सावलीत घ्या पाखरू,
अन राया चला वृक्षारोपण करु.
७) स्वप्न उद्याचे..
हरीत निसर्गाचे.....
८) करू संवर्धन पर्यावरणाचे...
घडवू राष्ट्र समृद्धिचे, सुखाचे....
९) निसर्गाने तुम्हाला सृष्टी सौंदर्य दिले, तुम्ही निसर्गाला काय देणार ?
१०) झाडे लावा, मजेत र्हावा
११) एक मूल,.....झाडे चार.........
१२) झाडावर प्रेम करा....
झाडाखाली नको....
१३) झाडे लावा उष्णता कमी करा.
१४) "आम्ही सृष्टीचे शिलेदार
करु धरती हिरवीगार"
१५) पर्यावरण छान
उंच भारताची मान
१६) वाढवून झाडा॑चा हिरवा साज,
आपलेच आयुष्य वाढवू आज.
-- श्रीवर्धन --
वृक्षवल्ली अम्हा सोयरी
वृक्षवल्ली अम्हा सोयरी
आपल्या वाढदिवसाला मिळून सारे
आपल्या वाढदिवसाला मिळून सारे आपण
दरवर्षी नियमाने करू वृक्षारोपण
झाडे जगवाल .... तरच
झाडे जगवाल .... तरच जगाल
पर्यावरणाचे रक्षण करा .... मनुष्याला दुर्मिळ प्राणि होण्यापासुन वाचवा
'चिऊ' ला संपवले, 'काऊ' ला तरी वाचवा .... झाडे लावा - झाडे जगवा ...
'चिऊ -काऊ' च्या गोष्टी
'चिऊ -काऊ' च्या गोष्टी मुलांना ख्रर्या वाटु द्या ...
आपल्याच अंगणातील झाडांवर त्यांना बागड्ताना बघु द्या ...
पर्वा करणं निकडीचं पर्यावरण
पर्वा करणं निकडीचं
पर्यावरण खूप गरजेचं