B & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 23:17

शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू

bw30_modak.jpg

हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहे.. पुर्ण असायला हवा होता का? (वरती खालती कापला गेलाय..)
काय मस्त मोदक केलेत! कळ्या कशा केल्या त्याचा video हवाच (प्लीज!!)

कसले देखणे मोदक. आजवर असे कधी बघितले नाहीत. काळ्या-पांढर्‍या फोटोत तर फारच उठून दिस्ताहेत. स्पर्धेनंतर कृपा करून प्रात्यक्षिक द्यावं.

अविश्वसनीय...... मोदक इतके सुंदर दिसु शकतात हे माहितच नव्हते......

(मला एकदम माझे मोदक आठवले Happy )

अहो मोदककर्ते, नंतर विडिओ टाका हो.. मला तर कधी एकदा तो विडीओ बघतेय असे झालेय.. लवकर संपुदे ही स्पर्धा....

१५ कळ्या! मला ५ ही जमत नाहीत धड. ज्यांनी केलेत मोदक त्यांना खरच साष्टांग नमस्कार!
क्लास घ्याल का प्लिज? आता फोटोबद्द्ल Wink छानच आलाय, अर्थात विषयच देखणा आहे.

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy

Pages