छायाचित्र स्पर्धा

फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 17:26
"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा..." असं म्हणत आज रंगांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न चालू असतो. निसर्गातल्या रंगांपासून ते माणसांच्या रंगांपर्यंत, रंग अनेक इतिहास घडवून गेलेत, काव्य निर्माण करून गेलेत, कलाकारांना प्रोत्साहीत करून गेलेत. छायाचित्रण ही अशीच एक कला. छायाचित्रणात जेव्हा रंग टिपण्याची क्षमता आली तेव्हा त्यात खर्‍या अर्थाने क्रांती घडली. पण मग त्या पूर्वीचे छायाचित्रकार ह्या रंगांशिवाय आपली कला कशी बरं सादर करत होते? निसर्गातल्या करामती, इतिहासातल्या महत्वाच्या घटना, राजेरजवाड्यांचे ऐश्वर्य हे सगळं ह्या छायाचित्रकारांनी टिपलं ते पण रंगांशिवाय...
आज संगणक युगात छायाचित्रांचे रंग अगदी हवे तसे बदलता येतात, ते झाले तंत्र. छायाचित्रकार कॅमेर्‍याच्या डोळ्याने टिपतो ते कौशल्य. आपण पण जरा मागे जाऊन कृष्णधवल छायाचित्र काढायचा प्रयत्न करूया ? रंगांशिवाय भावभावना, निसर्ग, सौंदर्य छायाचित्रात टिपूया ?
फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी
********************************************************
स्पर्धेचे नियम :
१. विषयाचे बंधन नाही.
२. छायाचित्र 'ब्लॅक अँड व्हाईट' (Grayscale Image) अथवा 'सेपीया-टोन' (Sepia-toned Image) या २ प्रकारांमधे स्वीकारला जाईल.
३. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे. मात्र बंधनकारक नाही.
४. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम छायाचित्र एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. असे सॉफ्टवेअर वापरून कलर चा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला असल्यास, तसे छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास तसे लिहावे.
५. छायाचित्रावर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.
६. छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. एका आयडी तर्फे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
८. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
९. छायाचित्र आधी मायबोलीवर प्रकाशित झालेला नसावे.
१०. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
********************************************************
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
********************************************************
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Black & White असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी जास्तीत जास्त ७५० x ५०० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी आणि छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
******************************************************** आलेल्या प्रवेशिका:
शीर्षक प्रतिसाद
B & W प्रवेशिका क्र. २६ : जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी... - i_am_sam  संयोजक 3
B & W प्रवेशिका क्र. ७ : वाडा चिरेबंदी - Kedar_Japan  संयोजक 18
B & W प्रवेशिका क्र. २० : पायांखालची रेती सरली, तुच आधार हो गं सावली..! - sajira  संयोजक 5
B &W प्रवेशिका क्र. १ : दूध जमा करून घेणारा माणूस -nidhapa  संयोजक 12
B & W प्रवेशिका क्र. ३३ : बागडत्या धवलधारा - Paragkan  संयोजक 9
B & W प्रवेशिका क्र. १४ : ये है मुंबई मेरी जान!! - Yo.Rocks  संयोजक 10
B & W प्रवेशिका क्र. २७ : सावध हरिणी - sakheepriya  संयोजक 3
B & W प्रवेशिका क्र. ८ : छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी - itgirl  संयोजक 12
B & W प्रवेशिका क्र. २१ : शशांक - ankyno1  संयोजक 1
B &W प्रवेशिका क्र. २ : रंग माझा वेगळा -Kandapohe  संयोजक 13
B & W प्रवेशिका क्र. ३४ : रात्रीचा प्रकाश - fiona  संयोजक 1
B & W प्रवेशिका क्र. १५ : मोरपिशी निरागस बालपण - prakashkalel  संयोजक 9
B & W प्रवेशिका क्र. २८ : रविकर का तो गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला.. - Champ  संयोजक 6
B & W प्रवेशिका क्र. ९ : विचारमग्न - pat_kunal  संयोजक 7
B & W प्रवेशिका क्र. २२ : कुतुहल - Lajo   संयोजक 4

Pages


विषय: 

Pages

Subscribe to RSS - छायाचित्र स्पर्धा