गेले बारा दिवस चालू असलेल्या मायबोली गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. 'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!! हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संयोजक मंडळाला पडद्यामागच्या अनेक कलाकारांची खूप मदत झाली. ह्या मायबोलीकरांना पडद्यासमोर आणून त्यांची ओळख व आभार प्रदर्शनाचा हा एक महत्वाचा आणि गोड कार्यक्रम.
आमचीही रंगपंचमी(?)!!!
नाव - आयाम
वय - १ वर्ष २ महिने
माध्यम - फिंगरपेंट्स
धावायला सज्ज असलेला लाईनबॅकर!
नाव : हर्ष
वय : ८ वर्षे
माध्यम : साधी पेन्सिल
पालकांनी केलेली मदत : स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासून रोज सांगत होते की स्पर्धेसाठी चित्र काढ. गोडी गुलाबीने समजावून झालं, ओरडून धमकावून झालं.. शेवटी इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर जे एक चित्र काढलं ते बघून मी कपाळाला हात लावला....स्मशानभूमी वरचा ग्रीम रीपर ह्याने मायबोलीवरचा 'तो' बीबी वाचला की काय अशी शंका आली
शीर्षक : बागडत्या धवलधारा
Camera settings:
Camera:Canon EOS Digital Rebel XTi
Exposure:0.25 sec (1/4)
Aperture:f/22.0
Focal Length:135 mm
ISO Speed:100
'Picnic' चा वापर करून कृष्णधवल केले.
प्रवेशिका क्र. : ९
स्थळ: वेळास, ओलिव्ह जातीच्या सागरी कासवांचे प्रजनन ठिकाण. या कासवांच्या संख्येतील घट रोखण्यासाठी मादीने घातलेली अंडी संरक्षित जागी ठेउन ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना समुद्रात सोडले जाते. माणसाच्या हस्तक्षेपामुळे अंड्यातुन कमी पिल्ले जरी बाहेर आली तरी निदान सगळ्या अंड्याचे ऑमलेट तरी होत नाही!
प्रवेशिका क्र. : ८
छायाचित्र १ : अंधाराचा तास
सिडनी शहरातील 'green house gas pollution' कमी करण्यासाठी WWF च्या सहकार्याने आणि City of Sydney आणि New South Walse Government च्या साहाय्याने ३१ मार्च २००७ या दिवशी सिडनी शहरवाशीयांनी १ तास दिवे बंद ठेवले होते.
प्रवेशिका क्र. : ७
शीर्षक: "CFL दिवे"
CFL दिवे मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतात. हे दाखवलेले दिवे फक्त १३ वॉट्स वापरून ६० वॉट्सएवढा प्रकाश देतात.
शीर्षक: "शेकोटी"
कॅम्पिंग करताना रात्रभर शेकोटी करताना झाडांची कत्तल तर आपण करतोच, शिवाय कार्बन डाइऑक्साइड हवेत सोडून पर्यावरणाची हानी पण करतो.
शीर्षक : प्रकाशाचे दूत
चित्र क्रमांक ३
आधी संवाद, मग परिसंवाद
आमिर : हाय हिलरी! एकदम गॉर्ज्यस् दिसतीयेस!
हिलरी : यस्स्! आय डीड इट!
आमिर : काय डिड इट? मी तुझं कौतुक करतोय आणि तू अजून स्वतःतच मश्गूल आहेस?
हिलरी : मला कध्धीपासून तुला भेटायचं होतं!
आमिर : का? मलाच का? मि. बच्चनना नाही? मि. एस.आर.के. ला नाही?