गणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 22:17

गणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान सुरू करण्याआधी सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका येथे पहावयास मिळलीत.

१. कायापालट स्पर्धा :
कायापालट स्पर्धा "कविता" मतदान
कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" मतदान
कायापालट स्पर्धा "वारी..." मतदान

२. फोटोग्राफी स्पर्धा :
पर्यावरण-सकारात्मक आणि नकारात्मक स्पर्धा मतदान
कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा मतदान

विशेष सूचना : कृष्णधवल स्पर्धेसाठी मतदान थोड्या वेगळ्या पद्धतीने घेण्यात येत आहे. तिकडे प्रत्येक फोटोच्या वर १० तारे दिसतील. मतदान करताना आपण फोटोला आपल्या आवडीप्रमाणे एक ते दहा पैकी तारे देऊ शकता.

३. चित्रातल्या गोष्टी अर्थात लघुलेखन स्पर्धा :
लघुलेखन स्पर्धा मतदान

४. जय हेरंब स्पर्धा :
जय हेरंब स्पर्धा-ताल आणि राग ओळखा

५. चित्रकला स्पर्धेविषयी :
"रंगपेटी उघडू चला..!!!" ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. सर्व लहानग्यांची चित्रे इतकी कल्पक आहेत की ह्यात फक्त एक विजेता निवडणं म्हणजे इतर स्पर्धकांवर अन्यायच होइल, नाही का ? म्हणूनच आम्ही ही स्पर्धा न ठेवता फक्त एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारची मागणी ह्या आधीही करण्यात आली होती, ती विचारात घेऊनच संयोजक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

६. पाककृती स्पर्धेविषयी :
स्पर्धेतल्या प्रवेशिका परिक्षकांना मूल्यांकनासाठी पाठवल्या आहेत. लवकरच विजेता घोषित केला जाईल.

मतदानाची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २००९ ही आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, नविन पोल्स सुरू करायचे असतील तर ते वापरतात. सध्या ते कुणीही वापरू नकात. खरतर हे फक्त अ‍ॅडमीनना दिसायला हव.

@अ‍ॅडमीन, 'नविन मतदानाचा प्रश्न' हे फक्त ग्रूप व्यवस्थापकांना दिसायला हवं नं? इकडे सभासदांना पण दिसतय.

ह्या पानाचा दुवा गणेशोत्सव २००९ च्या पानावर नाही का देता येणार? बरीच शोधाशोध करावी लागतेय ह्या पानासाठी.. चटकन सापडत नाहीये.

मी गणेशोत्सवात भारतात असल्याने मायबोलीवर येउ नाही शकले.
मला जर मतदान करायचे असेल, तर मला नुसते प्रवेशिकेचे नाव वाचुन कळणार नाही. तुम्ही जर प्रत्येक एन्ट्रीच्यावर हायपर लिंक देवून, मतदान करणार्‍याला जर ती एन्ट्री (कविता, लेख, चित्र) वाचता आली तर बरे होईल ना.

वर्षा,

हायपर लिंक देणं तांत्रिक अडचणींमुळे शक्य होतं नाहिये. प्रयत्न चालू आहेत.
पण तुम्हाला सर्व प्रवेशिका http://www.maayboli.com/ganeshotsavspardha09 इथे बधायला मिळतील. ही लिंक ह्याच पानाच्या सगळ्यात वर दिलेली आहे. तुम्ही हे पान एका विंडोत आणि मतदानाचं पान दुसर्‍या विंडोत उघडून मतदान करू शकता.

तुम्ही एकदाच मतदान केले कि आक्खा बुथ ताब्यात घेतला?
......बोटावर एक टिंब देतात, तुम्ही सगळी बाटलीच बोटावर घेतलीय! Happy