आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!

नशिबाने जरी जग दाखवणे नाकारले तरी आपल्या मनःचक्षूंनी जग पाहू इच्छिणार्या दृष्टीहीनांसाठी तिसर्या डोळ्याच्या रुपात आपुलकीने मदतीचा हात पुढे करण्यार्या नाशिकच्या 'थर्ड आय असोसिएशन' (पुर्वाश्रमीची थर्ड आय फाऊंडेशन) या दृष्टीहीनांसाठी, विशेषतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेची, आणि संस्थेच्या कामाची ओळख मायबोलीकरांना करून देण्याचा हा माझा प्रयत्न! गेली १४ वर्षे विविध अडचणींवर मात करून नेटाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार्या या संस्थेच्या संचालिका आहेत - सौ. वीणा श्रीकांत सहस्रबुद्धे!
नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने मायबोली-संयुक्ता-सुपंथ परिवारातर्फे गरजू संस्थांसाठी मदत गोळा केली जाते. मायबोलीकरांच्या समृद्ध सामाजिक जाणिवांचे व जबाबदारीच्या भावनेचे या उपक्रमातून उत्कृष्ट दर्शन होत असते.
सामाजिक उपक्रमांत कोणकोणत्या संस्था मदतीसाठी निवडाव्यात ह्याबद्दल नेहमीच पेच असतो. ज्या संस्थेत आपण गोळा केलेली मदत वस्तूरूपात देणगी म्हणून देता येईल अशा संस्था शोधणे, त्यांची काय गरज आहे याचा आढावा घेणे, त्यानुसार आपण करावयाच्या मदतीचे स्वरूप ठरविणे इत्यादी काम संयुक्ताच्या सदस्या दर वर्षी आवडीने व उत्साहाने करतात.
'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक
गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
नमस्कार मंडळी,
स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.
आयुष्यात वेगळे काहीतरी करावे, आपले छंद जोपासताना त्याबरोबरच अर्थार्जनही करावे आणि नव्या वाटा चोखाळताना त्यात आपल्या कुटुंबियांची सर्वार्थाने साथ मिळावी अशी आकांक्षा अनेक स्त्रियांच्या मनात असणे सहज शक्य आहे. परंतु सर्वांनाच ते साधते असे नाही. वयाची चाळीशी उलटल्यावरही आपण काही करू शकतो, त्यातून व्यावसायिक यशासोबत इतरही बरेच काही कमावू शकतो ह्याची कल्पनाच अनेकींना नसते. सांसारिक जबाबदार्या सांभाळून आपल्या छंदाला एका वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप देणार्या नागपूर येथील प्रेरणाताईंनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणून ते साध्य केले.
कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.
नमस्कार मायबोलीकर.
पुण्यातील सावली सेवा ट्रस्ट या गरीब व गरजू तसेच बुधवारातील देहविक्रय करून उपजीविका कमावणार्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी काम करणार्या सेवाभावी संस्थेला गेल्या महिला दिन उपक्रमात मायबोलीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मदत केली व त्या अंतर्गत चार मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च उचलला.