Submitted by अni on 9 September, 2022 - 12:43
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"आपल्या सोबतीला बघ कोण आलंय."
"अय्या ! कित्ती दिवसांनी बघतेय मी तर बाई या जॉनीला. नवीन रुपात किती क्यूट वाटतोय गं."
"पण जरा काळा झालाय नै."
"चालवून घेऊ."
"हा एवढा वेळ काढून आलाय म्हणजे कायतरी विशेष कारण असणारे नक्कीच."
"किती वर्षे आपण दोघी कपाटातच अडकून गेलेलो. आता मात्र पुन्हा एकवार खेळ रंगणार. तू, मी आणि जॉनी."
असे सर्व बोलणं सुरु असतानाच जेडब्ल्यू-ब्लॅक लेबल, ग्रीन टी आणि सोडा ओतून रघूने आपलं कॉकटेल बनवले.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त !
मस्त !
झिंगाट लेखन
जॉनी जॉनी येस पापा
टेकिंग कॉकटेल ?
नो पापा
(No subject)
अरे, ही कल्पना मस्त आहे. फक्त
अरे, ही कल्पना मस्त आहे. फक्त सोडा आणि चहा पुल्लिंगी झाले.
मस्त कल्पना!
मस्त कल्पना!
सोडा आणि हिरवा चहा ह्यांच्या
सोडा आणि हिरवा चहा ह्यांच्या बाटल्यांचा आपापसातील संवाद आहे. म्हणून.... बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता....
ओके. कल्पना आवडलेलीच आहे.
ओके. कल्पना आवडलेलीच आहे.