Submitted by आरती. on 7 July, 2015 - 05:07
स्वतःच होमस्टे सुरु करताना तसेच दुसर्याच्या होमस्टे मध्ये राहताना येणार्या अडचणी, तसेच फायदे तोटे ह्याबद्दल चर्चा करू या.
नीधप, शिर्षकासाठी धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होमस्टे काय प्रकार आहे म्हणजे
होमस्टे काय प्रकार आहे म्हणजे पेईंग गेस्ट का?
पिनुल, होम-स्टे म्हणजे जर
पिनुल, होम-स्टे म्हणजे जर तुम्ही कुठे पर्यटनाला गेलेले आहात आणि हॉटेल मधे न राहता चार दोन दिवस तिथेच राहणार्या कुणाकडे तरी होम-स्टेची सोय आहे. म्हणजे दोन दिवस तुम्ही त्यांचे पेड पाहूणे.
एक ग्राहक म्हणून अपेक्षा:
एक ग्राहक म्हणून अपेक्षा:
१) स्वच्छ बेडरूम. व लॉकरची सोय. धुतलेले व इस्त्री केलेले बेड्शीट व अभ्रे, आणि स्वच्छ पांघरूण.
२)स्वच्छ टॉयलेट व अंघोळी ची व्यवस्था. शॉवर प्रेफरेबली.
घंगाळ व तांब्या पण चालेल.
३) अंघोळी साठी गरम पाणी.
४) प्रायव्हसी. - होम स्टे आहे म्हणून घरातले लोक कायम आपल्यच बेडरूम मध्ये ठाण मांडून बसू नये.
५) पैसे देउन ब्रॉड बँड इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी.
६) कार पार्किंग.
७) केबल कनेक्षन असलेला टीव्ही.
८) एसी
९) सेफ्टी ची गॅरंटी. चोरी मारी होउ नये सामानाची. किंवा जिवाला अपाय वगैरे.
१०) ऑनलाइन बुकींगची सुविधा. ऑफ सीझन मध्ये कमी भाडे.
जरा ग्राहकांच्या अपेक्षा
जरा ग्राहकांच्या अपेक्षा जास्तच दिसत आहे (५/२,६,७,८,९,१०).
आखुड शिंगी बहुगुणि.
ओके दुसरी म्हण
अन्न छ्त्रात जाउन मिरपुड मागणे
आपलि वाडी
जरा ग्राहकांच्या अपेक्षा
जरा ग्राहकांच्या अपेक्षा जास्तच दिसत आहे >> जरा एकदा https://www.airbnb.com/ वर चक्कर टाकुन या.
अमा, खूप छान मुद्दे लिहिले
अमा, खूप छान मुद्दे लिहिले आहेत.
उमेशप, ५ ते १० हे मुद्दे काळाची गरज आहे. ११. इन्व्हरटर
सविस्तर लिहिन लवकरच.
बी धन्यवाद, ह धागा तुमच्या को़कणच्या धाग्यावर सुचला.
अमा तुम्च्या अपेक्षा रास्तच
अमा तुम्च्या अपेक्षा रास्तच आहेत, पण त्या होट्ल स्टे म्हणुन ठीक आहेत, एखाद्याला कोकणात पर्र्याय हवा असेल तर ईतर सोयी मिळणे शक्य नाही.जसे पैसे देउन ब्रॉड बँड इंटरनेटची सुविधा ,केबल कनेक्षन असलेला टीव्ही,एसी ईत्यादी मला हि होम स्टे बद्द्ल माहीती हवी आहे, चिपळुन च्या पुढे पार रत्नागीरी पर्यन्त.असे कोणी आहे का ?
एखाद्याला कोकणात पर्र्याय हवा
एखाद्याला कोकणात पर्र्याय हवा असेल तर ईतर सोयी मिळणे शक्य नाही. <<<< होमस्टेमध्ये शक्य आहे आणि त्या देणारेही आहेत.
I will prefer to stay in
I will prefer to stay in Resort
आरती असे कोणि असेल तर खरच
आरती असे कोणि असेल तर खरच सुचवा कारण प्रत्येक वेळी आम्हि चिपळुन पर्यन्त जातो पण पुढे जाणे होत नाहि.कारण राहाण्याचि सोय होत नाहि.
Resort हा पर्यय आहे पण तो
Resort हा पर्यय आहे पण तो १५-२० दिवसान साठी परवड्त नाही.
MTDC approved bed & breakfast
MTDC approved bed & breakfast District wise List
इथे आपण एक संकल्पना म्हणूनच
इथे आपण एक संकल्पना म्हणूनच फक्त चर्चा करूया. बाकी अमुक ठिकाणची हॉटेल्स, तमुक ठिकाणची रिसॉर्टस वगैरे माहिती वेगळ्या धाग्यांवर राहूदेत नाहीतर मग चिवडा होईल सगळा. प्लीज.
१-१० मधे फक्त जेवण सोडून
१-१० मधे फक्त जेवण सोडून बाकी सर्व उत्तम हॉटेल आणि रीसोर्टच्या लेवल च्या सुविधा आहेत.
होम स्टे म्हणजे कोकणामधल्या वाडीमधला स्टे
बाकी उच्चभ्रू चर्वितचर्वण चालू द्या
होम-स्टेचा एकच अनुभव आहे. तो
होम-स्टेचा एकच अनुभव आहे. तो ही १२-१५ वर्षांपूर्वी, हरिहरेश्वरला. तेव्हा इंटरनेट, ब्रॉडबँड, मोबाईल नेटवर्क वगैरे भानगडच नव्हती. ते वगळूनही आमचा होम-स्टे अगदी कमीत कमी सुविधा असलेला होता. ८ जणं होतो. सर्वांना झोपायला एकच मोठी खोली, बेड नव्हते, जमिनीवर गाद्या अंथरून झोपलो होतो. खोलीत एका कोपर्यात मोठं बाथरूम होतं. टॉयलेटस खोलीबाहेर थोड्या अंतरावर होती. गाद्या-टॉयलेटस सगळं स्वच्छ होतं. सकाळी चुलीवर तापवलेलं पाणी आंघोळीसाठी मिळालं. तीनही दिवस चविष्ट नाश्ता मिळाला. २ गाड्यांना पार्किंगला जागाही मिळाली.
आता होम-स्टेसाठीच्या माझ्या अपेक्षा थोड्याफार फरकाने याच असतील.
एखाद्या ट्रीप मधून
एखाद्या ट्रीप मधून प्रत्येकाला काय हवे आहे, हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे आणि 'होम स्टे'च्या संकल्पनाही व्यक्तिपरत्वे बदलू शकतात.
मला तरी 'होम स्टे' म्हणजे त्या वाडीमध्ये, वाडीतल्या लोकांसारखे राहणे अपेक्षित नाही.
चार दिवस relax व्हायला कुठे गेलो, आणि तिथे uncomfortness फेस करावा लागला तर चिडचिड होतेच.
सो अमा >>> +१००
त्या वाडीमध्ये, वाडीतल्या
त्या वाडीमध्ये, वाडीतल्या लोकांसारखे राहणे >>> 'होम'स्टे हे नाव त्यासाठीच आहे ना?
>>चार दिवस relax व्हायला कुठे
>>चार दिवस relax व्हायला कुठे गेलो, आणि तिथे uncomfortness फेस करावा लागला तर चिडचिड होतेच.
मग लक्झरीयस रीसॉर्ट असतातच की !
तिकडे रहायचा .
होमस्टे मधे दोन मेन प्रकार
होमस्टे मधे दोन मेन प्रकार आहेत आपल्याकडे.
१. घरातल्याच काही रूम्स ठराविक भाडे आकारून राहायला दिल्या जातात.
२. घराच्या बाजूने वेगळ्या रूम्स बांधून घेतलेल्या असतात. म्हणले तर प्रायव्हसी असते, म्हणले तर घराचा, वाडीचा फील असतो.
पहिल्या प्रकारचे होमस्टे कूर्ग वगैरे मधे आहेत त्यांची जी माहिती वाचलीये त्यावरून ते आवडले मला. पण कोकणात अगदी बेसिक लेव्हलचे पहिल्या प्रकारातले जे होमस्टे बघितलेत तिथे कॉलेजकाळात ग्रुपने ट्रिपला गेलेलो असताना स्वस्त मस्त म्हणून ठिक होतं पण आता जायला अजिबात आवडणार नाही.
दुसर्या प्रकाराचे बरेच होमस्टे किंवा कृषी पर्यटन टाइपच्या जागा बघितल्या आहेत तिथल्या सुविधा फाइव्ह स्टार नसतात पण वातावरण आणि जेवण फार उत्तम असते. काही ठिकाणी प्रायव्हसी असते तर काही ठिकाणी मालक आणि घरचे लोक आदरातिथ्य करायचे म्हणून सततच मधे मधे येत असतात. जरा रूमच्या बाहेर निसर्ग बघत उभे राह्यलात की कोणीतरी विचारणारच येऊन काय हवंय का? काही आणू का? म्हणून. ते जरा बोर होते. पण होतील तिथेही बदल.
४-५ च दिवस राहायचे असेल तर ब्रॉडबॅण्ड पोचले असेल, उपलब्ध असेल तर मिळाले तर ठिक. नाही मिळाले तरी ठिक. टिव्ही नसलेलाच बरा.
अजून एक तिसर्या प्रकारच्या होमस्टेबद्दल नेटवर वाचलेय ते म्हणजे संपूर्ण फंक्शनिंग असे घर/ फ्लॅट सुट्टीसाठी भाड्याने घेणे. हे कोकण किनारपट्टीवर विशेषतः वेंगुर्ल्यापासून खाली गोव्यापर्यंत बर्याच बंगल्यांमधे असते पण मध्यमवर्गीय भारतीय माणसाला ते परवडण्यासारखे नसते किंवा दिलेही जात नाही. जनरली परदेशी लोक आख्खा बंगला एकदोन महिन्यांसाठी बुक करतात. बेसिक स्वच्छता ठेवायला एखादा केअरटेकर ठेवलेला असतो मालकाने.
लले, नाही. होमस्टेची संकल्पना
लले, नाही. होमस्टेची संकल्पना तशी नाही. वाडीतल्याच लोकांसारखे राहणे अशी नाही.
शाहिर, इथे आपण आपापल्या
शाहिर, इथे आपण आपापल्या संकल्पना, अपेक्षा व्यक्त करूयात का?
मी भारतात, मुरुडला असा होम
मी भारतात, मुरुडला असा होम स्टे अनुभवलाय. एक वेगळी रुम होती. मोठे अंगण, त्यात झोपाळे वगैरे होते. काही हवे असेल तर जाऊन मागावे / सांगावे लागत होते. पण बेसिक माहिती ( काय, कुठे आहे ) आधीच दिली होती. जेवण तयार झाल्यावर सांगायला आले. जेवण साधे, चवदार होते. वाढताना आग्रह नव्हता पण अगत्य होते. कुठलाही पदार्थ मागावा लागला नाही. अंघोळीला बंब पेटवून दिला होता. गावात फिरण्यासंबंधी काही माहिती हवी होती तीदेखील नेमकी दिली गेली. जेवणाचा मेनू आधी विचारून, चालेल का असे विचारून घेतले होते.
वाडीतली शहाळी, रामफळे न मागताच आणून दिली होती..
परदेशात न्यू झीलंडला रोटारुआत आणि ओमानमधे सलालाह ला होम स्टे अनुभवलेत. घरात किचन पासून सर्व सोयी होत्या. चहा कॉफीचे सामान होते. बाकी सर्व आपण आणून शिजवावे अशी कल्पना होती. पण भांडी, डिशेस, चमचे, अवन, फ्रीज सर्व होतेच.
कोकणात किंवा भारतातही मात्र मला वेगळ्या अपेक्षा असतील. त्या कुटुंबाचाच एक सदस्य म्हणून राहता आले तर फार आवडेल. खास करून पूर्वाचलात अशी रहायची खुप इच्छा आहे.
अन्न छ्त्रात जाउन मिरपुड
अन्न छ्त्रात जाउन मिरपुड मागणे
<<
होमस्टे मधे फुकट रहायला जेवायला मिळते का?
कूर्ग किंवा गोव्यात जुन्या
कूर्ग किंवा गोव्यात जुन्या मोठ्या घरांमधे डागडुजी, थोडे बदल करून पण मूळ वास्तूचे सौंदर्य न घालवता असे होमस्टे केलेले आहेत. मी कधी राह्यले नाहीये पण नेटवर फोटो आणि फीडबॅक्स वाचून एकदातरी तिथे रहायला जायचंय.
कोकणात समहौ माडीचं सुंदर जुनं घर पाडायचं. विद्रूप असं स्लॅबचं घर बांधायचं (जे एका वर्षात गळायला लागतं) आणि मग तितक्याच डेड दिसणार्या खोल्या काढायच्या, एमटिडीसीच्या निवास-न्याहरीचा शिक्का लावून घ्यायचा आणि छपाई चालू हीच फॅशन जास्त दिसते.
>>माडीचं सुंदर जुनं घर
>>माडीचं सुंदर जुनं घर पाडायचं.
माडीचे घर असेल तर 'निवास-न्याहरी'ला परवानगी मिळत नाही का? (उलट जास्त प्रीमियम रेटिंग द्यायला हवे खरे तर.)
डिटेल्स माहित नाहीत गं मला.
डिटेल्स माहित नाहीत गं मला. पण जुन्या प्रकारच्या घरांचा मेंटेनन्स जास्त असतो आणि जुने घर हे घर म्हणून बांधलेले असल्याने खोल्या कमी असतात त्यामुळे रेटस वाढतात हे एक कारण असावे.
होमस्टेची संकल्पना एम टी डी सी ला खरंच पचते की नाही ते ही माहित नाही.
माझी बहीण काही महिन्यांपूर्वी
माझी बहीण काही महिन्यांपूर्वी कूर्गच्या होमस्टेमध्ये राहून आली. घरातच परंतु वेगळी व सेल्फ कन्टेंड स्वच्छ प्रशस्त खोली, घरगुती-ताजे-गरम-रूचकर असे शाकाहारी जेवण (अतिशय माफक दर), आजूबाजूला तुडुंब निसर्ग, नो ब्रॉडबँड इंटरनेट. मोबाईल रेंज होती बहुतेक. तिला आणखी तपशील विचारेन. फक्त हे घर एका टोकाला होतं. त्यामुळे अशा ठिकाणी जायला यायला, हिंडायला स्वत:चे वाहन असलेले बरे. घरमालक व मालकीण बाईंनी अगत्यशील वागणूक दिली. प्रायवसी होती. मुख्य म्हणजे शहरातील सर्व आवाजांपासून पूर्ण मुक्ती होती.
मस्त धागा . असा होम स्टे
मस्त धागा . असा होम स्टे मालवण ला चिवला बीच वर अनुभवला. मयेकर होम स्टे. त्यांनी चार खोल्या भाड्याने देण्यासाठी बांधल्या आहेत. अंगणातच समुद्र. दिवसभर समुद्राची गाज. अश्या ठिकाणी टीव्ही आणि ईन्टरनेट ची गरज लागतच नाही. आणि असेल तरी वापरले जात नाही.
जेवण अतिशय रुचकर आणि घरगुती.
ललिताने सांगितली तशी घरगुती
ललिताने सांगितली तशी घरगुती निवासाची सोय मीही खूप पूर्वी हरीहरेश्वरला अनुभवली आहे. त्याला होम स्टे म्हणावे की नाही, संभ्रम आहे. गणपतीपुळ्यालाही अशी घरगुती निवासाची सोय होती. मुख्य घराबाहेरच शेडवजा सेमी-ओपन प्रशस्त खोली. तिथेच जमीनीवर अंथरूण, गाद्या, पांघरूण वगैरे व्यवस्था. पंगतीचे शाकाहारी व गोडाधोडाचे जेवण. रात्री साधाच आमटी भाताचा मेनू. खोलीत अनेक माणसे झोपायची सोय. जवळच मोठा लाकडी झोपाळा. टॉयलेट, बाथरूम तिथून जरा लांब. पाळीव गावठी कुत्रं, मांजरी सोबतीला.
मालगुडी डेज मधलं घर /वाडा
मालगुडी डेज मधलं घर /वाडा अगुंबे (शिमोगा ता.) होमस्टे आहे. आम्ही तिथे फक्त जेवलो. गेलो तेव्हा जेवण तयार नव्हते. तोवर आम्ही घर फिरून बघीतलं. काचाकवड्या, सागरगोटे खेळलो. मग आजींशी स्वयंपाक घरात बसून गप्पा मारल्या. जेवण साधे कर्नाटकी छान होते.
Pages