Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:01
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १
विषय : दूध जमा करून घेणारा माणूस
हा फोटो हुमरस (सिंधुदुर्ग) येथील एका दूध डेअरीचा आहे. वेळ पहाटे ५:३०-६ दरम्यानची. म्हणायला डेअरी असली तरी हे दुधाचे कलेक्शन सेंटर आहे. पहाटे ५:३० ला हा माणूस या टेबलावर येऊन बसतो. सगळी उपकरणी मांडून. दूध घेऊन आलेल्या लोकांच्या दुधातलं फॅट कन्टेन्ट मोजतो आणि दूध जमा करून घेतो. गेली २५ वर्ष तरी हा माणूस हे न चुकता रोज सकाळ संध्याकाळ दोन दोन तास करतो.
कॅमेरा सेटींग - पूर्णपणे ऑटो. फ्लॅश वापरलेला नाही. मागच्या पडवीमधे एक ट्यूबलाइट चालू होती तिचाच काय तो उजेड. मूळ फोटो हा रंगीत असला तरी रंग फारसे डिफाइन्ड नाहीयेत. फोटोशॉपमधे मोड चेन्ज करून ग्रेस्केल ला आणलाय आणि ब्राइटनेस व कॉन्ट्रास्ट किंचित वाढवला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटोमध्ये देहबोली मस्त पकडली
फोटोमध्ये देहबोली मस्त पकडली आहे!
पहाटे काम करतोय का? झोपाळलेला, कंटाळलेला वाटतोय! नक्की दूध का दूध आणि पानी का पानी करेल ना?
त्या फोटोतली उपकरणे कोण कोण
त्या फोटोतली उपकरणे कोण कोण सांगु शकेल
भारी आहे पण चेहर्यावर फारच
भारी आहे पण चेहर्यावर फारच अंधार आहे.
ते मेणबत्ती सारखं दिस्तंय पण
ते मेणबत्ती सारखं दिस्तंय पण मेणबत्ती नसावी असं वाटतंय.
मेणबत्ती नाही, फॅटमीटर (?)
मेणबत्ती नाही, फॅटमीटर (?) असावं. दुधातलं क्रीम / फॅटचं प्रमाण मोजण्यासाठी. म्हणजे ठरलेल्या प्रमाणाच्याबाहेर पाणी असलेलं दुध रिजेक्ट करण्यासाठी.
त्या फॅट्मीटरचा, नोंदवहीचा अन त्याच्या शर्टाचा पांढरा रंग काळ्या / अंधाराच्या पार्श्वभुमीवर उठून दिसतो आहे. चेहरा दिसत नाही, ते ठीकच आहे.
सही ! प्रकाशाचा उत्तम वापर !
सही ! प्रकाशाचा उत्तम वापर ! एकदम गुढ फोटो वाटतोय !
काय जबरदस्त फोटो आहे. त्या
काय जबरदस्त फोटो आहे. त्या माणसाच्या देहबोलीतूनच चेह-यावरचे भाव काय असतील याचा अंदाज लागतोय.
चेहर्यावर काय भाव
चेहर्यावर काय भाव असणार?
पहाटे पहाटे ऐन थन्डीत साखरझोपेतुन उठून दुधभट्टी उघडायची अन बसायच गोळा करीत..... श्श्या, कस्ला वैतागलेला असेल तो?
दरवाजा (किन्वा फ्लॅश) डावीकडे असणार अस हन्ड्यावरच्या उजेडावरुन वाटतय
>>त्या फोटोतली उपकरणे कोण कोण
>>त्या फोटोतली उपकरणे कोण कोण सांगु शकेल
>>मेणबत्ती नाही, फॅटमीटर (?) असावं. दुधातलं क्रीम / फॅटचं प्रमाण मोजण्यासाठी. म्हणजे ठरलेल्या प्रमाणाच्याबाहेर पाणी असलेलं दुध रिजेक्ट करण्यासाठी.
त्याला लॅक्टोमीटर म्हणतात..... दुधाच्या density नुसार तो कमीअधिक प्रमाणात दुधामध्ये बुडतो अथवा तरंगतो... त्यावर विशिष्ठ मार्किन्ग असते.... त्यावरुन दुधाचा SNF (Solid non Fat) ठरवतात आणि त्या दुधाची योग्यता जोखतात.
मला माहिती असण्याचे कारण म्हणजे याचे Electronic Version (Microcontroller based) मी बनवले होते.... प्रोजेक्ट म्हणुन
बाकी फोटो अतिशय सुरेख!
मस्त फोटो..
मस्त फोटो..
हो तो फॅटमीटरच आहे. सगळ्या
हो तो फॅटमीटरच आहे. सगळ्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
हुमरस, सिंधुदुर्ग इथलं कलेक्शन सेंटर आहे. हा माणूस गेले २५-३० वर्ष सकाळ संध्याकाळ कलेक्शनचं काम करतो. न कंटाळता.
चेहर्यावर खेड्यातल्या खडतर आयुष्याची आणि गरीबीची पुटं आहेत. कंटाळा नाही.
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !