अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो पुन्हा हताश झाला. अजून किती काळ योग्य सवारीची वाट पहायची?
---x---
"केवळ घोडे सवारीयोग्य असणे पुरेसे नाही. करकचून मांड मारून बस", प्रशिक्षक जवळजवळ ओरडलाच. त्यासरशी घोड्याला मांड आवळून रघुने टाच मारली. धुळीचे लोट उडाले. अन् उधळलेल्या घोड्यासहित रघु समोरच्या दरीत गायब झाला! भयाण किंकाळी हवेत विरली.
---x---
'जगायला ना नाहीये ग माझी, पण हे असं अंथरुणात पडून जगायची इच्छा नाहीये.' आईचं बोलता येत असतानाचं माझ्याशी बोललेलं शेवटचं वाक्य! नंतरचे तीन दिवस फार अवघड होते. वेदनांमुळे तिच्यासाठी आणि ती जाणार हे कळलं होतं त्यामुळे आमच्यासाठी. त्यानंतर तिचा आवाजही गेला. एकेक गात्र शिथिल होत गेली. ती आता फार दिवसांची सोबती नाही हे कसं कोण जाणे तिलाही जाणवलं होतं.
नवीन रंगवायला वेळ झाला नाही म्हणून हे पूर्वीच केलेलं एक चित्र देते आहे.
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत त्याच्या अंगावर काटा आला. बांधकाम झाल्यावर नव्या-नवरीगत सजलय घर! कधीही कोसळू शकेल अशा घराच्या जोताकडे बघितलं. वणव्याने राखरांगोळी झाली. बाजुच्या झाडाकडे सवयीने बघितलं तर ते वाढून चांगलं आभाळात पोहोचलं होतं. बिया पेरुन दोन दिवसही झाले नसतील.
आपल्या विनंतीला मान देऊन आणि ज्यांना गणेशोत्सवात धामधूम असल्यामुळे स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घेता आला नसेल तर त्यांना एक संधी देण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२२ यातील स्पर्धा आणि उपक्रमांसाठी येणाऱ्या प्रवेशिकांची मुदत रविवार ११ सप्टेंबर २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) वाढवली आहे.
तसं विशेष काही घडलं नव्हतं.
'ट्रेडिशनल डे'ला ती साडी नेसून आली तेव्हा त्याने पुन्हा वळून तिच्याकडे पाहिलं, आणि ते पाहून का कोण जाणे, पण तिने लाजून मान खाली घातली. बस्स, इतकंच!
अगदी खरं सांगायचं, तर त्यानंतरही काही विशेष घडलं नाही.
म्हणजे ते त्याच मित्रमैत्रिणींच्या ग्रूपमध्ये अजूनही होते. फक्त त्यानंतर तो तिच्याशी बोलण्याआधी जरा घसा खाकरायचा, आणि ती त्याच्याशी बोलायला गेली तर शब्दच विसरायची. बस्स, इतकंच!
झालंच तर शब्द विसरले की तिची कानशिलं तापायची, आणि खाकरल्यावर त्याचा आवाजही एरवीपेक्षा हळूवार व्हायचा.
बस्स, इतकंच!
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"आपल्या सोबतीला बघ कोण आलंय."
"अय्या ! कित्ती दिवसांनी बघतेय मी तर बाई या जॉनीला. नवीन रुपात किती क्यूट वाटतोय गं."
"पण जरा काळा झालाय नै."
"चालवून घेऊ."
"हा एवढा वेळ काढून आलाय म्हणजे कायतरी विशेष कारण असणारे नक्कीच."
"किती वर्षे आपण दोघी कपाटातच अडकून गेलेलो. आता मात्र पुन्हा एकवार खेळ रंगणार. तू, मी आणि जॉनी."
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
तिच्याशी नजरभेट झालीच. ती गोरी, घारी आकर्षक नवयौवना बघताक्षणी भुरळ पडेल अशी. रघुच्या तारुण्यसुलभ भावना तिला बघून उफाळून येत. तिला पटवावं , तिच्यामार्फत या शेजारच्या घरात प्रवेश मिळवावा आणि तिच्यासह सुखेनैव जीवन व्यतीत करावं हे उरी बाळगलेलं स्वप्न रघूचं.
त्या दिवशी 'ती' देखील रघूला लाडीक प्रतिसाद देत होती. त्याच उन्मादात रघू निघाला, तिच्या दिशेने.... कुंपणावरुन उडी टाकत तिच्यापर्यंत तो आता पोहोचणारच होता , इतक्यात....
हस्तलेखन स्पर्धा २०२२
मोठा गट : ब
नाव : साक्षी